Posts

Showing posts from February, 2020

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

Image
आज २६ फेब्रूवारी २०२०. चोपन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले.  त्या आधी " आत्महत्या आणि आत्मार्पण " हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईच

चित्रमंदीरातील तपस्वी : कला महर्षी के.बी.कुलकर्णी

Image
( बेळगांवचे विख्यात कलाकार व ज्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या निर्माण केल्या ते के.बी. कुलकर्णी सर  यांची जन्म शताब्दी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु होत आहे. बेळगांवात ती आज त्यांनी घडवीलेले त्यांचे माजी विद्यार्थी, त्यांचे स्नेही हे सर्व कलाप्रेमी मोठ्या प्रमाणात साजरी करीत आहेत. त्या निमित्ताने माझ्या गुरूना माझ्याकडून ही शब्दांचे भावपूर्ण अभिवादन! ) आजच्या पिढीला गुरु - शिष्य परंपरेबद्दल कितपत माहीत आहे, अथवा तसे शिक्षण घेतल्याची जाणीव आहे माहीत नाही. कारण आता शिक्षण एक पवित्र अशी परंपरा राहीली नसून ते एक अर्थार्जनाचे साधन बनले आहे. तरीही अजूनही संगीत, चित्रकला सारख्या क्षेत्रांत ही पवित्र परंपरा जोपासली जाते. शिक्षक -विद्यार्थी मध्ये एक जे व्यावहारीक नाते आज पाहीले जाते, ते गुरु- शिष्यामधे एका घट्ट अश्या पवित्र बंधनाने विणले जाते. एकदा चित्रकार वासुदेव कामतांनी म्हटले होते की, 'मला कांही असे चित्रकलेचे विद्यार्थी पहायला मिळाले, जे आपली कला निपुणतेने सादर करीत होते. मला हे विद्यार्थी जे.जे.स्कुल मध्ये पहायला मिळाले नाहीत, नाशीक अथवा पुण्याच्या कला महाविद्यालयात मल