Posts

Showing posts from October, 2019

सर्वांसाठी झटणारा सदाशीव कदम.

Image
मध्यन्तरी मी आमच्या कॉलेज कॅन्टीनच्या मालकावर-रमेशवर लिहीले होते. त्यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यावर भरभरून लिहीले होते. त्यांच्या हलाखीच्या, अडचणीच्या विद्यार्थी दशेत या रमेशने त्यांना कशी मदत केली होती, कसे त्याच्यामुळे ते आपले पोट भरू शकत होते, अश्या अनेक आठवणी या माजी विद्यार्थ्यांकडून जागवील्या गेल्या. खरे तर जे.जे.च्या त्या मातीचा गुणच असा कांही आहे, की तिच्यातून सतत ममत्व, आपुलकी आणि प्रेमभाव स्रवत असतो. आणि त्यामुळे येथील माणसेही त्याच मुशीतून निर्माण झाल्यामुळे त्यांच्यातही तो भाव उत्पन्न झालेला असतो. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हा शिक्षकवर्ग झटत असतो तर विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेप्रती सदैव ऋणी रहातात. या प्रेमळ शृंखलेमध्ये सहाय्य करण्यास तत्पर असलेला चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग यात कधीच मागे राहीला नाही. किंबहुना कित्येकदा अडी अडचणीला बऱ्याच वेळा ते विद्यार्थ्यांना मदत करीत. मी जेव्हां या संस्थेत विद्यार्थी म्हणून पाय टाकला, त्यावेळी कोणालाही कसलीही मदत कोठून मिळेल असे विचारताच तत्क्षणी तो म्हणे अरे, त्या एकनाथला विचार. कधी ड्रॉईंग बोर्ड लागला, किंवा त

एका सुवर्ण काळाची समृद्ध वाटचाल अर्थात 'भिंतीवरी कालनिर्णय असावे'

Image
१८ ऑक्टोबरची एक सायंकाळ. एका रम्य अश्या सांस्कृतीक सोहळ्याने नटलेली, अनेक पाकक्रियेनी सजलेली आणि आणि ‘सुमंगल’ अश्या सांस्कृतीक वातावरणाने भारलेली अशी मी त्या दिवशी अनूभवली. निमित्त होते सुमंगल प्रकाशनातर्फे घेतलेल्या व नावाजलेल्या शेफनी निवडलेल्या खाद्य पदार्थांच्या स्पर्धांचे पुरस्कार वितरण, तसेच त्याच प्रकाशनांचा नावाजलेला, अनेक विद्वान लेखक, कवी, चित्रकार यांनी सजविलेल्या 'कालनिर्णय' या सांस्कृतीक दिवाळी अंकाचे उदघाटन, असा सुरेख संगम घडवून आणला होता, श्री. जयराजजी साळगांवकर यांनी. त्यामुळे अंक स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा किती हृदयंगम झाला असेल याची कल्पनाच करावी. आणि या मंगल प्रसंगी उपस्थीत राहण्यासाठी जयराजजी यांचा प्रेमळ आग्रह. त्यामुळे मन कसे हरपून गेले होते!  तसे पाहीले तर या सुमंगल प्रकाशन आणि कालनिर्णय यांच्या उभारणीत भक्कम असा आधार आणि हातभार होता तो जोतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचा! अध्यात्म, परमार्थ, साहीत्य, शास्त्र, ज्योतीष, पंचांग काव्य असे सर्वच अंगानी जाणारे त्यांचे व्यक्तिमत्वच सर्व काही सांगून जात असे. धोतर नेसलेली, सदरा घातलेली, कपाळावर शेंदरी