Posts

Showing posts from June, 2023

ओंकार साकारणारा गुरु : प्रा. नागेश साबण्णावर

Image
जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील त्याकाळातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाणारा तो काळ. तेथील  एकेक शिक्षक हा आपापल्या क्षेत्रात निपुण असे. मी नुकताच अध्यापक म्हणून उपयोजीत कला संस्थेत लागलो होतो. आमचे कला संचालक दादासाहेब आडारकर हे नुकतेच निवृत्त होऊन त्याजागी थोर चित्रकार माधवराव सातवळेकर आले होते. शासनाची अनेक कलात्मक कामे तेंव्हा आमच्या संस्थेकडे येत असत. आणि त्या गरजेनुसार कला संचालकांकडून ती त्या त्या विभागाला देण्यात येत असत. माझ्या वाट्यालाही अशी बरीच कामे येत असत. व त्या निमित्ताने इतर विभागातील शिक्षकांच्याही भेटी होत असत. ओळखी होत असत अन काहीजणांशी जवळीक देखील साधत असे. यामध्ये पळशीकर होते, परब होते, सोलापूरकर होते, सोनावडेकर होते. पण एक नांव त्यात आवर्जून घ्यावे असे होते व ते म्हणजे प्रा. नागेश साबण्णावर. रे आर्ट वर्कशॉप मधील कला व हस्त व्यवसाय या विभागाचे विभाग प्रमुख. नागेश भिमराव साबण्णवार सरांचा जन्म बेळगांव जिल्ह्यातील सौंदत्ती या गांवी १७ जून १९२५ साली झाला. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या साबण्णावर यांना कर्नाटकातील मंदिरामधील शिल्पे पाहण्यात, ती अभ्यासण्यात खूप रस होता. दुर्दैवाने

माझे वडील कलाकार होते :

Image
  माझे वडील गोविंद गजानन राजाध्यक्ष. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. कारण त्यांचे भाचे त्यांना मामा असे म्हणत व आम्ही त्यांच्या पुढेच लहानांचे मोठे झालो त्यामुळे आम्ही सर्वानी तेच पुढे चालू ठेवले. तेच आमच्याही अंगवळणी  पडले होते. बाहेरील जगात ते बाबुराव म्हणून ओळखले जात. मला मामा आठवतात ते वयाच्या साधारण चवथ्या वर्ष्यापासून. त्या वेळच्या बेळगावातील चंदगड तालुक्यातील कारवे या बेळगावापासून बारा मैलावर असलेल्या गावी माझा जन्म झाला. शेतीवाडी भरपूर असलेल्या सुखवस्तू घरात.  संपूर्ण आंब्या फणसानी लगडलेले, ऊस भात यांनी मोहरलेले असे गांव, कुणालाही हेवा वाटावा असे.  पण मला आठवायला लागले  ते आम्ही बेळगावात स्थायिक झालो तो काळ. कारण ते शहर होते. कारव्याचे घर नाना कुलकर्णी म्हणून होते ते सांभाळत होते. आम्ही चार भाऊ व तीन बहीणी असे आमचे कुटुंब होते. मी सर्वात लहान. शेंडेफळ. माझी आई मी अगदी लहान असतांनाच  वारली. तिला पाहील्याचेही मला आठवत नाही अथवा आमच्या घरी तीचा एखादा फोटोही नव्हता. त्यामुळे ती कशी दिसत होती तेही मला माहीत नाही. मात्र आई वारल्यानंतर वडीलांनी आम्हांला बेळगांवी आणले. भावंडेही तशी लहानच