Posts

Showing posts from March, 2024

किमयागार कलाकार

Image
  आजपर्यंत मी अनेक चित्रकार, चित्रसंस्था, चित्रकारी उपक्रम तसेच चित्रकलेवरील पुस्तके अन चित्र प्रदर्शने यावर वृत्तपत्रे , मासीके, दिवाळी अंक यामध्ये असंख्य प्रकारे लेख लिहीले आहेत. या चित्रकलेने मला साहित्यिक जगतात लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. अर्थात या माझ्या लिखाणाला सुरुवात झाली ती सुमारे तीस एक वर्षांपूर्वी. कांही किरकोळ लेख लिहून झाल्यावर खरे तर मला लेखक बनविले ते नवशक्तीचे संपादक श्री प्रकाश कुलकर्णी यांनी. त्यांनी नवशक्तीच्या रविवारच्या 'ऐसी अक्षरे रसिके' या पुरवणीत चित्रकला या नैपुण्य विषयावर सदर लिहीण्यास सांगीतले, तेव्हां माझी छाती दबकूनच गेली. एखादा लेख लिहीणे हे तसे सोपे काम, पण सतत वर्षभर एका नैपुण्य विषयावर लिहिणे, तेही त्यात सातत्य राखून. हे काम माझ्याकडून होईल कीं नाही ही शंका मी त्यांच्याकडे उपस्थीत करताच त्यांनी सांगून टाकले, लिहाहो, तुम्ही अवश्य लिहाल. आणि माझा पहीला लेख प्रसीद्ध झाला. आणि त्यापुढे माझे दडपण नाहीसे झाले. मी आजवर पहात गेलो होतो, ते ते कलाकार, त्यांची कला संपदा, माझ्या नजरेसमोर तरळू लागली. आणि त्या एकेक कलाकाराला मी शब्दबद्ध करत गेलो. आणि ब