Posts

Showing posts from December, 2018

सूर सम्राट रफी साहेब : अनकहे अनसूने

Image
मला लहानपणी जेव्हां गाणी आवडू लागली, समजू लागली, चित्रपट संगीताची गोडी वाटू लागली, तेव्हापासूनच महंमद रफी या नांवाने माझ्या मनावर गारुड घातलं. त्याकाळातील आमचे आवडीचे अन लोकप्रिय नायक होते, ते अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर असे आणि रफीसाहेब त्यांना आपला आवाज जेव्हां देत असत तेव्हां चक्क त्यांचे आवाज घेऊनच त्यांच्या अंतरंगात शिरून गात. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ताबा घेऊनच गीत सादर करीत. त्यामुळे त्यांचे गाणं कधीही रेडीओवर लागले, की ते गाणे चित्रपटांत कोणाच्या तोंडी आहे ते चटकन कळत असते. आणि गायकी सोबतच पार्श्व्गायन याचे रफी साहेब मानदंड ठरले. डिसेम्बरमधील एका थन्डीच्या सर्द रात्री, १९२४ सालच्या २४ तारखेला पंजाबमधील कोटला सुलतान सिंघ गावांत एका मुलाने जन्म घेऊन मोठ्याने रडून आपण आल्याची जाणीव जगाला करून दिली. हे त्या घरातील सातवे अपत्य असून मुलामध्ये चौथे अपत्य होते. आणि या बालकाचे नामकरण झाले 'महंमद रफी!' जे नांव पुढे संपूर्ण जगावर अधीराज्य गाजवणारे ठरले. दोन वर्षांनी हे कुटुंब त्यावेळच्या अखंड भारतातील लाहोर येथे स्थलांतरीत झाले. त्यावेळी 'फिक

प्रतीकाचा प्रभाव:

Image
  त्याच्या मित्राच्या बावीसाव्या वाढदिवसानिमीत्त पार्टी होती. या पार्टीमध्ये 'नेटिव्ह्ज अँड कलोनिअल्स' या विषयांवर फॅन्सी ड्रेस परीधान करण्याचा ड्रेस कोड ठरला होता. तेथे तो नाझी गणवेषात होता. दंडावरील पट्ट्यावर नाझी स्वस्तिकाचे चिन्ह होते. आणि नेमका तो क्षण 'सन' या वृत्तपत्राने कॅमेऱ्यात पकडला. अन दुसऱ्या दिवशी तो वृत्तपत्रात प्रसीद्ध झाल्यावर अवघ्या युरोपात खळबळ उडाली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून ब्रिटनच्या राजघराण्याचा वारस राजपूत्र हॅरी होता. आणि त्यामुळे ब्रिटिश जनमानसात संतापाची लाट उसळली. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी जर्मनीने ज्यू वंशीयांची जी कत्तल केली, व ज्या छळछ्यावण्यामध्ये हे क्रूर प्रकार घडले, ते अद्यापही जगभरातील जनतेच्या उरात ठासून बसले आहेत. पुढे नाझी जर्मनीचा पाडाव करून अश्विच छळछावण्यातून मित्र राष्ट्रांनी ज्यूंची सुटका केली. त्या गोष्टीला त्या वर्षी साठ वर्षे पूर्ण होत होती. त्या निमीत्त ब्रिटनमध्ये विविध कार्यक्रमांची आखणीही सुरु होती. आणि या अश्या परीस्थितीत राजपूत्र हॅरीचे वर्तन ब्रिटिश जनतेला अयोग्य वाटले. त

विवाह एक समारंभ : कालचा आणि आजचा

Image
विवाह समारंभ हा अगदी बालपणापासून एक औत्सुक्याचा, आनंदाचा, कुतूहलाचा विषय असे. त्या बालवयात आनंद असे तो नवीन कपड्यांचा. अर्थात आतासारखे ते मॉल मधून आणलेले तयार ब्रॅंडेड नसत. किंवा मोठी माणसे आताप्रमाणे डिझाइनर कुडते सलवारी घातलेले नसत. मात्र मुलाबाळाना, स्त्रीपुरुषांना नवीन कपड्यांचे पेहराव मात्र करावे लागत. प्रत्येकाच्या डोक्यावर कोणत्याही लग्नाला जाताना टोपी मात्र अवश्य लागे. तो एक शुभ संकेत होता. मुलांना क्वचितच कधी फुल प्यांट मिळत असे एरवी अर्ध्या चड्डीवरच साधारण ११ वी पर्यंत घालावी लागत असे. अर्थात हा जो काळ मी सांगतो आहे तो ५० व्या शतकातील आहे. गावाकडे शेतकरी लोकांकडे लग्ने व्हायची ती डोक्यावर भले मोठे भेंडाचे बनवलेले बाशींग असायचे. हातात एक कट्यार घेऊन असलेल्या नवऱ्याच्या सोबत करा आणिदिवा धरलेली करवली असे. नंतर सुरु होत असे ती अखेरची प्रथा. प्रत्येक माणसाने दिलेला आहेर जोराने ओरडून सर्वांना सांगण्यात येत असे. नंतर वरातीच्या वेळी अहेरात मिळालेली पिंपे, भांडी हे देखील डोक्यावरून  वरातीत नेण्यात येई. या वरातीमधील एक आवश्यक गोष्टी असते ती म्हणजे वरातीला आणलेला बॅंड! बॅंड

उंदीर मांजराचा धुडगूस : टॉम अँड जेरी

Image
कार्टून फिल्म ही नेहमीच आबालवृद्धांचे निर्भेळ मनोरंजन करीत असते. केवळ माणसेच नव्हेत, तर तुमच्या आसपासचे पक्षी, प्राणी एक गोडसे आणि निष्पाप असे रूप घेऊन तुमच्या मनोरंजनाला हजर असतात. तुमच्याशी खेळतात, हसतात, बागडतात. आणि तुम्हीही त्यात आपले वय विसरून पूर्णपणे मिसळून जाता. आज कार्टून म्हटले की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते जगविख्यात कलाकार वाॅल्ट डिस्ने. त्यांची अजरामर झालेली मिकी माउस, डोनाल्ड डक, गुफी, पिनाचिओ, पीटर प्यान ही पात्रे. एवढेच नव्हे तर जी जंगल बूक कलाकृती रुडयार्ड किपलींगने लिहीली आहे हे बहुतेकांना माहीतच नसते. त्याने अजरामर केलेली कार्टून फिल्म 'जंगल बुक'मुळे ती वाॅल्ट डिस्ने यांच्याच नांवावर खपवली जाते. एवढा पगडा बसवला आहे या डिस्ने यांच्या कार्टूननी! अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या कार्टूननी आपले क्षेत्र काबीज केले आहे. पण याच पात्रांइतकीच महत्वपूर्ण अशी एक जोडगोळी आपल्या खट्याळ कारवाईने जगभरातील दूरदर्शन संचावर धुमाकूळ घालीत असते. ही दोन पात्रे सर्वपरीचित आहेत, आणि ती आहेत 'टॉम अँड जेरी' ही मांजर व उंदराची जोडी. व त्याचे न