Posts

Showing posts from December, 2023

भाई मिरजकर

Image
  तो मला भेटला ते मी सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अँलिड आर्ट मध्ये १९६२ साली प्रवेश घेतला त्या वेळी. तोही तेथेच शिक्षण घेत होता. अत्यंत टापटिपीत राहणारा. त्यावेळच्या फीट अँड टाईट पॅन्ट वापरणारा. कपड्याच्या बाबतीत अत्यन्त चोखन्दळ. हातात एक सोन्याची बारीकशी चेन अन तोंडात नेहमीच दिसणारी चार मिनार सिगरेट. डोक्यावरील केंस बारीक केलेला अन डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा. हा मुलगा विद्यार्थी आहे की शिक्षक हा भ्रम मला पडत  असे. कारण कधी तो वर्गात काम करतांना दिसे, पण बहुदा षांताराम पवार, चिंतामण तिरोडकर, त्यावेळचे आमचे फेलो नरेंद्र वैउडे या शिक्षकांसोबत शासकीय कामे करताना स्टाफरूम मध्ये दिसे. शिवाय त्याची या लोकांशी अरे तुरे करून बोलण्याइतकी असलेली सलगी हेही एक कारण असे. मी प्रवेश घेतेवेळी मला रवी परांजपें सरांनी सांगीतले होते, की बेळगावच्या नॅंशनल कोल्ड्रींक हाऊस च्या मिरजकरांचा मुलगाही तेथेच शिकतो आहे. आता बहूदा शेवटच्या वर्षाला असेल. रमेश त्याचे नांव. एक दिवस कोणीतरी मला सांगितले की हा मुलगा तुमच्या बेळगावचाच आहे. तेव्हां मला समजलं की हाच तो रमेश मिरजकर. जे.जे.मधे आत्मविश्वासाने वावरत असणारा.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर

Image
  आज भारतातील जाहीरात कला ही केवळ भारतातच नव्हे, तर पाच्छात देशाबरोबर स्पर्धा करीत असल्याचे आपणास पहायला मिळते. आज जी जाहीरात कला, संभाषण कला अथवा उपयोजीत कला म्हणून आपण पहातो ती कशी विस्तारीत होत गेली याचा इतिहास देखील अभ्यासण्यासारखा होईल. आणि त्यासाठी आपल्याला सुमारे नव्वद वर्षे मागे जावे लागेल. १८५७ साली सर जमशेटजी जीजीभाई यांच्या प्रयत्नाने आणि आर्थीक सहाय्याने स्थापन झालेल्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयाने अल्पावधीतच उच्च दर्जावर प्रस्थान केले. आणि एकापेक्षा एक निपुण असा शिक्षकवर्ग या संस्थेला लाभला. संस्थेचे वरीष्ठ हे इंग्लंडवरून येतं असत. अन पुढे भारतीय कलाकार शिक्षक म्हणून लाभण्याचे भाग्य या संस्थेला लागले. त्यातही पुढे कॅप्टन ग्लॅडस्टन सालोमन हे संस्थाप्रमुख झाले. व त्यांनी भारतीय कलेला देखील येथे स्थान दिले. जोडीला त्यांचे असीस्टंट जेरार्ड हे आधुनिकतेकडे वळणारे. त्यामुळे आधुनीक कलेकडे वळणारे विद्यार्थी त्यांच्याकडे वळत.   सॉलोमन हे फाईन आर्टला उर्जितावस्था आणणारे होते. वास्तववादी कलेला प्राधान्य देणारे. पण पुढे जेव्हां सरकारच्या ध्यानात आले की या कला क्षेत्रा