Posts

Showing posts from September, 2018

बाप्पाचा महीमा

Image
एक दिवस असाच निघालो फेर फटका मारण्यास घराबाहेर दिसल्या झुंडीच्या झुंडी जाताना करत बाप्पाचा जयजयकार, प्रचंड घोषणा देत, स्वतःचा आवाज कमी पडेल की काय, म्हणून त्याला डी जे ची जोड देऊन फिल्मी गाण्यांच्या लयीवर नाचत गात,  साऱ्या गांवाला जागे करीत  गाढ झोपलेल्याना कर्ण कर्कश आवाजाने उठवून ऐकायला लावीत होते हा जयजयकार  म्हाताऱ्या कोतारे, मुले, गर्भवती महीला, झाडावरील पक्षी, प्राणी सर्वच जण उठले ऐकून हा ध्वनीचा गजर बाप्पा जागा व्हायच्या आधीच सर्व प्रजा उठून तत्पर म्हटले आपणही जावे बाप्पाच्या दर्शनाला सत्वर पहावे त्याला डोळे भरून, साठवून घ्यावे त्याचे रूप आपल्या मनांत करावे त्याला वंदन मनोमनी पाय वळले त्याच जथ्यात आणि चालू लागले वाट राजाच्या दर्शनाला पण जातो तो काय? सर्वत्र प्रचंड अश्या गर्दीच्या लोंढ्यात लांबच लांब माणसांच्या रांगा एक दुसऱ्याला दिसेना, दुसरा तिसऱ्याला ओळखेना तू कधी आलास? मी परवा, तू कधी? मी काल, मी तर रात्रभर येथेच झोपलो होतो, अश्या एकापेक्षा एक प्रतीक्रिया ऐकू येऊ लागल्या. पण या गर्दीत माझ्या बाप्पाला कसा मी शोधू? कसे त्याचे चरणस्पर्श करू? कसे त्याच्या पायावर माझे मस्तक टेक

अष्टपैलू झुंजार पत्रकार : माधव गडकरी.

Image
माधवराव गडकरी यांच्याशी माझी पहिली भेट झाली ती गोव्यात ते गोमंतकचे संपादक असताना. माझे वडील बंधू, पत्रकार ग.गो.राजाध्यक्ष यांच्यासोबत. दोघांचीही चांगली मैत्री होती. तसे माधवराव पत्रकारीतेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणूनच गणले जात. एक झुंजार असे पत्रकार. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ साली मुंबईत झाला. त्यांचे बालपण लेमिंग्टन रोडवरील टोपीवाला चाळीत गेले. पुढे ते ठाण्यात राहायला गेले.   जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे तासकर मास्तर त्यांचे आजोबा. तसे पाहीले तर या प्रतीभा संपन्न व्यक्तिमत्वाची पत्रकारीतेची सुरुवात झाली ती ठाण्यातील 'निर्धार' या साप्ताहिकातून. त्यानंतर दिल्ली येथे आकाशवाणीवर ते कार्यरत राहीले. पुढे १९६२ साली 
टाइम्स ग्रुपने महाराष्ट्र टाइम्स हे पहीले मराठी दैनिक सुरु केले, तेव्हा त्याचे पहीले संपादक होते द्वा. भ. कर्णिक. त्यांनी गडकऱ्यांना प्रथमच अश्या मोठ्या वृत्तपत्रात आणले, आणि गडकरी  महाराष्ट्र टाइम्सचे उप संपादक झाले. लोकसत्ता  ह्या सुप्रसीद्ध वृत्तपत्राशी स्पर्धा होती त्यांची.  तेथे सुमारे पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांना गोव्यामध्ये 'गोमंतक' या प्रसिध्द वृत्त

