Posts

Showing posts from September, 2021

लोकशाहीचा कैवारी: बॅ. नाथ पै

Image
    कोकणच्या भूमीने या महाराष्ट्राला, पर्यायाने राष्ट्राला अनेक नररत्ने दिली आहेत. राजकारण, साहीत्य, काव्य, कला, समाजसेवा या सर्वच आघाडयांवर येथील लोक गाजले. आपला देश गुलामगिरीत असतांना या भूमीतील अनेकांनी तळहातावर शीर घेऊन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला. त्यापैकी कांही भाग्यवानांना स्वतंत्र हिंदुस्तानामध्ये जनतेचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. व ती संधी त्यांनी निःस्वार्थीपणानें पार पाडली. यापैकी बॅरीस्टर नाथ पै हे एक लढवैये नेते.  २५ सप्टेंबर १९२२ साली कोकणातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथ पै यांना पितृछत्र फारसे लाभले नाही.त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांचे वडील वारले. मात्र त्यांना घडवण्यात त्यांच्या मातोश्री तापी व वडील बंधू अनंत यांच्या संस्काराचा मोठा वाटा होता. नाथांचे प्राथमीक शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. नंतर ते बेळगाव येथे आले. तेथील बेनन स्मिथ हायस्कुल व नंतर लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून  अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असतानाच त्यांना त्यांच्या ठायी असलेल्या वकृत्व गुणांची जाणीव झाली.