Posts

Showing posts from May, 2021

काळाच्या पुढे पहाणारा द्रष्टा चित्रकार: ग. ना. जाधव

Image
  वाचनाचे वेड अन घरात वडीलांच्या वाचन व्यसनाने येणारी असंख्य पुस्तके, मासीके यामुळे माझे वाचनाचे वेड तर वाढलेच, शिवाय त्यासाठी चित्रे काढून सजवणारे चित्रकारही त्या मासिका - पुस्तकातून माझ्या परीचयाचे होत गेले.दर्जेदार अशी त्याकाळची ती मासिके, त्यात लिहिणारे तितकेच व्यासंगी आणि शैलीदार असे लेखक आणि त्यांच्या कथा-लेख आपल्या चित्रशैलींनी वाचनीय आणि आकर्षित करणारे चित्रकार ह्या सर्वांचा तो सुवर्ण काळ होता. आणि या प्रकाशनामागे तितकीच समर्थ अशी लेखन कौशल्य असणारी संपादक मंडळी असे. त्यामधे झंकार व अंजली काढणारे ना. सी. फडके, वसंतचे दत्तप्रसन्न काटदरे, हंस-मोहीनी-नवलचे अनंत अंतरकर, नवयुगचे आचार्य अत्रे, प्रसादचे य.गो.जोशी-स.आ.जोगळेकर-सोनोपंत दांडेकर, दीपलक्ष्मीचे ग.का.रायकर, आवाजचे मधुकर पाटकर  असे एकापेक्षा एक असे मातब्बर. या सर्वांचे त्यांच्या प्रकाशनासाठी चित्रकार ठरलेले असत. यात प्रामुख्याने दीनानाथ दलाल, एस.एम.पंडीत, रघुवीर मुळगांवकर, व्ही.एस.गुर्जर,प्र.ग.शिरूर, शि.द.फडणीस, शंतनू माळी, वसंत सरवटे असे नामांकीत चित्रकार होते. त्यामुळे त्यांच्या शैलीचीही ओळख घडून येत असे. आणि त्याकाळात एका द