Posts

Showing posts from January, 2019

जॉर्ज फर्नांडीस आमचे दैवत होते !

Image
१९६० चे ते दशक म्हणजे आम्हां त्यावेळच्या तरुणांच्या स्वप्नपूर्तीच्या आणि ध्येयपूर्तीच्या काळाचे प्रतीक समजले जावे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहीके, मासीके, पुस्तके संस्काराचे धडे देऊन जात असत. अनेक स्फुर्तीस्थाने मनांत दैवत्वाचे स्थान घेत असत. त्यांचे विचार, अनूभव आम्हांला देशभक्तीसाठी प्रेरीत करीत असत. आणि आम्ही पाहीली ती उत्तुंग अशी पर्वतप्राय व्यक्तीमत्वे. देशसेवेसाठी, जनसेवेसाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून दुसऱ्यांच्या घरी चुली पेटाव्या म्हणून झटणारी. आमची ती दैवते होती स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, भाई श्रीपाद अमृत डांगे, साथी ब्या. नाथ पै, साथी जॉर्ज फर्नांडीस. यातील प्रत्येकजण विचार करीत असे तो इतरांचा. या पुढाऱ्यांची मुंबईच्या कामगार जगतावर घट्ट पकड होती. आणि सावरकर वगळता आम्हांला भाग्य लाभले, ते या सर्व लोकांच्या चरणाला स्पर्श करण्याचे. त्यांचे आशीर्वाद घेण्याचे.शिवतीर्थावर रात्रौ उशीरापर्यंत राहून त्यांची भाषणे ऐकण्याचे. आणि त्यांचे ते मनांत खोलवर रुतून बसलेले शब्द परत परत आठवून त्यात लीन होऊन जाण्याचे. असेच होते आमचे जॉर्ज फर्नांडीस. अंगावर नेहमी खादीचा अ

साहित्याचे गुण; संगीताचा डौल : चित्रकार दीनानाथ दलाल

Image
भारतात गेल्या शतकांत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवणारी अनेक उत्तुंग अशी व्यक्तिमत्वे जन्माला आली. आपल्या अलौकीक कार्याने त्यांनी भारतीयांच्या मनावर आपली नावे कोरली. महाराष्ट्रातील अश्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे दीनानाथ दामोदर दलाल. चित्रकलेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे एक महाराष्ट्राचे लाडके दैवत ! ३० मे १९१६ रोजी गोव्यातील मडगांव येथे दीनानाथ दलालांचा जन्म झाला. ज्या गोमंतकाने चित्रकार, गायक, वादक, नाटककार, नट अश्या कलाकारांच्या कैक पिढ्या निर्माण केल्या, तेथे दलालांसारख्या प्रतीभाशाली कलावंताचा जन्म व्हावा, हे कांही नवल नव्हते. त्यांचे बालपण या निसर्गरम्य परीसरात गेले. सभोवताली हिरव्यागार वनश्रीने नटलेली कुळागारे, निळेशार समूद्र, मासेमारीसाठी पारंपारीक वेषात जाणारे कोळी, मंगेश-शांतादुर्गा-महालक्षुमी अशी ऐतिहासीक महत्व लाभलेली अन वास्तूशास्त्राचा अद्भूत नमूना असलेली मंदीरे आणि त्यासोबत तेथील भव्य अशी प्राचीन चर्चीस या सर्वाचाच परीणाम दीनानाथ दलाल यांच्या सौंदर्य दृष्टीवर घडत गेला असणार. सतत रेखाटणने करणाऱ्या शाळकरी दीनानाथने एकदा आपल्या मुख्याध्यापकाचे केलेले रेख

सतत तेवणारा आनंदमयी प्रकाश : प्रकाशभाई मोहाडीकर

Image
( जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पूज्य साने गुरुजींचे सच्चे अनुयायी, सामाजीक कार्यकर्ते प्रकाशभाई मोहाडीकरांना आज त्यांच्या जन्म  शताब्दीबद्दल विनम्र आदरांजली )   नुकतेच ७१ सालचे भारत पाकीस्तान युद्ध संपले होते. शिवाजी पार्कवर नित्याप्रमाणे भव्य प्रमाणात २६ जानेवारीला ' बालक मेळावा साजरा होणार होता. संगीतकार वसंत देसाई यांचा वाद्यवृंद नित्याप्रमाणे  राष्ट्रगीत वाजवणार होता. त्यासाठी  शासनाच्या सांस्कृतीक खात्यातर्फे एक स्मरणीका प्रसीद्ध करण्यात येणार होती.  त्याचे काम माझ्यावर सोपवले होते. त्यासाठी मला त्या बालक मेळाव्याचे फोटो हवे होते. आणि काही काळ त्या चळवळीशी जुडले गेलेल्या यशवंत चौधरींनी माझा प्रश्न तात्काळ सोडवला. त्यांनी थेट मला दादरच्या साने गुरुजी विद्यालयात नेले व तेथे मला विद्यालयाचे सर्वेसर्वा श्री प्रकाशभाई मोहाडीकरांना भेटवीले. हीच माझी त्यादिवशी झालेली प्रकाश मोहाडीकर नांवाच्या एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असलेल्या, मानवता धर्म पाळणाऱ्या एका समाजसेवेकरी, साने गुरुजींचा सच्चा अनुयायी, दीन दुबळ्यांचा कैवारी असलेल्या एका समाजसेवकाची भेट झाली. आणि त्यांचे साधे परंतु

फॅमीली डॉक्टर ते कॉर्पोरेट डॉक्टर

Image
डॉक्टर हा साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक जिव्हाळ्याचा स्नेही समजला जात असे. तसे प्रत्येक कुटुंबाचा एक खास असा डॉक्टर ठरलेला असे. त्याला फॅमीली डॉक्टर म्हणून संबोधले जायचे. तसे हे लोक व्यावसायीक जरी असले, तरी आपल्या नोबल व्यवसायाशी प्रामाणीक असत. रुग्ण सेवेचे घेतलेले व्रत पूर्ण प्रामाणिकतेने पूर्ण करीत. आणि या डॉक्टरना संपूर्ण कुटुंबाची माहीती असे. ते घरात शिरत तेच घरातील वडीलधाऱ्या मंडळींची चौकशी करीत. त्यामुळे मूलतःच त्यांच्याशी एक अनामीक असे नाते निर्माण होई. मग रुग्णाची तपासणी, त्याचे पथ्यपाणी, वगैरे सांगून दवाखान्यातून औषध घेऊन जाण्यास सांगत. आम्हांला आमच्या लहानपणी त्यांच्या स्टेथोस्कोपचे नेहमीच एक औस्त्युक व कुतूहल वाटत असे. यातून त्यांना आजाराचे निदान कसे करता येते याबद्दल कुतूहल असे. एकदा हळूच मी ते कानांत घालून पोटाला लावताच मोठा आवाज आला अन तत्क्षणी मी ते कानातून काढले. पुढे याबाबत मी एका ओळखीच्या डॉक्टरांना विचारताच त्यांनी त्याचे साधे स्पष्टीकरण दिले ते असे, तुम्ही धान्याचा एखादा डबा घेऊन त्यावर टिचक्या मारून पहा. तो जर पूर्ण भरलेला असेल तर आवाज वेग