Posts

Showing posts from September, 2023

आमचा मिठू

Image
काल आमचा मिठू देवाघरी गेला. मिठू हा आमचा लाडका पोपट. तब्बल गेली पंचवीस वर्षे आमचे क्षण आनंदी करीत होता. मिठू हा मी जे.जे.चा डीन असतांना जेव्हां मी तेथिल डीन बंगल्यात रहात होतो, त्यावेळी म्हणजे १९९८ साली जन्मलेला. भर मुंबईत असूनही एखाद्या हील स्टेशनवर असल्याप्रमाणे भरगच्च झाडीने व्यापलेले आमचे जे.जे. कॅम्पस. आजूबाजूला सभोवार केवळ सिमेंटचे जंगल. त्यामुळे आमच्या आवारात सर्वच पक्षांचा वावर सुरु असे. त्यातही कावळ्यांनी जायबंदी केलेले अनेक पक्षी माझी पत्नि मलमपट्टी करून बरे झाल्यावर सोडून देत असे. त्यामुळे आमच्याकडे घार, कोकीळा, पोपट, घुबड, पाणकोंबडी खंड्या एवढेच काय, पण घोरपड देखील राहून गेली आहे. शिवाय दुर्मिळ असा पांढरा कावळा देखील हजेरी लावून आम्हांला प्रसीद्धी मिळवून देऊन गेला. असाच आमचं हा मिठू. नुकताच जन्मलेला, कावळ्यांनी टोचून घरट्यातून खाली पाडलेला. पूर्ण पिसेही अंगावर आली नव्हती. आणि तेथील एका शिपायाचा मुलगा त्याला आमच्याकडे घेवून आला. का कोण जाणे? त्याला पहाताच आम्हांला त्याच्याशी कांही ऋणानुबंध असल्याचे जाणवले.   त्त्याला सांभाळावे अशी मनोमन इच्छा मनांत निर्माण झाली. हळू हळु दुधा