Posts

Showing posts from January, 2023

 झाकोळलेले कलावंत: जॉन लॉकवुड किपलींग

Image
  कला, साहीत्य, काव्य या क्षेत्रांचा एकमेकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. साहीत्य-काव्य या प्रकारांना मुखपृष्ठ, बोधचित्रे या प्रकाराने नटवून कलाकार ते अधीक वाचनीय करतो. पण  साहित्याचे क्षेत्र व वाचक संख्येने अधीक असल्याने त्यांचे नांव सर्वतोमुखी होते. त्या तुलनेने कला क्षेत्र मर्यादीत असते. तिच्या निर्मितीचा आनंद प्रत्येक रसीक अनुभवतो. पण तरीही कित्येकदा त्यामागील कलाकार मात्र तितकासा प्रसिद्धीला येत नाही. किंबहुना साहित्यिक पुढील कित्येक पिढ्या आपल्या लेखनाद्वारे ज्ञात असतो. पण कलाकार त्याच्या कलाकृती अमर असूनही कित्येकदा विस्मृतीत जातो.   अशीच एक पिता पुत्राची जोडी कला व साहीत्य क्षेत्रात अजरामर झाली. तीही जन्माने ब्रिटिश असूनही भारतीय संस्कृतीशी त्यांचे नाते जुळले. हे पिता पुत्र म्हणजे जगप्रसीध्द साहित्यिक- कवी, नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलिंग व त्यांचे वडील नामांकीत चित्रकार-कला शिक्षक, वास्तुविशारद, शिल्पकार जॉन लॉकवुड किपलिंग हे होत! या लॉकवुड किपलिंग यांचे भारतातील आगमनही मोठे आश्चर्यकारक होते. अंगी विविध कला असणाऱ्या लॉकवुड यांचा जन्म १८३७ सालचा. त्यांच्या वयाच्या चौदाव्य