Posts

Showing posts from June, 2020

एक झाकोळलेला कलावन्त : रमाकांत देशपांडे

Image
मला अजूनही आठवते ती ३० जूनची संध्याकाळ. वरून धो धो पाऊस कोसळत होता. साडेसातची वेळ होती. रस्त्या रस्त्यातून पाणी भरल्यामुळे बाहेर पडणे देखील अश्यक्य झाले होते. अश्यातच माझे मित्र व जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता वसंत सोनवणी यांचा फोन आला. अन त्याने मन सुन्न करणारी बातमी दिली, रमाकांत देशपांडे गेले! रमाकांत देशपांडे  हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे धाकटे बंधू. आणखी एक त्यांचे बंधू होते ते उमाकांत. मात्र पु. ल. व उमाकांत हे जवळपास सारखे भासणारे बंधू होते, पण रमाकांत त्याहून एकदम वेगळे वाटत. उंच शरीरयष्टी, गोरा रंग, भेदक असे घारे डोळे, जणू एखाद्याच्या मनाचा ठाव घेत आहेत असे भासत. १९६० चे दशक पु.ल.नी आपल्या साहीत्य, नाट्य, प्रवासवर्णन, चित्रपट, संगीत या रूपाने अवघ्या महाराष्ट्रावर मोहीनी घातली होती. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, अंमलदार, बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात अशी एकापेक्षा एक सरस नाटके पु.ल. रंगभूमीवर आणत होते. रमाकांतही त्यातून कांही भूमिका करीत असत. त्यातील 'वाऱ्यावरची वरात' मधील 'गरुड छाप' तपकीर विक्रेता अन 'कामत मामा

खेळ सावल्यांचा : बाळ जोगळेकर

Image
'मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवन ग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटलेल्या असतात. कांही रेषा अस्पष्ट तर कांही खोलवर असतात.' वि.स.खांडेकरांचे हे वचन अनेकांच्या बाबतीत सत्य ठरते. पण माणसाची मुद्रा पाहून ती व्यक्ती आदराला प्राप्त होते, प्रचंड लोकसंग्रह करते, त्या मुद्रेवर सतत प्रसन्नतेचे व तृप्ततेचे भाव जाणवतात. असे एक हसतमुख आणि तडफदार व्यक्तीमत्व म्हणजे नामवंत छायाचित्रणकर विष्णू महादेव तथा फिल्मी दुनीयेत तसेच पत्रकारीतेत सुपारीचीत नांवाने प्रसीद्ध असलेले बाळ जोगळेकर. वसंतराव जोगळेकर, सुमतीबाई गुप्ते-जोगळेकर याच घराण्यांतील बाळ जोगळेकर हे नांव. वसंतरावांनी दिग्दर्शक म्हणून कीर्ती मिळवली. तर त्याच जोमाने बाळ जोगळेकरांनी सिने छायाचित्रण कलेत. जोगळेकर कुटुंब हे वऱ्हाडातले. यवतमाळ येथे २ जून १९२४ रोजी जन्मलेल्या बाळासाहेबांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. विदर्भातील सुखवस्तू घराण्यांपैकी त्यांचे एक असल्याने कटकटी तश्या वाट्याला आल्याचं नाहीत. अभ्यासासोबत मैदानी खेळांचीही आवड असल्याने त्याचाही सराव चालूच असे. मित्रमंडळीही होती ती देखील समविचारांची. तेथल्याच एका युवकान

अवतार वाल्मिकीचा : ग.दि.माडगूळकर

Image
पूजा अर्चा आटोपून वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमाकडे येत असतांना झाडावर त्यांना एक क्रौंच पक्षाचे जोडपे दिसले. एवढ्यात लपत छपत एक शिकारी तेथे आला आणि त्या निष्पाप पक्षाची हत्या करण्यासाठी त्याने आपल्या धनुष्याला बाण लावला. 'त्यांना मारू नको' असे सांगत वाल्मिकी ऋषी पुढे येत असतांनाच शिकाऱ्याच्या बाणाने विद्ध झालेला तो क्रौंच पक्षी वाल्मीकींच्या पायाजवळ येऊन पडला. त्या पक्षाच्या प्राणांतिक वेदना पाहून व्यथीत झालेल्या वाल्मिकींकडून 'रामायण या महाकाव्याचा जन्म झाला. या काव्याचा गोडवा, मतीतार्थ आजही प्रत्येकाच्या अंतःकरणात साठलेला आहे. आणि या वाल्मिकीचा पुनर्जन्मच पुढे या महाराष्ट्रात झाला. जणू काही त्यावेळची रामकथा घरोघरी, मनोमनी प्रत्येकाच्या ओठावर खेळवण्यासाठी आणि अंत:करणात रूजवण्यासाठी! आणि जणू ते महर्षी वाल्मिकी जन्माला आले १ ऑकटोबर, १९१९ रोजी सांगली जिल्ह्यांतील शेटफळ या खेडेगावांत. दिगंबर कुलकर्णी यांच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले, हेच पुढे प्रतिवाल्मिकी म्हणून घराघरात प्रसीद्ध पावले. नांवही ठेवण्यात आले ते बुद्धीच्या देवतेचे, गजानन. घरची परिस्थीती ओढाताणीची असल्यान

प्रतिभावंत शिल्पकार : नारायण सोनावडेकर

Image
प्राचीन काळात आपल्या भारतात शिल्पकला ही फार प्रगत झालेली होती. आपल्या प्राचीन मंदिरातील देवदेवतांच्या मुर्त्या त्याला साक्षीदार आहेत. पण ही शिल्पे युरोपीयन शिल्पकारांनी केलेल्या केवळ शरीर सौष्ठव दर्शवणाऱ्या नसून त्याकाळातही त्यांचे सुंदररीत्या केलेले सुलभीकरण, त्यातील लय, सौंदर्य या सर्वच बाबतीत भारतीय मूर्तीकला आघाडीवर होती. जेव्हां ब्रिटिश येथे आले तेंव्हां त्याचा बराच पगडा आपल्या चित्रकलेवर व शिल्पकलेवर पडला. पुढे चित्रकला, शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट या संस्थेची स्थापना झाली. व त्यातून अनेक कलाकार बाहेर पडू लागले. तो काळ म्हणजे ब्रिटीश कलाकारांना गौरविण्याचा, पारितोषिके मिळण्याचा होता. पण जे.जे.च्याच एका विद्यार्थ्याने तो रिवाज मोडून ब्रिटिशांच्या अहंकाराला एक धक्काच दिला. विद्यार्थी दशेतच त्याने आपले 'मंदीर पथ गामिनी' हे मंदीरात पूजेचे तबक घेऊन जाणाऱ्या एका घरंदाज सौंदर्यवतीचे शिल्प बनवले, त्याने देशभरात कीर्ती मिळवली. हाच विद्यार्थी पुढे रावबहादूर गणपतराव म्हात्रे या नांवाने नावाजले गेले. पुढे अनेक महान शिल्पे बनवून म्हात्रे यांन