Posts

Showing posts from September, 2019

'या मंडळी सादर करू या' नाट्यसंस्थेची वैभवशाली ४३ वर्षे.

Image
सर ज.जी. उपयोजीत कला महाविद्यालयांतील माझ्या सुमारे बत्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीतीत अनेक विद्यार्थी येऊन गेले. अनेकजण त्यांच्या बऱ्या वाईट कृतीमुळे ध्यानात राहीले. आरंभी मी खूपच ज्युनीयर असल्याने आमचे जे  प्राध्यापक असत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हांला काम करावे लागे. पण हळूहळू स्वतंत्रपणे मी विध्यार्थ्यांच्या कामावर सुधारणा करू लागलो. त्यामुळे अनेक विद्यार्थी संपर्कात येऊ लागले.  दरवर्षी नवीन विद्यार्थी येत, आणि मागील विद्यार्थ्यांशी गुंफलेले बंध तसेच रहात. कारण जे.जे. हे एक कुटुंब आहे. सर्वच पिढ्यातील विद्यार्थ्यांना भावनीक नात्याने बांधून ठेवणारे. पण का कोण जाणे, ते विद्यार्थी मात्र कायमचे स्मरणात राहीले. काय नाते होते त्या विद्यार्थ्यांशी? तसे पाहीले तर माझा वैयक्तीक त्यांच्याशी कॉलेज जीवनात फारसा संबंध आला नाही. पण हे विद्यार्थी जेव्हां तृतीय वर्षात आमच्याकडे आले, तेंव्हा जाणवला तो त्यांच्यातील बेडरपणा, त्यांचा बंडखोरपणा, आणि थोडासा असलेला वेडेपणा. आणि अशीच वेडी माणसे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस करतात, व त्यांच्याकडून असे काही घडते की ते आपले नांव कोरून जातात. आणि