Posts

Showing posts from May, 2020

आतिथ्यशील सेवेचे प्रतीक: एअर इंडियाचा महाराजा

Image
कांही वर्षांपूर्वी 'एअर इंडिया'च्या विमान सेवेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यामुळे झालेल्या समारंभाचा एक भाग म्हणून नरीमन पॉईंट वरील एअर इंडीयाच्या भव्य इमारतीवर प्रकाश योजनेमार्फत तिचे प्रतीक 'महाराजा' प्रोजेक्ट करण्यात आला होता. एअर इंडियाच्या या आतिथ्यशिल महाराजाला आबाल वृद्धापर्यंत सर्वच ओळखतात. किंबहुना कैक पिढ्या या महाराजांसोबत वाढल्या. महाराजांची अनेक रूपे त्यांनी पाहीली. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवास केलाही नसेल, तेही या महाराजाशी परिचित आहेत. अश्या लोकांनीही या महाराजाला आपल्यासोबत वागवीला. कधी टाय पीन म्हणून तर कधी दिवाणखान्यातील शोकेसवर विराजमान करून. कधी पत्रे लिहीण्याच्या स्टेशनरीतून तर कधी प्रवासी ब्यागेवर रुबाबात स्थानापन्न करून. मात्र आजच्या काळात हा महाराजा हळूहळू लुप्त होत चालला आहे. पण या महाराजांची निर्मिती आणि त्याचा येथपर्यंतचा प्रवास मोठा मजेशीर झालेला आहे. तो पाहण्यासाठी आपणाला सुमारे ८८ वर्षे मागे जावे लागेल. १५ ऑक्टोबर १८३२ चा दिवस होता तो. एका अठ्ठावीस वर्षे वयाच्या तरुणाने त्या दिवशी एकच इंजीन असलेल्या 'पूस मॉथ' जातीच्या विम

अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.

Image
नागपूरचे चित्रकला महाविद्यालय हे राज्याचे कला संचालनालय निर्माण होण्यापूर्वी तंत्र शिक्षण खात्याअंतर्गत पॉलीटेक्नीक कला विद्यालय म्हणून कार्यरत होते. तेथे तीन वर्षाचा पदवीका अभ्यासक्रम सुरु होता. त्यामध्ये रंगकला, उपयोजीत कला, छायाचित्रण, शिल्पकला असे सर्वच विषय शिकवले जात असत. नंतर त्यांची पदवीका पूर्ण झाल्यानंतर अश्या विद्यार्थ्यांना सर जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालयात द्वितीय वर्षात प्रवेश मिळत असे. जे.जे.लाही पदवीका होती. पण ती पदवीला समान अशी होती. कारण या पदवीकेचा दर्जा पदवीला समकक्ष होता. असे अनेक विद्यार्थी तेव्हां जे.जे.मध्ये प्रवेश घेत. आणि १९६९ साली काही विद्यार्थी आले त्यामध्ये एक विद्यार्थी होता त्याचे नांव होते रमेश खापरे. मीही नुकताच त्यावेळी स्टाफ म्हणून जे.जे.मध्ये आलो होतो. आणि माझ्याच वर्गात हे विद्यार्थी होते. आमच्या वर्गप्रमुख होत्या प्रा. मीरा करंडे मॅडम. अन सोबतीला जवळजवळ आम्ही सात आठ स्टाफ. वर्ग कसा तुडुंब भरल्यागत वाटत असे. शिवाय व्हिजीटींग म्हणून व्ही. एस. गुर्जर, आंबेरकर, एल.एस.वाकणकर, रमेश कुलकर्णी, असे व्यावसायीक कलाकारही असत.   यात विद्यार्थी म्हणून दत्त

नशिबाने साथ न दिलेला दुर्लक्षीत कलाकार : इर्शाद हाशमी

Image
इर्शाद हाशमी हा वेगवेगळ्या स्तरावर आठवणीत राहीलेला आमचा मित्र. दोनच वर्षांनी जे .जे. मध्ये आमच्या मागे असलेला. त्यावेळी आमच्या जे.जे.चा नूरच कांही वेगळा होता. सुसंस्कृत असे कलासक्त कुटुंब, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. केवळ पन्नास विद्यार्थी एकेका वर्गात असल्याने विद्यार्थ्यांची सर्वच वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी मैत्री होत असे, व शिक्षक देखील प्रथम वर्ष ते शेवटच्या वर्ष्यातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वाना ओळखून असत. असाच हाशमी देखील त्याच्या बोलक्या स्वभावामुळे व त्याला अंगभूत लाभलेले नाट्यगुणामुळे आमच्या सहवासात आला. संस्थेच्या स्नेहसंमेलात भाग घेऊ लागला. आणि त्यातच तो अंतीम वर्षाला असताना मजलीसचा सेक्रेटरी झाला. मग वर्षभराचे सांस्कृतीक कार्यक्रम करणे, इतर विद्यार्थाना कामाला लावणे हे हाशमीचे काम ठरले. आणि यावेळी मी अध्यापक म्हणून जे.जे.ला लागलो होतो. जरी आम्ही शिक्षक विद्यार्थी असलो तरी पूर्वचे मैत्रीचे नाते जास्त घट्ट होते. हाशमीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर साधारणपणे वर्षभरानंतर आमच्याकडे सहाय्यक अधिव्याख्यात्याची जागा रिकामी झाली, त्यावर अधीष्ठाता हणमंते सरांनी हाशमीला त्या जागेव

कला शिक्षकाची प्रेरणा: हरीभाऊ हणमंते.

Image
ती १९३५ सालची गोष्ट होती. त्यावेळी जन्माला आलेला सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टमधील 'कमर्शिअल आर्ट' अथवा आताचा उपयोजीत कला विभाग दहा एक वर्षातच भरभराटीला आला होता. केवळ पैसा मिळवणारी व्यापारी चित्रकला न रहाता तिचे स्वरूप विचार प्रसारण म्हणून होऊ लागले होते. त्या वेळचे सर्वच शिक्षक ही कला शिकवतांना बहुदा पाश्चात मासीके अथवा वृत्तपत्रे यांचा आधार घेत असत. त्या आधारावर जाहीरातकलेच्या स्वाध्यायीका आखत असत. पण त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे घटकांची मांडणी करणे यावरच विशेष भर दिला जात असे. ड्रॉईंग हा विषय देखील पारंपारीक पद्धतीने शिकवला जाई. अश्या वेळी तेथे चौकस नजरेने वावरणाऱ्या एका शिक्षकाला या गोष्टी खटकू लागल्या. व त्यावर विचारपूर्वक ध्यान देऊन त्यांनी कांही अभ्यासपूर्ण स्वाध्यायीका आखण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला काहींनी याला विरोध दर्शवीला, पण शेवटी विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतीसाद व परीणाम पाहून त्या स्वाध्यायीका किती योग्य होत्या याची जाणीव सर्वांनाच आली. आणि हे क्रांतीकारी विचारांचे शिक्षक म्हणजे त्याच सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेचे पुढे अधिष्ठातापद भूषविलेले प्रा. हरीभाऊ हणमंते