Posts

Showing posts from August, 2020

सर्जनशील कलावंत, विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक : काशीनाथ साळवे.

Image
काशीनाथ साळवे हे नांव आल्यावर माझ्या डोळ्यासमोर येतात ते चक्क पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीचे जे.जे.संस्थांमधील सुवर्णमयी काळातील क्षण. आम्ही होतो उपयोजीत कला संस्थेत, तर काशीनाथ होता स्कुल ऑफ आर्टच्या पेंटींग विभागात. आमच्याकडे हणमंते, दामू केंकरे, साठ्ये, देसाई, पवार, तिरोडकर यासारखे निष्णांत असे शिक्षक होते, तसे तेथेही धोंड, पळशीकर, सुकडवाला, सोलापूरकर, वसंत परब,सोनावडेकर, साबण्णवार, संभाजी कदम, गजानन भागवत असे मातब्बर कला शिक्षक कार्यरत होते. तेथे काशीनाथ साळवे, प्रभाकर कोलते, वसंत सोनवणी, पॉल कोळी, रमेश कांबळी, असे मित्र असत. व आमच्याकडे मी, नागवेकर, खांबेकर, असे होतो. आमचेही तेथे तसेच त्यांचे आमच्याकडे येणेजाणे सुरु असे. आणि आम्हीही  सर्व समवयस्क व समविचाराचे असल्याने काशीनाथ साळवे, प्रभाकर कोलते, वसंत सोनवणी,  रमेश कांबळी, पॉल कोळी यांच्याशी आमची घनिष्ठ मैत्री झाली. विचारांची देवाण घेवांण होवू लागली काशीनाथ सत्यवान साळवे यांचा जन्म १९४४ सालचा अहमदनगर मधील. ते शिक्षणासाठी मुंबईला आले. १९६३ साली त्यांनी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधे पेंटींग विभागांत प्रवेश घेतला. तेथे त्य

पंचाहत्तरी पार :

Image
दोन वर्षांपूर्वी मी पंचाहत्तरी जवळ आलेला लेख लिहीला होता. आणि बघता बघता पंच्याहत्तरी आली आणि गेलीही! पाठोपाठ आता शहाहत्तरी देखील पार पडली.  वाटते की ही मधली दोन वर्षे न जाता दोन दिवसच गेले आहेत. इतके पटापट दिवस सरले. आणि गेले चार पाच महीने तर दिवस उजाडतो आणि सरतो एवढेच पहाणे नशीबी आले आहे. प्रत्येक पिढी आपल्या गत आयुष्याबद्दल बोलतांना नेहमी त्या भूतकाळात रमून 'आमच्या पिढीने हे पाहीले' असे प्रौढीने सांगत असते. आणि तेही खरेच आहे. कारण प्रत्येक पिढीला त्यांच्या काळात कांही उल्लेखनीय असे पहायला मिळतच असते. त्याबरोबरच ती पिढी वाढत असते, प्रगतीशील होत असते, आणि ती पिढी त्या आठवणी मोठ्या प्रेमाने आपल्या उराशी जपून असते. मात्र या सर्व गोष्टींना छेद देणारी गोष्ट केवळ आपल्याकडेच नाहीं तर संपूर्ण जगात हाहा:कार मांडणारी घडली. ती म्हणजे कोरोना. सगळ्या जगाला कुलूपबंद होऊन घरी बसायला लावणाऱ्या या कोरोना नावाच्या विषाणूने जगभर थैमान घातले. आणि पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून कोणीही कधीही न पाहीलेली अजब गोष्ट या पिढीने, नव्हे तर संपूर्ण जगाने पाहीली, अनुभवली. आणि सर्व जग स्तब्ध झाले. जगभर

