Posts

Showing posts from August, 2018

पंचाहत्तरीतला प्रवेश

Image
अखेर ' म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान ' म्हणत पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यावेळच्या बेळगांव जिल्ह्यातील (आताच्या कोल्हापूर ) कारवे या छोट्याश्या गावांत जन्माला आलेला मी अनेक टप्पे टोणपे खात सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या ओढीने मुंबईला पोचलो, आणि शेवटी येथेच स्थायीक झालो. माझे ध्येय तसे मी बालपणापासूनच ठरवले होते. सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टला जायचे आणि तेथूनच कला शिक्षण घ्यायचे हे माझे नक्की ठरले होते. आणि ते ध्येय अखेर साध्य झाले. एवढेच नव्हे तर माझ्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेशी संबंध जुळले तेही कायमचे. न तुटणारे. अनेक नाती जुळली. अनेक शिक्षक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले.  या संस्थेनें मला नांव दिले, एक चेहरा दिला, स्वतंत्र ओळख दिली. येथे शिकलो, तसेच पुढे शिकवू पण लागलो. खरं तर मीच माझ्या विद्यार्थ्यांकडून शिकू लागलो. कारण त्यांच्या समस्यांवर उपाय शोधताना बऱ्याच गोष्टी स्वतःला अभ्यासाव्या लागत.  त्यांच्याच कल्पना पुढे नेताना माझ्याही मनांत कल्पनेचे अंकूर फुटू लागत. त्यांच्याशी चर्चा ह्या विचार प्रसारणाची देवाण घेवाण बनू लागली. व खऱ्या अर्थाने तेथेच

निसर्गाचा मानवाला इषारा

Image
निसर्ग तरी पहा कसा लबाड आहे, हळूहळू माणसाच्या खोड्या उचलत आहे, स्वतःचा निष्पापपणा विसरून माणसाचे ढोंग साकारत आहे. आजपावेतो ऋतूचक्र तोलून मापून चालवत होता, पृथ्वीवर नंदनवन साकारत होता, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा योग्य वेळी बरसत होता, आपापल्या ऋतूंची लेणी भरभरून आकारत होता. उन्हाळ्यात धरतीला भाजून शेकत होता, त्याच तप्त जीवावर श्रावणधारा  बरसात होता, शेतकऱ्याला कधी आकाशाकडे नजर लावावी लागत नव्हती, बी पेरलं की धान्याची कोठारं भरली जात होती, उन्हाळ्यांत रोगराई पळून जात होती, नेमेची येणाऱ्या पावसाने धरती हिरवी शाल पांघरत होती, ऊन पाऊस थंडीने समतोल राखत होता, त्याची ददात प्राणीमात्राला पडू देत नव्हता. पण माणसाचा लोभ वाढत होता, निसर्गालाच ओरबाडायला निघाला होता, क्षुद्र मानवाची पोकळ धडपड निसर्ग गमतीने पहात होता, अती झाले की सपाट्याने वार करणार होता. जेव्हां निसर्गाला हे असह्य झाले, आपलेच लोक  आपल्याला ओरबडू लागले, उतू लागले मातू लागले, जगाला नष्ट करू लागले, निसर्गालाच आव्हान देऊ लागले पायाखाली त्यालाच नमवू लागले. तेव्हां निसर्गाने वटारले आपले डोळे, रजा घेऊन त्याने पलायन केले, जाताना ढगांना सो

आचार्य अत्रे : एक झुंजार पौरुष !

