Posts

Showing posts from October, 2018

अमृत चित्रांचा देशी वाण :अमृता शेरगील

Image
ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतीयांच्या सामाजीक तसेंच आर्थीक, पारंपारीक आणि कला जीवनावर खूप मोठा परीणाम झाला होता. यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणलाही  फार मोठा धक्का पोचला होता. आणि विशेष करून येथील कला जीवनावर देखील काही कमी आघात झाले नव्हते. देशांतील पारंपारिक कला शिक्षण देणारे दिवस मागे मागे पडत चालले होते. त्या काळात जी कला विद्यालये स्थापन झाली होती, त्यामध्ये बहुदा निव्वळ पाठशालेय शिक्षण दिले जात होते. ज्या दोन महान अश्या कला संस्था तेव्हां स्थापन झाल्या त्यापैकी एक होती बंगाल स्कुल, ज्यांनी प्राचीन भारतीय चित्रशैलीचे व विशेषकरून त्यातील प्रणय, शृंगार चित्राविष्कार करण्यावर भर दिला. व दुसरे होते बॉंबे स्कुल, जेथे पाच्छात अकॅडमिक चित्रशैलीचे अंधानुकरण केले जाऊ लागले. त्याचे पुनर्निर्माण करण्यात येऊ लागले. या दोन्ही कला प्रवाहासोबत जाणारे कलाकार चाचपडत होते ते एखाद्या मार्गदर्शकासाठी. या कठीण प्रसंगात दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे व्यक्तित्व त्यांना जाणवत नव्हते. या कालावधीत अंधारात चाचपडणाऱ्या नवोदीत कलाकारांच्या पिढीला प्रकाशाचे किरण दाखविण्यासाठी एक भक्कम अश्या मार्ग

कला क्षेत्रातील ज्ञानकोष. बाबुराव सडवेलकर.

Image
    बाबुराव सडवेलकर आज आपल्यात नाहीत हेच मुळी खरे वाटत नाही. वाटते की नेहमीप्रमाणे त्यांचा फोन येईल व ते म्हणतील, ' हे पहा राजाध्यक्ष, माझी दोन कामे तुमच्याकडे आहेत....' असे म्हणून ते आपली कामे समजावून देणार. आणि ' तुम्हाला जर तसदी देतो आहे' असे आपल्या नम्र स्वरात सांगणार. बाबुरावांना आर्ट स्कूल मध्ये मी प्रथम पाहीले ते १९६२ साली. तेथे ते प्राध्यापक होते. ठेंगणीशी मूर्ती, टापटीपीची राहणी, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर टाकणारी त्यांची काळी दाढी, पुढे वयोमानानुसार ती राखाडी झाली तेव्हा त्यांना ती अधिकच खुलून दिसू लागली. त्यांचा कलेचा सखोल अभ्यास, इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व, विध्यार्थ्यांना म्युरल, पेंटिंग, कला इतिहासापासून सर्वच विषय समरसतेने शिकविण्याची हातोटी यामुळे बाबुराव विध्यार्थ्यामध्ये लोकप्रिय झाल्यास नवल नाही. आणि यावर कळस चढविणारा त्यांचा नम्र आणि मृदू स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच टाकीत असे २८ जून १९२८ रोजी सावंतवाडीला जन्माला आलेले बाबूराव पुढे कोल्हापूर येथे आले. कोल्हापूरात शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील चित्रकला त्यांना अस्व

मुंबईची लावण्यवती : छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस

Image
या मुंबापुरीत दररोज हजारो लोक आपल्या भवितव्याची स्वप्ने बाळगून येत असतात. या महानगरात आपल्या रोजगाराची, पोटापाण्याची सोय होत असल्याने येथेच स्थायीक होतात. कांही भाग्यवान जागा मिळवून राहतात, तर काहींना डोक्यावर छप्पर नसले, तरी मिळेल त्या जागेचा आसरा घेऊन तिला आपल्या मालकीची बनवितात. अश्या स्वप्ने बाळगणाऱ्या कैक तरुणांचे काय होते, त्याचे अगदी वास्तववादी चित्रण के. अब्बास यांनी सुमारे पन्नास एक वर्षांपूर्वी काढलेल्या आपल्या 'शहर और सपना' व राष्ट्रपती पदकाने सन्मानीत केलेल्या चित्रपटांत केले आहे. देश्याच्या कानाकोपऱ्यातून एखादी व्यक्ती मुंबईला येते, तेव्हां ती प्रथम पोहोचते ती बोरीबंदर येथील ‘व्हिक्टोरीया टर्मिनस’ ( आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वर. या नगरीत आलेला नवागत या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या वास्तूला डोळे भरून पाहून घेतो. तिच्या भव्यतेपुढे तो दिपून जातो.कदाचित तेच त्याचे पहीले व आत्मीयतेने केलेले निरीक्षण असेल. कारण नंतर  लक्षावधी मुंबईकरांप्रमाणे एका मागोमाग येणाऱ्या प्रवाशानी तुडुंब भरलेल्या लोकलमधून उतरून घाईघाईने स्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी तोही त्यात साम