Posts

Showing posts from July, 2020

चित्रांना हास्याचे कोंदण देणारा हास्य चित्रकार : शि.द.फडणीस

Image
कांही माणसे जन्माला येतातं तीच मुळी लोकांच्या मनात आनंदाचे कांही क्षण पेरायला, त्यांना त्यांची दुःखे विसरून या जगातील आनंदाचा लाभ द्यायला, त्यांच्या मनावर हास्याची अलगद अशी फुंकर मारायला. मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत. असेच एक हास्य चित्रकार वर्षो न वर्षं या महाराष्ट्रात, या देशात आणि परदेशात सुद्धा असेच लोकांना निखळ हास्याची मेजवानी सतत देत आहेत. आणि हे हास्यचित्रकार आहेत शिवराम दत्तात्रय फडणीस. अर्थात हे नांव ऐकले की आपणास विशेष असे कांही वाटत नाही. पण तेच जर का कोणी आपल्याला शि. द.फडणीस म्हणून सांगीतले तर पट्कन गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा कालखंड आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो. त्यावेळच्या मासिके, दिवाळी अंकांची नयनमनोहर मुखपृष्ठे दिसू लागतात. अन त्यातही आठवतात ती अनंत अंतरकरांच्या हंस, मोहीनी, नवल या प्रकाशनांपैकी 'मोहीनी' हे विनोदाला वाहीलेले मासिक व त्याचा दिवाळी अंक. अन तितकीच त्यावरील लोभस अशी विनोदी चित्रे व त्याखाली असलेली अगदी सुट्या अक्षरातील इंग्रजीमधील एस फडणीस ही त्यांची सही. मासिकांची व दिवाळी अंकांची मूखपृष्ठे त्या काळात वाचकांच्या मनावर एक प्रकारचा पगडा घ

चित्रकलेतील वास्तववादी आदर्श : सुहास बहुळकर

Image
सुहास बहुळकर हे नांव आज चित्रकलेत खूप उंचीवर पोचले आहे. आपल्या स्वतंत्र शैलीने आपली ओळख दाखवणारा एक वास्तववादी चित्रकार ही त्याची खरी ओळख आहे. अश्या या सुहासला एकेरी बोलणे थोडे अप्रशस्त वाटेल. पण सुहासला अगदी विद्यार्थी दशेपासून पहात आल्यामुळे असेल कदाचीत, तें उपचार कदाचित घडणार नाहीत. तशी चित्रकला ही सुहासच्या अंगात भिनलेली आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी बालवयातच त्याचे गुण जाणून त्याला इंदीरा गांधींचे चित्र बनविण्यास सांगीतले. व ते स्वतः इंदिराजींनी पाहून त्यावयात सुहासचे कौतुक केले होते. वास्तविक या इंदिराजींच्या चित्राची हकीकत मोठी मजेशीर आहे. सुहासला वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे वडील दिल्लीला त्याला घेऊन शंकर्स विकलीच्या बाल चित्रकला स्पर्धेला घेऊन गेले होते. त्यात सुहासला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यावेळी पुण्यातील खासदार ताराबाई साठे यादेखील आल्या होत्या.आपल्या पुण्यातील मुलाला पहीले बक्षीस मिळाले, या कौतुकाने त्या त्याला घरी घेऊन गेल्या. तेथून त्यांनी सुहासला पंतप्रधान इंदिराजींच्या घरी नेले, व त्याना म्हणाल्या मॅडम, तुम्ही जरा खुर्चीवर बसा. हा मुलगा पाच मिन