Image
(आचार्य अत्रे यांच्या १३ ऑगस्ट रोजी येणाऱ्या १२० व्या जयंतीनिमित्त या महापुरुषाला विनम्र श्रद्धांजली) महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या महान व्यक्तिमत्वाचा क्रमांक बराच वरचा लागेल. १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथील शिवकालीन राघो बल्लाळ अत्रे यांच्या घराण्यात अत्रे यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षणही सासवड येथे झाले. त्याकाळी निरनिराळ्या नाटक कंपन्यांची नाटके होत असत. शाळेत शिकत असतांना अत्र्यांनी ती पाहीली, तसेंच शाळेत बक्षीस मिळालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या चरित्रामुळे त्यांना वाचनाचा नाद जडला. मासीक मनोरंजनाचे अंक मिळवून त्यांचे वाचन करणे हे त्यांचे नित्याचे काम ठरले. आणि याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी गोविंद यांची राष्ट्रप्रेमाने ओथम्बलेली गीते, पोवाडे जनजागृतीचे महत्वाचे काम करीत होती. त्याचाही परीणाम अत्रे यांच्यावर झाला. म्यॅट्रीकला असताना अत्

•|| षांतारामायण ||• एका धगधगते स्थंडील शांत झाले !

Image
काय विचीत्र खेळ असतो नियतीने मांडलेला आपल्या या नश्वर जीवनांत ? दर वर्षी १७ ऑगस्ट रोजी आमच्या षांताराम पवार सरांच्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांचे अभीष्ट चिंतन करून त्यांच्यावर एक लेख फेसबुकवर लिहीत आलो आहे. यावर्षीही मी त्यांच्या येणाऱ्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझा लेख लिहीत होतो. एवढ्यात गीतालीचा, पवार सरांच्या मुलीचा फोन आला. म्हणाली, राजाकाका, पप्पांशी बोला. आणि फोनवर माझ्या सरांशी गप्पा सुरु झाल्या. एवढ्यात मी त्यांच्यावर लेख लिहितो आहे हे समजल्यावर त्यांनी वाचून दाखवायला सांगितले. मी एक परीच्छेद वाचला. एवढ्यात गीताली म्हणाली, ' काका, ते झोपले.' हेच त्यांच्याशी झालेले माझे शेवटचे बोलणे. आज सकाळी गंगाचा फोन आला आणि त्याने ती कानात तप्त तेल ओतणारी बातमी सांगीतली, ' पवार सर गेले ' आणि मी स्तब्ध झालो. आजवर त्यांच्यावर त्यांची कर्तबगारी, त्यांची कला कारकीर्द, त्यांचे सृजनशील काव्य अश्यासाठी शब्द फुलांची उधळण करणारे आम्ही, आता त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पण करायचे अप्रीय काम करण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करायला लागलो आहे. गेली अनेक वर्षे

चित्र सार्वभौम-रंग सम्राट: रघुवीर मुळगांवकर.

Image
गेल्या शतकात या महाराष्ट्रात विधात्याने अनेक कलाकार, साहित्यीक, गायक, संगीतकार, नाटककार, कवी अश्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींची अक्षरशः भरघोस निर्मिती केली. आजही ती नावे घेतली तर त्यानंतर प्रचंड पोकळी जाणवते. आणि हे सर्व कलावंत जन्माला आले तेही बहुदा एकाच सुमारास ! हे कलाकार जणू ईश्वरी वरदहस्त घेऊनच जन्माला आले होते. या लोकांनी केवळ आपल्या कलेची सेवाच केली असे नाही तर, अवघ्या महाराष्ट्रावर त्यांनी मोहीनी घातली, आपल्या कुंचल्याच्या ठसा उमटविला.संपूर्ण महाराष्ट्र स्वतः भोवती फिरवीला. अश्याच पैकी एक मनस्वी आणि दैवी देणे लाभलेले आणि आपल्या सामर्थ्यवान कुंचल्याने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सोडणारे चित्रकार म्हणजे रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगांवकर ! मुळगांवकर हे नाव त्यांच्या विशीष्ट शैलीमध्ये त्यांच्या आकर्षक आणि मनमोहक चित्रांच्या खाली नीटनेटकेपणे लिहिलेले पाहायला मिळे. त्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी त्यांचे नाव त्यांच्या चित्रांसह  सर्वांच्या तोंडी  झाले. त्या काळात मुळगांवकर आणि दलाल ह्या दोघां समकालीन चित्रकारांची नावे सर्वसृत  होती. त्यातही प्रामुख्याने मुळगांवकरांची चित्रे