Posts

Showing posts from November, 2021

मुंबई पोलीसातील एक मानवतावादी, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी मैत्री साधणारा सहाय्यक पोलिस आयुक्त : अविनाश धर्माधिकारी

Image
  आज मुंबई पोलीस खात्यात एकापेक्षा एक असे कर्तबगार पोलीस अधिकारी आहेत. पोलीस सेवेत असताना त्यांचा दिवस सर्वसाधारण माणसाप्रमाणे चोवीस तासांचा नसून तो चक्क छत्तीस तासांचा असतो. पोलीस अधिकारी हा कधीच रिकामा दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याची उकल त्यांना सतत करावी लागत असते. त्याशिवाय रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासोबतच कायदा व सुरक्षितता यांचेही रक्षण करावे लागते. या त्यांच्या मानसीक तणावामुळे कित्येकदा एखादा माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढल्यावर कदाचित दुखावला जातो. पण पोलीस खात्यातील अधिकारी वर्ग मात्र जनतेची मानसीक परिस्थिती जाणून त्यांच्या मनाला दुखावेल अशी कोणत्याही तऱ्हेची गोष्ट न करता शांतपणे, हळुवारपणे त्याच्याशी संभाषण साधून त्याच्या मनातील दुःखावर फुंकर घालतात. पण बहुतेक वेळा सामान्य लोकांचा या अधिकारी वर्गाशी फारसा संबंध येत नाही. त्यांचा बहुतेक संबंध येतो तो रस्त्यावरील हवालदाराशी, पोलीस शिपायाशी आणि त्यात कांही वेळा लोकांना कांही पोलिसांचा अनुभव बरा आलेला नसतो. व त्यावरून जनता सर्वच पोलीस खात्याबद्दल आपले मत बनवते. आणि हा पोलीस शिपाई त्या खात्याचा चेहरा होतो. आणि जनता व रात्र