Posts

Showing posts from February, 2021

सात्वीक मनाचा सोज्वळ, अध्यात्मिक चित्रकार : जिवाजी भिकाजी दीक्षित.

Image
  अगदी प्राथमीक शाळेत असल्यापासूनआमच्या घरी येणाऱ्या त्या काळातील मासीकातील 'प्रसाद' हे सुप्रसीध्द मासीक माझ्या आवडीचे होते. त्याचे संपादक मंडळ होते तेही अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामध्ये संपादक म्हणून  य.गो.जोशी, स.आ.जोगळेकर, सोनोपंत दांडेकर अश्या तीन व्यक्ती होत्या. या मासिकात संत वाङ्मय, ललित लेख, पौराणीक कथा असे बरेच वाचनीय साहीत्य असे. आणि हे सर्व वाचायला उद्युक्त करीत असे ते त्यात असलेल्या कथांची, मुखपृष्ठाची चित्रे. अत्यंत सुंदर रीतीने काढलेली ही बोधचित्रे कथा विषय, त्यातील भाव दर्शन, त्यातील रचनात्मक मांडणी यामुळे मोहीत करीत असत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक आणि सहज सुंदर भाव, ज्यात केवळ असे तो सुशील आणि सोज्वळ पणा. आणि ही चित्रे रेखाटणारे कलावंत होते ते ही सात्विक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे. जिवाजी भिकाजी दीक्षित अथवा जि.भि.दीक्षित. केवळ त्यांच्या चित्रशैली मधूनच परमार्थाची ओळख करून देणारा एक मनस्वी कलावंत! या प्रसाद मासिकात त्याकाळी अनेक नामवंतांच्या कथा असत. शिवाय त्यांनीच त्याकाळात महाराष्ट्राला 'वेताळ पंचविशी'  'सिंहासन बत्तीशी&