Posts

Showing posts from April, 2021

रेषेने संवाद साधणारा चित्रकार: बाळ ठाकूर

Image
माझ्या शालेय जीवनापासून अनेक पुस्तके, मासिके, दिवाळी अंक माझ्या पहाण्यात आली. त्यातील कथांना असलेली विवीध चित्रकारांची चित्रे पहाण्यात अली. त्यांचा वेगवेगळ्या शैली मी ओळखू लागलो. त्यामध्ये बरेचसे पारंपारीक रूढीनुसार चित्रे काढणारे होते.तसेच कांही विशेष लक्षात रहाणारे, आधुनिकतेने काम करणारे होते. काळाच्या पुढे जाऊन त्यांची कामे आविष्कृत होत असत. त्यापैकी कांही म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, द. ग. गोडसे, स्वतःच्या कथांना चित्रे काढणारे व्यंकटेश माडगूळकर शिवाय ग.ना.जाधव, शि.द.फडणीस असे कांही कलावंत. त्यातही आपल्या रेषेने कथाचित्रांना प्रभावीत करणारे एक नांव होते, ते म्हणजे बाळ ठाकूर. आपल्या जोरकस व प्रवाही अश्या रेषेने कथा विषयाचे आकलन करून देणारे एका बोधचित्रकार.   भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण समस्त जाहीरात व साहीत्य क्षेत्रात ते बाळ ठाकूर या नावानेच परीचीत आहेत. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रील १९३० साली कोकणातील लांजा जिल्ह्यातील भांबेड या गांवी झाला. त्यावेळी शाळेत जाताना आतासारखी वह्या पेनची सोय नव्हती. असे ती लाकडी चौकटीतील दगडी पाटी. खाली पडली की तिचे फुट