Posts

Showing posts from January, 2022

दीनानाथ दलाल- चित्र आणि चरीत्र

Image
  २५ तारखेला दुपारी कुरिअरवाल्याने एक जाडजूड पार्सल आणून दिले. इतके व्यवस्थीत आणि नीटनेटके पार्सल उघडून पाहील्यावर आतून निघाले ते राजहंस प्रकाशनाचे एक नवीन प्रकाशन ' दीनानाथ दलाल -चित्रं आणि चरित्र' हे सुहास बहुळकर यांनी लिहीलेला आणि राजहंस ने प्रकाशीत केलेला ग्रंथ. वास्तवीक दलाल हे आमच्या लहानपणापासून आमच्या आवडीचे चित्रकार. तो काळच असं होता की मुळगांवकर आणि दलाल या दोघा कलाकारांनी समस्त मराठी घरातील माणसांना आपसात वाटून घेतले होते. आणि चित्रकलेचा ओढा लागण्याचे काम मुळगावकरांची मनमोहक सौंदर्ययुक्त चित्रे करीत असत, अन जरा चित्रकलेतील कळू लागले की आपोआप सर्वजण दलालांकडे वळत असत. त्यांची रंगीत चित्रे आम्ही त्यावर चौकोन आखून मोठी कॅनव्हासवर मोठी करून ऑइल पेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करीत असू. एवढे त्यावयात आमच्यात दलाल भिनले होते. त्यांची प्रसीद्ध झालेली सर्वच चित्रे आम्ही अंकातून कापून व्यवस्थीत जपून ठेवीत असू. पुढे जे.जे.मध्ये शिकायला आल्यावर केनेडी ब्रिजवरून जातांना पहील्या मजल्यावरील त्यांच्या स्टुडिओवरील 'दलाल आर्ट स्टुडीओ' ही दिमाखदार पितळी पाटी दिसत असे. वाटे की कधीत

सर्वांगसुंदर पाडेकर.

Image
  दत्तात्रय पाडेकर आणि त्यांची लयबद्ध सही ही सर्वच कलाकार, कलाविद्यार्थी, आणि कलारसीक यांच्या ओळखीची आहेच! पाडेकर हे सतत प्रयोगशील असतात. संपूर्ण कलाक्षेत्रात त्यांची चित्रे, त्यांची शैली, आणि त्यातील लयबद्धता याबद्दल माहीती आहे. असे हे पाडेकर सतत चित्रे आविष्कृत करण्यात मग्न असतात, त्यातूनही त्यांची ग्राफिक्स, प्रिन्टमेकींग, निसर्गचित्रे, बोधचित्रे, शिल्प अश्या चित्रकलेच्या विविध दालनातून मुक्त मुशाफिरी सुरु असते. आणि गंमत म्हणजे, निरनिराळी प्रदर्शने, चर्चासत्र, कला महाविद्यालयातून प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असलेले पाडेकर पाहणाऱ्याला बहुदा बाहेरच दिसत असतात. म्हणजे यांचा दिवस किती तासाचा असतो, हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतो, इतके ते चतुरस्त्र आहेत. पेहरावही कसा तर स्वच्छ असा खादीचा पांढरा कुडता आणि पांढरा पायजमा. यात कधीच बदल झाला नाही. किंबहुना ती त्यांची आता ओळख बनली आहे. विध्यार्थी दशेपासूनच बाहेरून संस्थेत मार्गदर्शनासाठी येणाऱ्या चित्रकाराकडूनही त्यांचे कौतुक केले जात असे. आणि यामुळेच थोर चित्रकार व्ही.एस.गुर्जर यांच्याशी त्यांचे अखेरपर्यंत सौख्य राहीले.