Posts

Showing posts from June, 2021

निसर्गप्रेमी प्रतिभावान स्वयंप्रेरीत कलाकार : अरुंधती वर्तक.

Image
  निसर्गाने आपल्याला वृक्षांच्या रूपाने आपलें जीवन समृद्ध होण्याचे एक महत्वपूर्ण साधन दिले आहे..या वृक्षांमुळे वातावरणातील पर्यावरणाचा समतोल रहातो, मानवी जीवन समृद्ध होतेच, हेंच वृक्ष आपल्याला सावली देतात, फळे देतात, याशिवाय त्यात एक भाव असतो तो या वनराईचे सौंदर्य. प्रत्येक ठिकाणच्या, भागातील वातावरणाच्या परिस्थितीमुळे तेथील वृक्षसौंदर्य बदलत असते. आणि हे सौंदर्य आपल्या कुंचल्यात नेमके पकडून त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीचा भर घालून त्यावर रंगांची उधळण करून आपल्या कॅनव्हासवर आविष्कृत करणारी एक जागतिक कीर्तीची चित्रकर्ती म्हणजे अरुंधती वर्तक. जणू जन्मापासून वृक्ष वेडाने भारावून निघालेली एक निसर्गवेडी कलाकार. अश्या या मनस्वी कलावंताला भेटण्याचा योग  मला अकस्मात आला. मी जे. जे.ला अधीष्ठाता म्हणून कार्यरत असतांना  आपल्या नियोजीत प्रदर्शनाचे आमंत्रण देण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या आमंत्रण पत्रिकेवरच त्यांच्या कलेची कल्पकता आणि ताकद दाखवणारी वृक्ष चित्राची कलाकृती होती.  प्रथमदर्शनी छाप पडेल अशा शांत, संयमी व्यक्तिमत्वाच्या अरुंधती  वर्तक अत्यंत मृदू स्वभावाच्या आहेत. आमच्या ग

तो एक काळ होता....

Image
  तो एक काळ होता, जेव्हां आम्हांला शाळा म्हणजे एक मंदीर वाटत होते, अन आमचे शिक्षक त्यातील देव. घासून पुसून, तावून सुलाखून आमच्या बुद्धीच्या रांजणात आपल्या ज्ञानाचे कलश रीते करीत होते. आम्हांला परीपू्र्ण करीत होते. आपली नांवे आमच्या हृदयावर कोरीत होते. आणि आमची मस्तके त्यांच्या चरणी ठेवीत होतो.   तो एक काळ होता, जेव्हां हरी नारायण आपटे, नाथ माधव, वि.सी.गुर्जर, न.चिं.केळकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, गो.ना.दातार, वि.स. खांडेकर, वि.वि.बोकील, मालतीबाई बेडेकर, ईरावती कर्वे या सारखे चतुरस्त्र कादंबरीकार आमचे साहीत्यिक ज्ञान वाढवीत होते. ग.दि.माडगूळकरांसारखे आधुनीक वाल्मीकी आपल्या अमृतमय शब्दलेण्यांनी महाकाव्याची बरसात करीत होते. जोडीला चित्रपट, कथा,भक्तीगीते, लावणी, अभंग अशा रचनानी चहुबाजूनी आमच्यावर संस्कार करीत होते.   तो एक काळ होता, चित्र महर्षी बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत पागनीस, वसंतराव जोगळेकर, राजा परांजपे, राजा गोसावी, विवेक अभ्यंकर, शरद तळवलकर, राजन जावळे, दामूआण्णा मालवणकर, धुमाळ, चंद्रकांत, सूर्यकांत, रमेश देव, दादा कोंडके, उषा किरण, बेबी शकुंतला, सुलोचना , सुमती गुप्त