Posts

Showing posts from December, 2019

आमचा मार्शल

Image
अगदी समजायला लागल्यापासूनच मला प्राण्यांची ओढ होती. त्यातही कुत्रा व मांजर हे सर्वाप्रमाणे माझेही आवडते प्राणी. गावाकडे कोणाकडे कुत्रीला अथवा मांजरीला पिल्ले झाल्याचे समजले की आधी त्याचे आरक्षण करणे हे आम्हां भावंडांचे काम. त्यात माझ्या मोठ्या बहिणीला तर मांजर म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे एकमेकांचे शत्रु समजले जाणारे हे दोघे प्राणी आमच्या घरात सुखानैव रहात असत. मांजर दिवसभर घरातील चुलीच्या कोपऱ्यात उबेला बसलेले असे, तर कुत्र्याची सोय ही नेहमी घराबाहेर. त्यालाही माहीत असे की आपल्याला घरात प्रवेश नाही. त्यामुळे जेवण मागतांना तो उंबऱ्यावर दोन पाय ठेवून भुंकू लागे.  त्यामुळे कायमच कुत्रा आमच्या घरातील एक कुटुंबाचा सदस्य म्हणूनच राहीला. मी मुंबईला आल्यावर माझा लहान मुलगा हर्षद याला कुत्र्याचे बरेच वेड होते. मी त्याला अनेकवेळा क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेवून तेथील वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे, मांजरे, पक्षी वगैरे दाखवीत असे. व त्याचा एकच ध्यास होता, तो म्हणजे त्याला एक कुत्रा घेऊन देण्याचा. आमची जागा, त्यातून अश्या जातीवंत कुत्र्यांना लागणारी देखभाल, आपल्याला झेपेल की नाही याचे त्यावयात त्य