चित्रपट सृष्टीतील फुललेला वसंत : वसंतराव जोगळेकर

Image
आपल्या चित्रपट सृष्टीत कांही नांवे आदरणीय अशी आहेत, त्यापैकी एक नांव म्हणजे वसंतराव जोगळेकर. हिंदी मराठी अश्या दोन्ही चित्रपट निर्मितीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. एक गुणी, स्वरूपसुंदर, हसतमुख, कल्पक असे निर्माते दिग्दर्शक म्हणून वसंतरावांकडे आदराने पाहीले जाते. वसंतराव हे विदर्भातले. २५ सप्टेंबर १९१४ साली यवतमाळ येथे त्यांचा जन्म झाला. वडील प्रख्यात वकील होते. घरचे सधन. तो काळही छोटे कुटुंब असण्याचा नव्हता.  वसंतरावांच्या पाठीवर चार भाऊ ' आणि तीन भगीनी अश्या कुटुंबाने जोगळेकरांचा वाडा गजबजून गेला. म्याट्रीक पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाल्यावर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूर येथे वसंतराव गेले. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत त्यांचे घरी येणे होत असे. सर्व भावंडात देखणे असल्याने सर्वांचेच ते आवडते होते. त्यात त्यांना नाटके बसविणे, दिग्दर्शीत करणे याची खूप आवड होती. त्या काळात त्यांनी ' आंधळ्यांची शाळा' हे नाटक बसवले होते. पुढे कोल्हापूर येथे ' प्रफुल्ल' चित्र मध्ये वसंतरावांच्या 'चिमुकला संसार' या चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणून काम चालले होते. एका

ॲरो मॅन : जे.सी. लिएण्डेकर

Image
विसाव्या शतकाच्या आरंभाला अमेरीकन मोठी मासीके आणखीनच मोठी झाली. तो काळ ना फोटोग्राफीचा होता ना आधुनीक तंत्रज्ञानाचा. त्यामुळे अश्या दर्जेदार मासिकांना सजविणारे बोधचित्रकारही त्याच दर्जाचे असत. एकापेक्षा एक सरस असे. आणि यामुळे अमेरीकन प्रकाशन व्यवसायही मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रत्येक आठवड्याला हे कलाकार-बोधचित्रकार लाखो वाचकापर्यंत आपल्या मुद्रीत कलाकृती सादर करीत असत. अमेरीकन बोधचित्रांचे ते सुवर्णयुगच होते. आज दूरदर्शन जे कार्य करत आहे, ते त्या काळांत वृत्तपत्रे अथवा मासिकांमधून पानापानांतून विखूरलेली बोधचित्रे करीत असत. अश्या त्या चित्रयुगीन कालखंडात दोघा चित्रकारांनी स्त्री व पुरुष अशी दोन व्यक्तिमत्वे आपल्या कलेद्वारे अजरामर केली. त्यापैकी स्त्रीचे चित्रण करणारे चित्रकार होते चार्ल्स गिब्सन, ज्यांनी निर्माण केली 'गिब्सन गर्ल' ( जिने अमेरीकन स्त्रीला आधूनिक स्त्रीचे रूप दिले आणि पुढील कांही वर्षे अमेरीकन तिच्या प्रेमात पडले.) या गिब्सन गर्लने पूर्वीचा कांहीही वारसा नसलेल्या अमेरीकन स्त्रीचे नवे आलेख निर्माण केले. दुसरे पुरुषाचे व्यक्तित्व साकारणारे क

जाहीरातीत भारतीयत्व रुजवणारा सर्जनशील : पियूष पांडे

Image
भारतीय जाहीरात क्षेत्रांत कांही दिग्गजांनी तिचा चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य केले. ते होते भाई पत्की, अरुण कोलटकर, र.कृ. जोशी असे दिग्गज. जाहीरात क्षेत्रांत काम करणारे एक तर अमेरीकेसारख्या देशातून शिक्षण घेतलेले असत. त्यांच्यावर साहजीकच तेथील पगडा असे. सुंदर चेहऱ्याची मॉडेल्स, चकचकीत कपडे, रुबाबदारपणा, विशेषतः परदेशी जाहीरातींवर आधारीत या जाहीराती संकल्पीत केल्या जात. पण एका व्यक्तीने या जाहीरात क्षेत्रांत प्रवेश केला आणि या प्रकाराला छेद देण्याचा प्रयत्न केला. जाहीराती ह्या आपल्याला जवळच्या वाटाव्या, त्यातील लोक आपल्या आजूबाजूचे असावेत, त्यांची बोली ही आपलीच वाटावी इतकी घरगूती असावी या हेतूने त्याने जाहीराती संकल्पीत करण्यास आरंभ केला. आणि अल्पावधीतच त्यानं हे भारतीय जाहीरात क्षेत्र काबीज केले. आणि ही व्यक्ती म्हणजे 'ओ एन्ड एम' या जाहीरात संस्थेचे क्रिएटीव्ह डायरेक्टर श्री पियूष पांडे ! आरंभी पियूष पांडे यांनी ओ एन्ड एम मध्ये क्लायंट सर्विसींग पासून सुरुवात केली होती. पण अल्पावधीतच त्यांच्यातील सर्जनशीलता पाहून त्यांना क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून नेमले गेले.आणि सुरु झाला ए

