Posts

Showing posts from February, 2024

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

Image
  अंजली अरुण काळे. दृश्यकलेतील एक ओळख असलेले नांव. आज त्यांचा कलाक्षेत्रात आत्मविश्वासाने संचार सुरू असतो. पण मी त्यांना ओळखतो ते त्याही आधीपासून. ते त्या अंजली ठाकरे असल्यापासून. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशी नाते जोडणारी, सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीपासून. त्या येण्याआधी त्यांचे नांव माझ्या कानावर आले. मी सर जे.जे.उपयोजीत कला संस्थेचा अध्यापक होतो, आणि त्याकाळात अंजली विद्यार्थीनी म्हणून आली व एक स्पष्टवक्ती, निर्भीड, आक्रमक अश्या तिच्या स्वभावामुळे ती सर्वाना माहीत झाली. पुढे ती माझ्या वर्गात आल्यावर मला तिच्या स्वभावातील मोकळेपणा, तिची सर्जनशीलता, सर्वाना आपलासा करण्याचा तिचा मोकळा ढाकळा स्वभाव,  त्याचसोबत इतरांना मदत करण्यासाठी चाललेली तिची धडपड, आणि यामुळेच सर्व शिक्षकांशी तिची चांगलीच मैत्री झाली होती. जेजे मधील प्रदर्शनाची कामे असोत वा सांस्कृतीक कार्यक्रमातील सहभाग असो, अंजली स्वतः तर आघाडीवर असेच, शिवाय आपल्या वर्गातील सहकार्यांना पण उत्तेजीत करीत असे. पुढे जेजे मधून शिक्षण पूर्ण करून जेव्हां जाहीरात क्षेत्रांत तिने पाय टाकला, तेंव्हा तिचे एक नवीन कार्यक्षेत्र ठरले. दृकक

अरूण काळे : जाहीरात क्षेत्रांतील समृद्ध कला वारशाचा उचीत सन्मान!

Image
   शालेय अथवा कॉलेज जीवनामध्ये आपल्याशी अनेकांशी मैत्री होते. त्यापैकी काही शिक्षण संपताच आपल्यापासून दूर होतात, काही व्यवसाया निमित्ताने इतरत्र जातात. मात्र काही मित्र आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात, आपल्याशी एकरूप होतात. आपल्या बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला साथ देतात. आपल्या हृदयात कायमचे घर करून आपले हृदयस्थ बनतात. असाच एक माझा हृदयस्थ म्हणजे माझा जीवच्छ कंठच्छ  मित्र अरुण काळे. ज्याने पुढे अवघे जाहीरात क्षेत्र आपल्या कर्तबगारीने गाजवीले.  जे.जे. उपयोजीत कला संस्थेतील आमची ती १९६२-६७ ची बॅच म्हणजे एक खास बॅच म्हणायला हवी.आम्ही सर्व मित्र जसे एकमेकांना घट्ट धरून राहीलो होतो, आणि तितकेच घट्टपणे आम्हांला बांधून ठेवले होते ते आमचे गुरुवर्य प्राध्यापक षांताराम पवार यांनी. पवार सर आम्हां दगडांवर निर्दयपणाने  छिन्नीचे घाव घालून त्यातून मूर्ती घडवण्यासाठी त्याला आकार देऊ पहात होते.  त्या काळात अश्या गुरुवर्यांच्या तालमीत आम्ही घडत होतो, धडपडत होतो. त्याच सोबत मजा- मस्ती देखील करीत होतो. आणि आमचा अरुण त्यात आघाडीवर असे. शिवाय आमचे सर्वच गुरूवर्य आमचे शिक्षक तर होतेच, शिवाय आमचे मित्रही झाल