Posts

Showing posts from November, 2019

सौ. भारती : माझी सहचारीणी

Image
मला अजूनही आठवतो तो दिवस. १ डिसेंबर १९६८. त्यादिवशी मी जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागलो. तो दिवस रवीवार असल्याने मी दोन तारखेला कामावर रुजू झालो. तसे जे.जे. मला नवीन नव्हते. अगदी बालपणापासूनच त्याची लागलेली ओढ माझ्या वडीलबंधूंनी पूर्ण करून मला तेथील जे.जे. इंस्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचा विध्यार्थी हे नामाबिधान लावण्याची संधी मिळवून दिली. या काळात अनेक जणांच्या आशीर्वादाचे हात माझ्या मस्तकावर मला लाभले. त्यामुळे येथे अध्यापक म्हणून आल्यावर मला सर्वप्रथम जाणवले ते माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या जे.जे.त मी परत आल्याची सुखद जाणीव. फरक इतकाच होता, की यापूर्वी मी घोळक्यासह शिक्षकांच्या टेबलासमोर उभा असे, ते आता माझ्यासमोर माझ्या विद्यार्थ्यांचा घोळका समोर घेऊन. आणि माझे सर्वच गुरुवर्य सोबत असतांना आणि त्यांचे प्रेम मला सतत लाभत असताना मला त्यांच्या शेजारी बसण्याचे भाग्य लाभले हे देखील ईश्वराने मला दिलेले लेणं होते. आणि तेथून सुरु झाली ती माझी शिक्षकी पेशातील वाटचाल. शाळेत असल्यापासूनच आम्ही सर्व मुलांच्या शाळेत शिकलो असल्याने येथील वर्गात असल

आठवणीतील विध्यार्थी : उद्धव ठाकरे.

Image
शिक्षकी पेशातील लोकांना एक गोष्ट फायद्याची असते. त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या पुढे सरकत असतात. त्यापैकी कित्येक विद्यार्थी त्यांच्या भावी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावारूपाला येतात. चित्रकलेसारख्या नैपुण्य क्षेत्रात असलेलं विध्यार्थी कलेच्या निरनिराळ्या दालनात आपले प्रावीण्य दाखवितात. यातले काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे ऋण मानतात. कारण शिक्षकांनी त्यांच्यावर संस्कार घडवलेले असतात, त्यांना ज्ञानदान केलेलं असते. काहीवेळा एखादा विद्यार्थी नावारूपाला आला की तो आपला विद्यार्थी होता असे एखादा शिक्षक त्याचे गुणगान गात असतो. पण कांही विध्यार्थी मात्र त्यांच्या शिक्षकांच्या आयुष्यात केवळ अविस्मरणीय असतात. आजच्या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी शाळेत अथवा महाविद्यालयात असेल तर तेथील काही विद्यार्थी व शिक्षकच त्यांना त्यांच्या मोठेपणाची जाणीव करून देत असतात, आणि त्या विद्यार्थ्याला देखील आपल्या घराण्याच्या मोठेपणावर त्याला मिळणाऱ्या मानाची कल्पना येते, आणि तो विद्यार्थी सुद्धा त्याप्रमाणे वर्तन करू लागतो. पण यालाही अपवाद असलेले कैक विद्यार्थी आप

खाकीतील 'तुळशी वृंदावन' :

Image
अरवींद इनामदार यांच्या सहवासातील कांही क्षण.  तुडुंब भरलेले दादरचे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह. व्यासपीठावर मंगेश पाडगावकर, दाजीशास्त्री पणशीकर, किरण शांताराम असे दिग्गज. अध्यक्षांना त्यांचे चार शब्द बोलाविण्यासाठी पाचारण केले जाते. माईक जवळ एक देखणी, गोरीपान, आकर्षक व्यक्तिमत्वाची, उंचीपुरी व्यक्ती येऊन माईकचा ताबा घेते. आणि उपस्थित श्रोत्यांना उद्देशून त्यांचे स्वागत करताना आपल्या धीरगंभीर आवाजात म्हणते, " येथे बसलेल्या सर्व बंधू भगिनींना सेवानिवृत्त झालेल्या पांडू हवालदाराचा नमस्कार !" आणि सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून निघते. तर ही सभा प्रथम दर्शनीच जिंकणारे वक्ते असतात महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय पोलीस महासंचालक, आदरणीय श्री अरविंद इनामदार ! 
अरविंद इनामदार पोलीस खात्यात असूनही त्यांचा साहित्य, काव्य, संत वाङ्मय, शेरोशायरी यावरील अभ्यास आणि अधिकार निर्विवाद आहे. आणि त्याचबरोबर भाषण करतेवेळी त्याला ते जी अभिनयाची जोड देत, ती तर शब्दांना जिवंत करण्याची कलाच त्यांना साध्य होती. वरील प्रसंग होता सावरकर सभागृहात होणाऱ्या माजी पोलीस अधिकारी श्री संजीव क