Posts

Showing posts from July, 2018

जे.जे.ची टूर आणि बेर्डेची 'टुरटूर'

Image
सहलीला जाणे हा प्रत्येकाच्या जीवनांतील एक उत्साहाचा आणि मनोरंजनाचा प्रसंग असतो. मग ती सहल शालेय जीवनातील असो वा महाविद्यालयीन ! त्या त्या वयातील ते आनंदाचे क्षण असतात. सर्वच शाळा कॉलेजीस यात कार्यरत असतात. सर जे.जे. उपयोजीत कला महाविद्यालयातही सहलीला तसे प्राधान्य असते. मात्र येथे जी वार्षीक सहल जाते ती केवळ मजा लुटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी नव्हे, तर अभ्यासाचाच एक भाग म्हणून जाणारी ती ' स्टडी टूर ' असते. अर्थातच ही स्टडी टूर विद्यार्थ्यांचे प्रमूख आकर्षण असते. शासनातर्फे खर्चाचा काही वाटा उचलला जात असल्याने सर्व साधारण विद्यार्थ्यांनाही भारतभर निरनिराळी ठिकाणे पाहण्यास, अभ्यासण्यास, व चित्रीत करण्यास संधी मिळते. यामध्ये ल्यांडस्केप, स्केचिंग, छायाचित्रण अश्या सर्वच माध्यमातून अभ्यास करायचा असतो. आणि टूर संपवून आले की सर्व विद्यार्थी आपापल्या कामाचे प्रदर्शन संस्थेत मांडत असतात.  ही सहल जेव्हां जाते, तेव्हां विद्यार्थ्यांसोबत प्रमूख म्हणून एक प्राध्यापक, त्याच्या मदतीला विद्यार्थी संख्येनूसार इतर अध्यापक वर्ग, शिपाई असा लवाजमा असायचा. आणि या सहलीतून काश्मीर ते कन्याकुमारी

जे.जे.तील माझे केंकरे सर

Image
काही लोकांची नांवे त्यांच्या कलांशी अशी काही निगडीत असतात की त्या कलेचं नाव उच्चारताच त्या व्यक्ती चटकन आपल्या नजरेसमोर येतात. त्यातही हे कलाकार कला -नाट्य -रंगभूमी अश्या क्षेत्रांशी बांधील असले तर मग पहायलाच नको. या महाराष्ट्रात नाट्यवेड्या रसीकांची या नाट्यकलेने तेवढ्याच तन्मयतेने सेवा केली आहे. व रसीकांनीही तेवढ्याच आत्मीयतेने या कलाकारांना पुजले आहे. अशीच एक नाट्यक्षेत्रातील आदरणीय व्यक्ती म्हणजे दामोदर काशीनाथ केंकरे अथवा अवघी नाट्यसृष्टी त्यांना ओळखत असलेले त्यांचे प्रचलीत नांव ' दामू केंकरे' ! आज दामू केंकरे ओळखले जातात ते त्याच्या नाट्यकलेतील अविष्कारामुळे, त्यांच्या गाजलेल्या ' हॅम्लेट ' मुळे, त्यांच्या नाटकांमधील भूमिकांमुळे, त्यांच्या नाट्य दिग्दर्शनामुळे ! पण सर जे.जे.उपयोजीत कला संस्थेमधील त्यांचे योगदान यावर फार कमी बोललं गेलं आहे. आणि मला आज तेच या माझ्या लेखामधून सांगायचे आहे. दिनांक ५ मे १९१८ रोजी गोव्यातील मडगांव येथे जन्मलेल्या दामू केंकरे यांच्याशी माझा संबंध आला तो, १९६२ साली. ड्रॉईंगची आवड असल्याने शालान्त परीक्षेनंतर मुंबईला सर जे.जे.स्क

सेलिब्रिटी नावाचा रोग.

Image
सेलेब्रिटी नांवाचा एक रोग या देशाला लागला आहे, हळूहळू सर्वामध्ये तो फोफावत चालला आहे, याची लक्षणे मोठी गंभीर असतात, माणसामध्ये गुपचूप सेलिब्रिटी पसरतात, आख्खी ' खाना 'वळ यांच्या देही ठाण मांडते, त्यांच्या एका दर्शनासाठी यांची तहानभूक हरपते, याच्या दर्शनासाठी दिवसेदिवस घरासमोर ठाण मांडून, रस्ते अडवून, हे लोक बसतात, यांची आरती ओवाळून आपला दिवस साजरा करतात, यांच्या अंध प्रेमामुळे, सेलिब्रिटीही माजून जातात, स्वतःला देशाचे पालनहार समजू लागतात, उन्मादाचा वायू त्यांच्यात भरून वाहू लागतो, दुसऱ्याचा जीव त्यांना कवडीमोल वाटू लागतो, कारण यांच्या पाठीशी निरुद्योगी भक्तगण उदो उदो करत नाचत असतो, पडद्यावरचे चाळे यांचे, सत्य समजूनी चालत असतो, स्वत:लाही त्यात पहात असतो, त्याचीच नक्कल उतरीत असतो. काही राजकारणी असतात गुन्हेगार सेलीब्रीटींचे गॉडफादर, कृपा त्यांची असते यांच्या अवगुणांवर, त्यांना पहाताच देती प्रशस्तिपत्रक निष्पापतेचे, भावुकतेचे... बाळलीलांचे, जरी चिरडती हे निष्पाप माणसांना, नसे खेद वा खंत त्याची बिलकूल यांना, जरी धाडती सजा सुनवूनी यासी कोठडीत, तेथेही असती याचे सरकारी अंध भक्त, बसवू

