Posts

Showing posts from August, 2019

पंचाहत्तरी पूर्ण

Image
या मुंबई शहरात कोणीही येतांना त्याला समोर दोन रस्ते दिसतात. एक क्षणीक सुख दाखवणारा मोहाचा आणि दुसरा कठोर परीश्रम करायला लावून आपली परीक्षा घेणारा, तसेच त्याचे फळ भरभरून आपल्या पदरात टाकणारा कर्तव्याचा! प्रत्येकाने आपले ध्येय ठरवावे, आपणास भविष्यात काय हवे त्याचा. बरेच जण स्वीकारतात मोहाचा रस्ता जो पुढे त्यांना आपल्या आयुष्याची तुटकी फाटकी लक्तरं घेऊन हरलेल्या स्थितीत जगापुढं मान तुकवायला लावत असतो. आणि 'कठोर' परिश्रमाला पर्याय नाही' या उक्तीला  धरून चालणारा मात्र यशोदेवीची वरमाला गळ्यात घालून मिरवतो. सुदैवाने मला दुसरा मार्ग चोखाळायला मिळाला हे मला माझ्या मुंबईने दिलेले एक सुवर्ण लेणं आहे. गेल्या वर्षी मी माझ्या २९ ऑगस्टला होणाऱ्या आणि ७५ वे वर्ष लागलेल्या जन्म दिवसाला उद्देशून 'अवघे पाऊणशे वयमान'   नांवाचा लेख लिहून माझ्या गत आयुष्याचा एक धावता आढावा घेतला होता. माझे गुरुवर्य, सोबती, हितचिंतक या सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला होता. आणि पहाता पहाता ते संपूर्ण वर्षच असे कांही डोळ्यापुढून सरून गेले कीं ते आले कधी आणि गेले कधी हे देखील समजले नाहीं आणि पाहतो तो

सामाजीक बांधिलकीचा एक यशवंत कलाकार : यशवंत चौधरी

Image
एखादी व्यक्ती कोणाच्या भेटीला जाते, त्यामागे कांहीतरी उद्देश असतो. त्या व्यक्तीशी त्याची कधीच भेट झालेली नसते. त्यामुळे भेट घेण्याच्या संदर्भात ती व्यक्ती आपले व्हिजीटींग कार्ड प्रथम पाठविते. त्या कार्डाचे स्वरूप, त्याचे संकल्पन, त्यावरील त्याचे अथवा त्याच्या आस्थापनेचे बोधचिन्ह, त्यातील आकर्षकपणा हेच सर्वप्रथम एखाद्याची ओळख त्या व्यक्तीकडे आपण पोचण्यापूर्वी त्याला करून देत असते. त्यामुळे ते बोधचिन्ह व त्याचा वापर केलेल्या लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, पाकीटे आदी संकल्पनांना अतीशय महत्व आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे, तर साऱ्या जगात अश्या प्रकारे असलेल्या स्टेशनरीला अत्यंत महत्व आहे. आज आपल्या देशांत या बोधचिन्हांमधील कलात्मक आकार गुणांचे रचनात्मक संकल्पन करण्याचे व आपल्या देशाला या कला आणि विचार प्रसारणाची ओळख करून देण्यात आपल्या देशातील एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान भूषविलेले असे एक सर्जनशील कलावन्त प्रा. यशवंत चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे. खानदेशातील वाघाडे या गांवी २६ एप्रील १९३० रोजी यशवन्त चौधरी यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण तेथेच घेऊन कलेचा ध्यास असलेल्या चौधरींनी स

मिठ्ठास वाणीचा कलावन्त : रमेश कुलकर्णी

Image
रमेश कुलकर्णी. खरे पाहीले तर हे एक सामान्य नांव. अनेकजण धारण करणारे. पण जाहीरात क्षेत्राचा विचार करताना मात्र त्या क्षेत्रांत कर्तबगारी गाजविलेले ते एक असामान्य नांव होते. अनेकांच्या आदराचे स्थान  झालेले, विश्वासाला पात्र ठरलेले असे नांव ! कोकणातून मुंबईला स्वप्ने बाळगून येणाऱ्या अनेकांपैकी रमेश कुलकर्णीही एक होते. कोकणातील मसुरे येथे जन्मलेले कुलकर्णी आपले शालेय शिक्षण आटोपून मुंबईला येऊन सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेत दाखल झाले आणि त्यानी यशस्वीरीत्या आपला अभ्यासक्रम पूर्ण केला.  त्यानंतर आपल्या व्यावसायीक जीवनाची सुरुवात त्यांनी त्या काळच्या ' बोमास ' या आंतरराष्ट्रीय जाहीरात संस्थेत केली. बोमास ही भारतातील पाच प्रमूख जाहीरात कंपन्यांपैकी एक आंतरराष्ट्रीय जाहीरात कंपनी होती. नंतर तिचे नामकरण बेन्सन असे झाले व त्याही पुढे 'ओ. बी.एम. ( ओगील्वी, बेन्सन ॲंड मॅथर ) असे होऊन त्यामधून बेन्सन बाहेर पडल्यावर ती ‘ओ अँड एम’ राहीली व आता ती केवळ ‘ओगिल्व्ही’ या नावाने सुपरीचित आहे. कुलकर्णी ज्या काळात जाहीरात क्षेत्रात आले, त्या काळात सहजासहजी कोणीच वरच्या पदावर पोहोचू शकत नव्हते.