Posts

Showing posts from February, 2022

'बॉंबे स्कुल' कला परंपरेतील स्त्री चित्रकार : एक अभ्यासपूर्ण कला विषयक पुस्तक

Image
  नुकतेच श्रीमती साधना बहुळकर यांनी लिहीलेले ' बॉंबे स्कुल कला परंपरेतील स्त्री चित्रकार' हे कला विषयक पुस्तक वाचनात आले, आणि ते संपूर्ण पुस्तक वाचताना मला त्या काळातील चित्रकारांच्या जगात घेऊन गेले. साधना बहुळकर या मूळच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी. त्यांना चित्रे काढतानाच या चित्र परंपरेचा अभ्यास करण्याची  विलक्षण ओढ होती. त्यामुळे त्या अंगानेही त्या प्रगल्भ होत गेल्या. त्यांचा विवाह झाला तोही विख्यात चित्रकार श्री सुहास बहुळकर यांच्याशी. यामुळे त्यांच्या अभ्यासू मनाला शिक्षकी खतपाणी मिळणे हे ओघानेच आले. आपल्या आयुष्यात साधनाताईंनी अनेक भुमिका वठवील्या. चित्रकार त्या होत्याच, शिवाय प्रख्यात वृत्तपत्रे, नियतकालिके यातून चित्र समीक्षण त्या करीत असत. कांही काळ त्यांनी ॲनीमेशन फिल्मसाठी सहाय्यक चित्रकार म्हणून कार्यरत राहिल्या. कला समीक्षक म्हणून त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली. अर्थात मी त्यांना त्यांचा सुहास बहुळकर यांच्याशी विवाह होण्यापूर्वीपासून त्या साधना खडपेकर असल्यापासून ओळखत होतो. आमच्या उपयोजीत कलेच्या कांही उपक्रमावर देखील त्यांनी त्याकाळात नवशक्तीमधून लेख