Posts

Showing posts from September, 2020

एक अतूट नाते बंधन : प्रा. नरेंद्र विचारे.

Image
  एक वर्षी कांही विद्यार्थ्यांची एक बॅच माझ्याकडे आली. प्रविण घरत, सुनील वाकळे, सुभाष गोरेगांवकर, अरुण चिंदरकर, नरेंद्र विचारे, शेखर साळवी, दत्ता पाडेकर, अनील गांधी, विजय कुल्लरवार, बाळा राणे, असे विद्यार्थी व गीता राव, शैला कुलकर्णी, पुष्पा पाटील, भारती जोगळेकर( जी पुढे माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून आली), हेमा धुमटकर, रंजना कानविंदे अश्या विद्यार्थीनी असे अनेक आजही आठवणारे विद्यार्थी त्या बॅचमध्ये होते. वर्ग होता द्वितीय वर्षाचा. पुढे यात भर पडली ती नागपूरहून आलेल्या रमेश खापरे, प्रकाश बिसने या विद्यार्थ्यांची आणि नाना पाटेकराची. हे बहुतेक विद्यार्थी माझ्या जवळचे होते. त्यातही शेखर साळवी, नरेंद्र विचारे, रमेश खापरे, हे जरा जास्तीच जवळ आले. त्यालाही कारण होते. विचारेचे ड्रॉईंग उत्तम होते. शिवाय तो खेळही चांगले खेळायचा. विशेषतः खो खो, कब्बडी, व्हॉलीबॉल हे त्याचे आवडते व प्रावीण्य मिळवलेले खेळ.  पण होता सणकी  डोक्याचा. कधी भडकला तर बघायला नको. लालबाग परळची माती होती ती. खापरे तसा सौम्य प्रवृत्तीचा. पण मोठा बेरकी होता. तर शेखर साळवी हा सगळ्यांच्या मदतीला येणारा. नेहमी खाली मान घालून ब

नाट्यशास्त्राचे द्रोणाचार्य : कमलाकर सोनटक्के.

Image
कमलाकर सोनटक्के हे नांव तसे मराठी -हिन्दी नाट्यश्रुष्टीशी खूपच निगडीत आहे. तसे म्हटले तर ह्या नाट्यकर्मींचे पाय जसे साहीत्य संघ मंदीरास लागत तसेच तें जे.जे. काळ मंदीरास देखील लागत. त्याला कारण होती आमच्याकडील दोन माणसे. एक म्हणजे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी निगडीत असलेले नाट्यकर्मी प्रा. दामू केंकरे व दुसरें आमचे नाट्यप्रेमी प्रा. षांताराम पवार. या दोघांकडे बऱ्याच नाट्यकर्मींचे येणे जाणे असे. आणि त्यात आमचेही कान, डोळे पावन होत असत. अश्यापैकीच एक नांव म्हणजे कमलाकर सोनटक्के. एक जेष्ठ आणि श्रेष्ठ असे नाट्य दिग्दर्शक व अभीनेते. सोनटक्के यांच्याशी माझा प्रथम परीचय झाला तो १९७३ साली. तेव्हां ते औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यशाखेचे प्रमुख होते. मुंबईला आल्यावर त्यांचे ओघानेच जे.जे.मध्ये येणे होत असे. मग केंकरेंकडचे बोलणे आटोपले की स्वारी पवारांच्या केबीन मध्ये डोकावत असे. आणि मग रंगत दोघांच्या गप्पा. अर्थातच त्या नाट्य शास्त्रावरच्याच असत. कधीमधी तेथील विभागातील गंमतीही तोंडी लावण्यासाठी होत असत. आणि कुणालाही वाटावे की अश्या माणसाची मैत्री करावी. कमलाकर सोनटक

एका धन्वंतरीची कथा : डाॅ. स्नेहलता देशमुख.

Image
  १९९५  साल होते ते. नुकतेच युती सरकार सत्तेवर आले होते. सरकारी योजनांची माहिती सामान्य लोकांना व्हावी यासाठी "प्रगती पथावर महाराष्ट्र" हे  शासकीय योजना ह्या सर्वसाधारण माणसापर्यंत दृश्य कलेच्या माध्यमातून कश्या पोचवाव्यात यासाठी जेजे उपयोजीत कला संस्थेच्या विध्यार्थी आणि शिक्षकाकरवी ‘प्रगतीपथावर महाराष्ट्र’ नांवाचे मी एक मोठे प्रदर्शन आयोजिले होते. त्याच्या उदघाटनाला मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी आले होते. त्याचवेळी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून एक विद्वत्तापूर्ण असे व्यक्तिमत्व आले होते. प्रसन्न आणि हसतमुख चेहरा, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज,  आवाजात एक प्रकारचा गोडवा अन माधुर्य, मोहिनी पडेल असे वक्तृत्व, आणि सर्वच विषयांवर प्रभुत्व असे हे हरहुन्नरी व्यक्तित्व म्हणजे डॉ. स्नेहलता देशमुख. त्यांनाही मी आमंत्रित केले होते. आणि त्यावेळी समस्त शिक्षक विध्यार्थ्यांना त्यांनी हसत खेळत, मनोरंजन करीत सर्वाना आपल्या ज्ञानाची, विनोदबुद्धीची चुणूक त्यांना त्या समारंभात दाखविली. मी त्याच वेळी विद्यापीठात फाईन आर्ट विभागाचा डीन झालो होतो, त्यामुळे त्यानंतर आमची जवळीक जास्तच झाली   डाॅ. स

धागा धागा विणून विश्व निर्माण करणारा चित्रकार : प्रभाकर नाईक साटम

Image
  हल्लीच वृत्तपत्रात एक बातमी आली होती. जपानस्थित टॅपेस्ट्री कलाकार प्रभाकर नाईक साटम कालवश. ही बातमी वाचताच माझे मन ७ एप्रील २०१२ साली झालेल्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात साजरा झालेल्या त्या भव्य सोहळ्यात गेले. तो दिवस होता भारतीय विणकामाला एक जागतीक स्तरावर मानाने नेणाऱ्या प्रभाकर नाईक साटम या जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या एका प्रतिथयश चित्रकाराच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा अभूतपूर्व समारंभ. सारस्वत बॅंकेचे एकनाथजी ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशीत झालेल्या 'झल्लाळ' या समारंभाला हजर राहून त्यांच्या कर्तबगारीवर चार शब्द बोलण्याचे भाग्यही मला  त्या दिवशी लाभले. त्यादिवशी त्यांची जपानी पत्नी काझूको ताकाहाशी या देखील या सोहळ्यात उपस्थीत होत्या. त्यांना एक सुंदर सुवासीक अत्तराची कुपी देऊन आयोजकांनी तिचे स्वागत केले, व ह्या समारंभाचा सुगंध असाच आयुष्यभर तिच्या जीवनात दरवळावा  अशी आशा व्यक्त केली. आणि मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्यातील पहील्या प्रतीवर व्यसपीठावरील सर्व पाहुण्यांच्या सह्या घेऊन त्या ग्रंथाला संग्राह्य केले.   प्रभाकर नाईकसाटम यांचा जन्म कोकणातील मालवण तालु