Posts

Showing posts from June, 2018

जाहीरात कलेतील एक कलंदर : अरुण कोलटकर

Image
कांही कलाकारांची नावेच अशी असतात, की ती उच्चारताच त्या प्रतिभाशाली कलावंताबद्दल आपल्याला आपूलकी वाटू लागते. अरुण कोलटकर हे नांवही त्यातलेच ! अवघ्या मराठी काव्य रसिकांना अरुणने आपल्या नावाची मोहीनी घातली होती. शिवाय त्या नावाशी अनेक गोष्टी जुळल्या होत्या. आज कवी म्हणून अरुण यांनी आपल्या देश्याच्या सीमा पार करून पलीकडे झेप घेतली. एक सर्जनशील विचारवंत, कवी, कलाकार म्हणून अरुण कोलटकरांनी कांही दशके घालवीली अन तीही जाहीरातीसारख्या विचार प्रसारणाच्या व दृक कला माध्यमाच्या सर्जनशील क्षेत्रांत, हे आजच्या पिढीला कदाचीत माहीत नसेल ! अरुण कोलटकरांचा पिंडच मुळी कवीचा. त्यातही त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरील अफाट वाचन. त्यामुळे त्यांच्या प्रतीभेला बहर न आला तर नवलच ! १ नोव्हेंबर १९३२ साली त्यांचा जन्म झाला तो कोल्हापूरात. या कलापुरातील मातीचे गूण त्यांनाही लागले अन कलापुरातील वंशपरंपरा असलेली चित्रकला त्यांच्या मधेही आली. तसे अरुण यांचे मूळ घराणे कोकणातील. पण पुढे वाडवडील कोल्हापुरात स्थायीक झाले. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना दोन्ही बाजूनी मिळाला म्हणायला हरकत नाही. तेथेच त्यांचे शालेय शिक्

एक होती राजकन्या

Image
पुण्यापासून साधारण २६ किलोमीटर अंतरावर आनंदग्राम नावाची एक कुष्ठ रोग्यांची वसाहत आहे. येथील शुभ्र आणि नीटनेटक्या इमारतींमध्ये अनेक कुष्ठ रोगापासून मुक्त झालेले रुग्ण निरनिराळ्या हस्तकलेच्या वस्तू बनविण्यात मग्न असतात. आरंभी कुष्ठरोगाचे बळी ठरलेले हे लोक आता त्यांच्या या छोट्याश्या टुमदार गावात स्वावलंबी बनून स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. कुष्ठ रोग्यांचे पुनर्वसन करणारी एक यशस्वी गाथा म्हणून आनंदग्राम एक उत्तम उदाहरण आहे. येथे भेट देणारी प्रत्येक व्यक्ती एका उदात्त विचाराने भारून निघते, आणि तिचे पाय येथून बाहेर पडायला तयार होत नाहीत. या आनंदग्रामच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन सत्यात आणण्याची पूर्तता करण्यात एका महिलेची, महिलेची कसली, एका राजघराण्यातील राजकन्येची कल्पनाशक्ती आणि जबरदस्त लालसा कारणीभूत आहे. आणि ती राजकन्या होती जमखंडी संस्थांच्या राजघराण्यात १४ मे १९२६ रोजी जन्माला आलेली राजे परशुराम पटवर्धन यांच्या भगिनी आणि आमच्या ताईआत्या - इंदुताई पटवर्धन ! याच राजे पटवर्धनांनी मिरज, सांगली, कुरुंदवाड या जहागिरीवर राज्य केले. अगदी बालवयातच इंदुताईंना स्वातंत्र्याच्या चळवळीने भ

जे. जे. च्या मातीचा गंध - सुगंध

Image
म्हणतात मातीचा गूण आपणांला घडवतो आणि ती माती जर कां जे.जे. स्कुलची असली तर... तर त्या मातीच्या सुगंधातून अवतरलेत अनेक कलाकार कोणी चित्रकार, कोणी शिल्पकार, कोणी वास्तूविशारद अन कोणी विचार प्रसारणेचे उपयोजीत कलाकार आणि कलाकार तरी कसे ? जे.जे.च्या मुशीतून घडलेले, जमशेटजींच्या पुण्याईने पावन झालेले इंद्रधनूची शिडी करून आकाशाच्या कॅनव्हासवर मनाच्या कुंचल्याने प्रतीसृष्टी निर्माण करणारे... आकाशाला गवसणी घालणारे असे माझे जे.जे... जेथे या सर्वांबरोबर मीही घडलो अनेकदा धडपडलो, पण या जे.जे.च्या भक्कम आधाराने सावरला गेलो आजही इतक्या वर्षांनी त्या पवीत्र मातीचा सुगंध घेण्यासाठी तिचा गंध मस्तकी लावण्यासाठी पावले परत परत वळतात माझ्या मातृ संस्थेकडे तेव्हां मधला काळ झपकन गळून पडतो आणि... जे.जे.च्या कुशीत मी पुन्हां विध्यार्थी बनून सामावतो!  - मं.गो. राजाध्यक्ष

शाळा सुटली ...पाटी फुटली.

Image
प्रा. वि.द. घाटे यांचे ' कांही म्हातारे व एक म्हातारी' हे पुस्तक मला खूप आवडते. विशेषतः त्यातील प्रो. देसाई यांचावरील 'एक म्हातारा ' हा लेख तर माझ्या मनांत घर करून बसला आहे. स्वतःच्या ज्ञानात आणि संशोधनात मग्न असलेल्या देसाईसरांच्या विद्ववत्तेसमोर सर्वजण दिपून जात असत. त्यांच्या दैवत असलेल्या शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे ते जेव्हां समर्थन करीत तेव्हां त्यांच्या वाणीतून जणू त्यांच्याविषयीच्या भक्तीचे उमाळे फुटत असत. आणि आपल्यालाही जाणीव होत असे ' गुरु ' या व्याख्येची ! त्यांच्यातील तपश्चर्येची! त्यांच्या दीर्घ अश्या ज्ञान लालसेची ! प्रा. घाट्यानी त्यांचे जे शब्दचित्र आपल्या भाषेत असे कांही रेखाटले आहे, की ते वाचतानाच आपला उर अश्या गुरूंनी अभिमानाने भरून येतो व त्यामध्ये आपण आपले गुरु पाहू लागतो. असेच कांही गुरुजन शालेय शिक्षणात आमच्या वाट्याला आले होते. शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहे, असे समजून त्यात स्वतःला झोकून देणारे ! एक निरोगी अशी विदवत्त पिढी तयार करण्यासाठी अविरत झटणारे, जे आजच्या काळात पाहणे दुर्लभ झाले आह