Posts

Showing posts from July, 2019

पेस्टल रंगाचा बादशहा : चतुरस्त्र चित्रकार व्ही. एस. गुर्जर

Image
१९५० चे दशक म्हणजे एकापेक्षा एक चित्रकार रसिकांच्या मनाला आपल्या कलाविष्कारांनी भुरळ घालत होते. त्याचे स्वप्नरंजन करीत होते, आणी एकापेक्षा एक अश्या कलाकृती निर्माण करून रसिकांच्या मनाची तृप्ती करीत होते. त्यामध्ये होते ते चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, एस. एम. पंडीत. या तिघांनी तर साऱ्या रसिकांना आपसात वाटून घेतले होते. शिवाय आणकीही कांही आघाडीचे चित्रकार यात कार्यरत होते. आणि तेही पेंटींग या विषयात प्रावीण्य मिळवून देखील उपयोजीत कला अर्थात त्या काळाप्रमाणे प्रचलीत असलेल्या कमर्शिअल आर्ट मध्ये काम करीत होते. आणि तेही आपल्या कामात इतके वाकबगार असत की बरेच होतकरू कलाकार त्यांच्या कलेचा मागोवा घेत आपली वाटचाल सुरु ठेवीत. अश्या नामवंत आणि निष्णात कलाकारांपैकी कांही म्हणजे प्र.ग.शिरूर, पंडीत सातवळेकर, माधवराव सातवळेकर, द.ग.गोडसे, व्ही. एस. माळी, मुरलीधर आचरेकर, मनोहर जोशी, रवी परांजपे, ग.ना.जाधव, बसवंत महामुनी, ठाकूर विटणकर आदी कलाकार मराठी रसिकांच्या मनात आपल्या कलाविष्काराने अधिराज्य गाजवीत होते. यातील बरेच जण आमच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये आम्हांला मार्गदर्शन करण्यास

अभिजात कला आणि साहित्याचा सुरेख संगम : चित्रकार द.ग.गोडसे

Image
चित्रकार गोडसे यांचे नांव घेताच सर्वप्रथम नजरेसमोर येतात ती त्यांची प्रमाणबद्ध आणि शरीर सौष्ठव दाखवणारी रेखाटने, नाटकांसाठी त्यांनी केलेली त्यांची नेपथ्ये, अन त्याचसोबत त्यांनी केलेले सौंदर्य शास्त्राची मीमांसा करणारे त्यांचे विविधांगी लेखन. या विविध गोष्टींचे एकत्रीकरण गोडशांमध्ये असल्यामुळे चित्रकला क्षेत्रात तसेच नाट्य व साहित्याच्या वर्तुळात ते सुपरीचीत व आवडते होते. ' कोणत्याही कलाकृतीची निर्मीती होत असतांना ती एका विशीष्ट बिंदूपासून वेग घेत असते' हे त्यांचे आवडते सूत्र होते. झाडांची पाने एका ठरावीक आकाराचीच का होतात अथवा अंड्याचे आकार एकसारखे का ? याचा ते  मोठ्या चिकिस्तक पद्धतीने शोध घेत असत. व त्यावरील आपली अभ्यासू मते ठामपणे मांडत असत. दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म खानदेशातील वदोडे येथे ३ जुलै १९१४ साली त्यांच्या आजोळी झाला.  गोडश्यांच्या जन्म वेळेची कथाही तितकीच वेधक म्हटली पाहीजे. आईचे दिवस भरलेले. बाळंतपणासाठी माहेरी जायचे ते पूर्णा नदी ओलांडून. तिला जातांना उलट्या बाजेवर बसवून भोई ती ओढत नदी पार करीत होते. भर आषाढाची वेळ. नदीचा प्रवाह फुगला, आणि त्या ब

अर्नाळकरांची रहस्यमय नगरी

Image
बाबुराव अर्नाळकर या नावाचे  आमच्याच काय, पण १९५० ते पुढील पंचवीस एक वर्षे सर्वांच्याच मनावर एक प्रकारचे गारुड होते. याला कारण होते त्यांच्या दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या उत्कंठापूर्ण रहस्यकथा. अगदी दहा वर्षाच्या बालकापासून ते ऐन्शी वर्ष्यांच्या आजोबांपर्यंत सर्वानाच या रहस्यकथांनी वेड लावले होते. त्याची कित्येक पारायणे आम्ही करीत असू. एवढा प्रचंड प्रभाव या अर्नाळकरांच्या रहस्यमालाचा सर्व मराठी माणसांवर होता. लायब्ररीत गेले की त्याचे नवीन आलेले पुस्तक आपणाला मिळावे यासाठी सर्वच जण तत्पर असत.शाळेतील विध्यार्थ्यांच्या दप्तरातही ही पुस्तके दिसत. काहीजण तर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात लपवून वर्गात त्याचे वाचन करीत, एकमेकांशी देवाण घेवाण करीत असत. आणि वर्गात त्यातील कथानकावर चर्चाही करीत. बाबुराव अर्नाळकरांचे मूळ नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण. वसईतील अर्नाळा या गावी ९ जून १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे ते वसईला त्यांच्या मावशीकडे आले. परत अर्नाळ्याला शाळेत जाऊ लागले. तेथे केवळ तिसरीपर्यंतच  शिक्षणाची सोय असल्याने पुढे त्यांची मावशी त्यांना घेऊन मुंबईला आली. तेथे आर्यन शाळेत त्यांनी नाव घातले, आणि