एका स्वप्नाची पूर्तता : माऊंट रशमोरचे स्मारक शिल्प

Image
२५ मे २०२० रोजी अमेरीकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय आणि निशस्त्र अश्या व्यक्तीची एका गोऱ्या पोलिसाकडून अमानुषपणे हत्त्या झाली. आणि त्यापाठोपाठ अमेरीकेत श्वेत वर्चस्ववाद्यांविरुद्ध निदर्शनांचा व आंदोलनांचा आगडोंब उसळला. प्रत्यक्ष पोलीस प्रमुखांनी जनतेपुढे गुडघे टेकून माफी मागितली तरी ही आग शमली नाही. आणि अमेरीकेत आता 'गुलामगिरी आणि वसाहतवाद्यांचे पुतळे हलवा’  ही मोहीम जोर पकडू लागली. आणि त्याचा फटका न्यूयॉर्क शहरातील 'अमेरीकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री' या जगविख्यात वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला १९०१ ते १९०९ या कालखंडातील अध्यक्ष असलेल्या रिपब्लीकन पार्टीच्या थिओडोर रुझवेल्ट ( डेमोक्रॅट फ्रँकलिन रुझवेल्ट नव्हेत) यांचा असलेला अश्वारूढ भव्य पुतळा हटवावा, अशी मोहीमही सुरु केली आहे. आणि अमेरिकेतील 'पुतळे हटाव' या मोहिमेने आता यूरोपमध्येही शिरकाव केला आहे. थिओडोर रुझवेल्ट यांच्या पुतळ्यावर राग असायचे कारण पुतळ्याच्या एका बाजूला एक श्वेतवर्णीय व्यक्ती दाखवली असून दुसर्या बाजूला एक कृष्णवर्णीय व्यक्ती दाखवली आहे. १०९१ च्या काळात थिओडोर हा अमेरिकेला महासत्त

एका कलाकाराची अक्षरगाथा : अच्युत पालव

Image
प्रकाशक हा नेहमीच नवनवीन लेखकांच्या शोधात असतो. असे सर्जनशील लेखक शोधुन, त्यांच्याकडून लेखन करवून घेऊन पुस्तक रूपाने ते तो प्रकाशीत करीत असतो. पण एका प्रकाशकाकडे लेखक स्वतः गेला, आणि त्याने आपले सुलेखनावरील त्याचे पुस्तक प्रकाशीत करण्याची विनंती केली. प्रकाशकाने सदर पुस्तक पहाताच त्याची व्यावहारीक दृष्टी जागृत झाली. 'या पुस्तकांना कोण विकत घेणार?' हा वाजवी प्रश्न प्रकाशकाने त्या लेखकाला करताच, लेखकाने संध्याकाळपर्यंत त्या प्रकाशकाला सोदाहरण पटवून दिले, की आज शालेय, कला महाविद्यालये, व्यावसायीक क्षेत्र, अश्या सर्वच स्तरावर या पुस्तकाची कशी गरज आहे ते! आजवर ‘सुलेखन’ अथवा ‘कॅलीग्राफी’ या विषयावर गांभीर्याने पाहीले गेले नाही. पण हळूहळू काळानुसार या विषयाचे महत्व लोकांना आता जाणवू लागले आहे. आणि त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळणे हे सुध्दा कठीण आहे. अश्या परिस्तिथीत पुस्तक रूपाने त्या विषयाची शास्त्रशुद्ध माहीती देणे हे महत्वाचे कार्य ठरेल. आणि त्यासाठी अशी पुस्तके लोकांना अवगत होणे ही आजची गरज आहे, असे त्या सुलेखनकार लेखकाचे म्हणणे होते. ते प्रकाशक होते 'नवनीत' प्रकाशन संस्

एक मनस्वी कलावंत : मुरलीधर आचरेकर.

Image
कांही मराठी माणसं आपल्या कर्तबगारीने साऱ्या भारताला भूषणावह ठरली आहेत. विशेष करून यामध्ये कलावंतांचा मोठा सहभाग आहे.मग ते चित्रपट कलाकार असोत, नाट्य कलाकार असोत, संगीतकार, गायक असोत वा चित्रकार! हे सर्वच जण आपल्या कला आविष्कारामुळे आपणा सर्वांच्या आदराला प्राप्त ठरतात. अश्या थोर व्यक्तीमध्ये एक नांव आवर्जून येते ते एका महान चित्रकाराचे, मुरलीधर रामचंद्र आचरेकरांचे! एम.आर.आचरेकर म्हणूनच ते सदैव ओळखले गेले. तसेच जवळच्या व्यक्तींचे आदरणीय भाऊसाहेब होते. मुरलीधर तथा भाऊसाहेब आचरेकरांचा जन्मदिवस म्हणजे पंडीत नेहरूंचा जन्मदिवस, १४ नोव्हेंबर. मात्र साल होते १९०७. मुंबईत त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्ष्यापासूनच आचरेकरांनी त्या काळच्या नामवंत केतकर इन्स्टीट्यूटमध्ये कला शिक्षणास आरंभ पाहून पुढे त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळाला पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना परीक्षा देता आली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे जलरंगातील पहीले चित्र त्यावेळच्या 'चित्रमय जगत’ या मासीकात प्रसीद्ध झाले. आचरेकरांना छायाचित्रण आणि लिथोग्राफी या विषयातही गोडी हो