वृत्तपत्रीय झंजावात : रुसी करंजीया

Image
आज वृत्तपत्रांची परिस्थिती फारशी आशादायक वाटत नाही. अनेक वृत्त वाहिन्यांचे आक्रमण हेही त्याला जबाबदार आहे. मग ती वृत्तपत्रे आपल्या अस्तित्व राखण्याकरीता इतरही अनेक उपक्रम सुरु करतात. आणि शेवटी त्यांची नाडी हातात असते ती त्यांच्या भांडवलदारी मालकांच्या हातात. त्यांच्या मतप्रणालीवरच संपादक वागत असतात. मग ते वृत्तपत्रातील असोत वा वृत्तवाहिन्यांतील. एखादा उत्पादक भरमसाठ जाहीराती देत असेल तर त्याच्या विरुद्ध कोणतीही बातमी छापायची नाही हा एक अलिखित संकेत असतो अश्या पत्रकारीतेचा.  मात्र आज आठवण येते ती पन्नास-साठच्या दशकांतील काही वृत्तपत्रांची. ज्यांनी वृत्तपत्रे एक धर्म म्हणून चालवली. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राबवली. कारण त्यामागील संपादक तसेच होते. प्रचंड ताकदीचे. अभ्यासाचे आणि मुख्य म्हणजे कोणाच्या खुशामतीवर न चालणारे. त्यावेळी नवशक्ती, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, मराठा, नवाकाळ, ही सारीच वृत्तपत्रे विविध मतप्रणालीच्या वाचकांमध्ये विभागली गेली होती. त्यातही या प्रभावी वृत्तपत्रामागे कणखर असा संपादक -मालक दिसत असे. यामध्ये लोकसत्ताचे रामनाथ गोएंका होते. लोकमान्यचे पां.वा

एशियन पेंटचा 'गट्टू' : डॉ. ग.मं.रेगे

Image
( ज्यांनी जाहीरात कलेच्या कल्पनेतून आम्हां अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविल्या, अनेकांना सुसंस्कृत केले, अश्या विद्वान, व्यासंगी, चतुरस्त्र, सर्जनशील कलाकार गुरूला, डॉ. गजानन मंगेश रेगे सरांना, आजच्या ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त आदरपूर्वक शब्द सुमनांजली )   कांही प्राध्यापक आपल्या कायमच्या लक्ष्यात राहतात ते, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या विद्ववत्तेमुळे, कांही त्यांच्या विक्षिप्तपणामुळे, त्यांच्या तुसडेपणामुळे तर कांही त्यांच्यात असे कोणतेच गुण नसल्यामुळे. पण आम्हांला लाभले ते एक गुरुवर्य ज्यांच्यात असे बरेचशे गुण होते. आपण वामनमूर्ती असलो तरी हे जग आपल्या पायाखाली नमवू अशी महत्वाकांक्षा बाळगणारे. कांहीशे कोपीष्ट, बरेचशे प्रेमळ असे. साधारणपणे आम्ही तृतीय वर्षात असतांना ते आमच्या वाट्याला आले. तत्पूर्वी जेजे मध्ये ते आम्हांला नेहमी दिसत असत. तेही अगदी त्यांच्या योग्यतेच्या अगदी जवळच्या व्यक्तीशीच त्यांचे संभाषण होत असे. त्यांच्या लेक्चरविषयी आम्ही वरीष्ठ विद्यार्थ्यांकडून ऐकत असू. त्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीबद्दलही बरेच ऐकून होतो. आणि त्या व्यक्तीचे नांव होते डॉ.