बाल कला शिक्षणाचे मानसशास्त्रज्ञ : दत्ता परुळेकर

Image
'जन्माला येणारे प्रत्येक मूल कलाकार असते. चित्रकला त्याच्यात अंतर्भूत असते. मात्र त्या कलेला उमलायला, जागृत करायला आणि सकसपणे तीचे पोषण करायला मदत करणे व उत्तेजन देणे हे प्रत्येक कलाशिक्षकाचे कर्तव्य आहे. चित्रकला हा इतर विषयांच्या सोबत जाणारा एक विषय नसून त्याला एक गती आहे, ज्यामूळे विद्यार्थ्यांचा चोहोबाजूनी विकास होतो. मात्र बागेतील माळी ज्याप्रमाणे फुलांचा विकास नैसर्गीक पद्धतीने होईल हे पहातो, त्याप्रमाणे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्याच पद्धतीने विकसीत व्हायला देणे आवश्यक आहे. फक्त हे होत असतांना शिक्षकांनी त्यांना मदतीचा हात द्यायला हवा!' हे विचार होते कला क्षेत्रात, कला शिक्षण क्षेत्रात तसेच बाल चित्रकला क्षेत्रात एका विशिष्ट्य ध्येयाने काम करणाऱ्या एका झपाटलेल्या कलाकाराचे, थोर चित्रकार श्री दत्तात्रय रामचंद्र परुळेकर व पुढे आपल्या दत्ता परुळेकर या नावाने प्रसीद्ध पावलेल्या एका बाल कला शिक्षणतज्ज्ञाचे ! १ मार्च १९२२ रोजी जन्मलेल्या परुळेकरांना कला शिक्षण  घेण्यासाठी फार मोठे दीव्य करावे लागले.  ओरिएंटल शाळेंत विद्यार्थी असताना तेथील शिक्षक राजाभाऊ पाटकर यां

एक कलासक्त संपादक: राजेंद्र कुलकर्णी.

Image
 २००७ सालची गोष्ट आहे. मला माझ्या कार्यालयात अचानक एका फोन आला. समोरील व्यक्ती अगदी नाजुक आवाजात बोलत होती. ती म्हणाली, राजाध्यक्ष, मी 'चंद्रकांत' मासिकाचा संपादक राजेन्द्र कुलकर्णी बोलतो आहे. नुकतेच निधन पावलेले कला महर्षी के.बी.कुलकर्णी यांच्याकडे आपण चित्रकला शिकत होतात. तेव्हां आमच्या या वर्षाच्या 'चंद्रकांत'च्या दिवाळीअंकासाठी त्यांच्यावर तुम्ही एक लेख लिहावा अशी इच्छा आहे. प्रथमदर्शनीच आपल्या आवाजातील मार्दवावाटे  कुलकर्णीनी माझ्या मनात प्रवेश केला होता. तसे माझे गिरगांवात  नेहमीच जाणे-येणे असल्याने गिरगांवातील पोर्तूगीज चर्चच्या समोरील  महाराजा इमारतीतील पहिल्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयाचा बोर्ड नेहमीच दिसत असे. खाली एक डोक्याला लावायच्या विगचे दुकान होते. तसा काहीच बदल त्या भागात वर्षो न वर्षे झाला नव्हता. त्याच सोबत त्यांनी मला एकदा त्यांच्या कार्यालयात येण्याचीही विनंती केली. आणि मी त्यांच्या 'चंद्रकांत'च्या कार्यालयात पोचलो,  आणि मला एक आस्चर्याचा धक्काच बसला. माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या मार्दवी आवाजावरून जी त्यांची प्रतिमा उभी होती, त्यापेक्षा

आचार्य अत्रे : एक पूर्ण पुरुष

Image
( पंधरा वर्षांपूर्वी दैनिक सामनाच्या रवीवार आवृत्तीत माझा आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमीत्त शब्द सुमनांजली वाहणारा लेख प्रसीद्ध झाला होता. त्यावेळी तो वाचून शिरीषताई पै यांनी मुद्दाम मला फोन करून लेख आवडल्याचे आवर्जून सांगीतले होते. त्यांना माझी आचार्य अत्रे स्मारकाची कल्पना खूप आवडली होती. व त्यानी त्याबाबत माझ्याशी त्यांनी चर्चाही केली होती.  आज तो लेख माझ्या फेसबुकवरील वाचक मित्रांसाठी मी तो देत आहे.)   आचार्य अत्रे यांच्या १३ ऑगस्ट रोजी येणाऱ्या १२२ व्या जयंतीनिमित्त या महापुरुषाला विनम्र श्रद्धांजली!   महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले, अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या महान व्यक्तिमत्वाचा क्रमांक बराच वरचा लागेल. १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथील शिवकालीन राघो बल्लाळ अत्रे यांच्या घराण्यात अत्रे यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षणही सासवड येथे झाले. त्याकाळी निरनिराळ्या नाटक कंपन्यांची नाटके