ऋषीतूल्य कला तपस्वी : एस. एम. पंडीत

Image
  तो जमाना होता, वर्षाची सुरुवात झाली की उत्तमोत्तम कॅलेंडर्स मिळवून घराच्या भिंतींची सजावट करण्याचा. सिनेमागृहांत चित्रपट पाहायला गेले की,तेथील शोकेस मधील मधुबाला, नर्गीस, वैजयंतीमाला, निरुपा रॉय यासारख्या चित्रपट तारकांची रंगीत शोकार्ड्स पाहण्याचा आणि त्यातील आनंद मनसोक्त लुटण्याचा ! विशेषतः कॅलेंडरमधील देव देवता पहाताना चित्रकाराच्या आविष्कारामुळे मन भक्तीभावाने भारावून जात असे. चित्रकाराने त्यामध्ये इतक्या सूक्ष्मपणे भरलेले तपशील पाहीले की त्याच्या अद्भूत कौश्यल्याची जाणीव होत असे. त्यातील मूळ चित्राबरोबर रेखाटलेला मनोहर निसर्ग,जणू प्रत्यक्ष आपणासमोर साकारलेला आहे अशीच जाणीव होत असे. ही कला आविष्कृत करणारे एक व्यासंगी, अद्भूत व वास्तववादी चित्रकार म्हणजे साबानंद मोनप्पा पंडीत,  अथवा त्यांचे लोकमान्यता प्राप्त झालेले नांव म्हणजे एस. एम. पंडीत ! ज्या नावाने अक्षरश: प्रत्येक कला रसिकांवर एक मोहीनी घातली होती. वैदीक काळातील एखाद्या ऋषीप्रमाणे व्यक्तीमत्व असलेल्या व जोडीला अध्यात्माची बैठक असलेल्या या तपस्वी चित्रकाराचा जन्म कर्नाटकातील गुलबर्गा येथे शनीवार दिनांक २५ मार्च १९१

रंगरेषेच्या समृद्ध दुनीयेतील सुरेल कलावंत : रवी परांजपे

Image
साधारणपणे १९५८ ते १९६७ चा काळ. भारतीय जाहीरात क्षेत्रात आपल्या मनमोहक कलाविष्काराने, अवर्णनीय रेखाटनाने एका तरुणाने आमूलाग्र क्रांती केली. तो काळ आजचा संगणकाचा नव्हता, फोटोशॉप - इलस्ट्रेटर अश्या सॉफ्टवेअरचा नव्हता. कलाकार म्हटले की त्याच्या हातून होणारी कलानिर्मिती हीच एकमेव खास बाब ठरत असे. जाहीरातींमधील बोधचित्रे, कॅलेंडर्स, पोस्टर्स, कॅटलॉग, शुभेच्छा कार्ड्स या सर्वच गोष्टी त्या तरुणाच्या हातून नखशीकांत देखणी होऊन बाहेर पडत. त्याची खास अशी शैलीही सर्वांनाच मोहात पाडत असे. विशेषतः अनेक कलाकार व कला विद्यार्थी त्याला काम करतांना पाहण्यास आसुसलेले असत. तो तरुण म्हणजेच आजचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री रवी परांजपे होत. रवी परांजपे यांचे नाव घेतले की माझे मन सुमारे साठ वर्षे मागे जाते. अन झर्रकन तो संपूर्ण कालखंड माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. तेव्हां मी बेळगांवच्या सेंट पॉल्स हायस्कुल मध्ये शिकत होतो. तेथे आमचे ड्राइंग शिक्षक होते बेळगांवचे सुप्रसिद्ध कला महर्षी के.बी.कुलकर्णी. त्यांची शिकविण्याची हातोटी कांही वेगळीच होती. एक दिवस ते आपल्या सोबत एका तरुणाला घेऊन आले व त्याच

अस्वस्थ कलावंत : बाळासाहेब ठाकरे.

Image
कांही वर्षांपूर्वी आझाद मैदानांवर पत्रकार भवनाचे उदघाट्न होते. मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी उदघाटक होते. तर जयंतराव टिळक मुख्य पाहुणे होते. समारंभाच्या वेळी जयंतराव म्हणाले, " मला बाळासाहेबांबद्दल खूप आदर आहे. ते जे परखड पणे बोलतात ते वास्तविक आमच्याही मनांत बोलायचे असते. पण आमची तोंडे बांधलेली असतात. आम्ही मनांत असूनही ते बोलू शकत नाही. " आणि हे अक्षरशः खरे होते. बाळासाहेबांचा परखडपणा, पारदर्शीकता, वेळ आली तर स्वपक्षीयांनाही चार खडे बोल सुनावण्याची क्षमता हे त्यांच्या नेतृत्वाला शोभणारे पैलू होते. आणि त्यांच्या वाक्यांची मोडतोड करून त्याचे भांडवल करून स्वतःचे पोट भरणे हे निरनिराळ्या टी व्ही वृत्त वाहिन्यांची वृत्ती होती.  बाळासाहेब मुळातच राजकारणी नव्हेत. राजकारण्यांचा मुखवटा त्यांना कधीच धारण करता आला नाही. उलट राजकारणी लोकांचे खोटे मुखवटे आपल्या मार्मिक व्यंगचित्रातून टरा टरा फाडण्याचा त्यांचा धर्म होता. त्यामुळे जे सत्य ते स्पष्टपणे बोलणे त्यांच्या स्वभावातच होते. यामुळेच जयंतरावांनी स्वतःचे मनोगत बाळासाहेबांचे उदाहरण देऊन सांगितले होते यात नवल ते काय? आजच्या या लेखाचे