Posts

Showing posts from January, 2021

एनसायक्लोपीडिया: व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्.

Image
भारतीय चित्रकार-शिल्पकार यांची जगाला ओळख करून देणारा चित्रकोश आज पाश्च्यात देशांच्या तुलनेने आपल्या भारतीय कलाकारांची-कला संस्थांची माहीती आपल्या देशात फारच थोडी उपलब्ध आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक सृजनशील चित्रकार-शिल्पकार काळाच्या उदरात गडप झाले, कित्येकांचे काम नजरेआड झाले, तर कित्येक कलाकार अनामीक राहीले. अश्या कलाकारांना लोकांसमोर आणण्याचे काम हे वास्तवीक शासनाच्या सांस्कृतीक विभागातर्फे व्हावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. शिवाय महाराष्ट्र राज्याने स्वत:चे असे  कला संचालनालय  स्पथापन केले आहे. त्यांच्याकडूनही असा दस्तावेज करणे गरजेचे आहे. पण आजवरचा अनुभव पहाता दृक कलेच्या बाबतीत शासनाची उदासीनता नेहमीच आढळून येते. आणि याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे 'राज्य कला प्रदर्शना'चे सोहळे. राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चित्रकार- शिल्पकार यांची नांवे चित्रपट, दूरदर्शन अभिनेत्यांच्या तुलनेने अभावानेच असतात. सांस्कृतीक खात्याच्या पुरस्कार सोहळ्याचा दिमाखदारपणा कला संचालनालयाच्या राज्य-पुरस्कार सोहळ्याला कधीच दिसत नाही. आज महाराष्ट्राकडे कलाकृती जतन करण्यासाठी अथवा त्या रसिकांसाठी प्रदर