Posts

Showing posts from June, 2019

निसर्गाचा चित्रकार : प्रा. प्रल्हाद धोंड

Image
सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट. आशीया खंडातील एक विख्यात असे कला महाविद्यालय. याचा वारसा चालविणारे अनेक कलाकार या वास्तूने निर्माण केले. हे सर्वच कलाकार आपल्या नांवाने जे.जे.स्कुलची ओळख बनले. ह्यांची नावेही तोलामोलाची होती. त्यापैकी एक नांव जे जलरंगाचा बादशहा म्हणून ओळखले जाई ते होते निसर्ग चित्रकार प्रल्हाद अनंत उर्फ भाई धोंड.  ११ नोव्हेंबर १९०८ साली रत्नागीरीत जन्मलेल्या प्रा. प्रल्हाद अनंत धोंडांचे बालपण गेले ते मालवण व त्याच्या परीसरात, व नयनरम्य अश्या निसर्गाच्या सान्नीध्यात ते वाढले. त्यामुळे निसर्गाचा ओढा त्यांना सतत लागला. कोकणातील निसर्ग हा सागरी किनाऱ्यावर वावरणारा. त्या निसर्गाची सोबत त्यांनी आयुष्यभर केली. ते गाजले तेच मुळी निसर्गचित्रकार म्हणून! त्यांचे शालेय शिक्षण मालवणात झाले. मराठी शाळेत असताना ड्रॉईंग हा विषय त्यांना खास आवडीचा होता. त्यांचे मामाच ड्रॉईंग शिकवायला वर्गावर येत. झ्यांटे मास्तर हे त्यांचे नांव. आणि येथेच त्यांनी आपल्या एलिमेंटरी व इंटरमिजीएट ह्या ड्राॅईंगच्या परीक्षा  दिल्या व  त्यात ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. चित्रकलेच्या पेशातला पायाच झ्यांटे मास्तर

मृत्यूलाही आलिंगन देणारा कोमल मनाचा कवी: अशोकजी परांजपे

Image
माझ्या जे.जे. उपयोजीत कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पुढे शिक्षक अश्या दोन्ही वास्तव्याचा एक प्रकारे मला लाभच झाला. एक म्हणजे आम्हांला लाभलेले निष्णात असे शिक्षक, आणि त्याच सोबत त्यांच्या योगदानामुळे  निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचे असलेले परिचीत, ज्यांचा राबता आमच्या संस्थेकडे सतत असे. त्यांचाही संपर्क म्हणा, सहवास म्हणा मला थोड्या फार प्रमाणात लाभला. विशेष करून आमच्या संस्थेतील प्राध्यापक दामू केंकरे, षांताराम पवार हे दोघेही नाट्य श्रुष्टीशी जडलेले होते. त्यांच्याकडे येणारेही तसेच मातब्बर असत. त्या काळात नांव गाजवलेले असत. त्यात असत ते कमलाकर सारंग, राघवेंद्र चव्हाण, सुलभा देशपांडे, कमलाकर सोनटक्के, शशीकांत निकते, माधव वाटवे, अरुण जोगळेकर, असे अभिनेते, वसंत सबनीस, मनोहर काटदरे, शं. ना नवरे, विनायक खेडेकर असे लेखक असत. मनोहर ओक, चिं.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू, अशोकजी परांजपे यासारखे कवी असत. व यात सामायीक सूत्रचालन करणारे आमचे गुरु डॉ. गजानन मंगेश अथवा बंडू रेगे असत. केंकरेंच्या प्रत्येक समारंभाला हजेरी लावणारे जयवंत दळवी व मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे देखील असत.  ह्या सर्वा