Posts

Showing posts from October, 2023

दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महंमद रफी

Image
  नुकताच आपल्या फिल्म इंडस्ट्री मधील सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा एक थोर व गुणी अभिनेत्री वहीदा रेहमान यांना देण्यात आल्यामुळे देशभरातील चित्रपट प्रेमींच्या मनात आनंदाच्या भावना उमटल्या यात शंकाच नाही!  प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार आपल्या जीवनात मिळवण्याची इच्छा असतेच! हा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दरवर्षी माहीती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येतो. ह्या पुरस्काराचा बहुमान अश्या व्यक्तीला देण्यात येतो, ज्याने भारतीय सिनेमाचा विकास, आणि प्रगती यामध्ये बहुमूल्य योगदान केले आहे. आणि अश्या कलाकाराची  निवड ही देशातील नामवंत अश्या चित्रपट व्यवसायातील व्यक्तीकडून होत असते. हा पुरस्कार दहा लाख रुपये रोख, स्वर्ण कमळ व शाल अश्या स्वरूपात असतो. दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपटाची मुहूर्त मेढ रोवली. पहीला संपूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चन्द्र त्यांनी दिग्दर्शीत केला त्यानंतरही ते या क्षेत्रांत कार्यरत राहीले व चित्रपट सृष्टीला एक भरीव योगदान त्यांनी दिले. अश्या या महान माणसाच्या नावाने देशातील हा चित्रपटातील सर्वोच्च बहुमान त्यांच्या नांवाने देण्याचे

एक गुंफलेले अतूट नाते : प्रा. शशिकांत साठ्ये.

Image
  प्रा. साठ्ये अर्थात आम्हा सर्व जेजे वासियांचे अत्यंत लाडके असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीत ही कल्पनाही करवत नाही. जेजेच्या माझ्या एकंदरीत विध्यार्थी व शिक्षक अश्या आजपर्यंतच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत साठे सरांशी माझे जे ऋणानुबंध जुळले ते केवळ व्यावहारिक नव्हते, ना व्यावसायीक. पण एकमेकांची सुखदुःखे वाटण्या इतपत आम्ही भावनाशील झालो होतो. मी जेव्हा जेजे उपयोजित कला महाविद्यालयात १९६२ साली प्रवेश घेतला, त्यावेळी आमचे वर्ग प्रमुख म्हणून साठ्ये सर आम्हाला लाभले, ते केवळ दीड दोन महिन्यासाठी. पण त्यांचे देखणे व्यक्तिमत्व पाहून आम्ही सर्वच जण हरखून गेलो होतो. कपड्यांच्या बाबतीत एकदम चोखंदळ असलेले साठ्ये सर लेक्चर द्यायला उभे राहिले की त्यांची एक भुवई नेहमी उडत असे. सुरुवातीच्या काही असाइनमेंट झाल्यावर नंतर आम्हाला दुसरे देखणे व्यक्तिमत्व वर्ग प्रमुख म्हणून आले, ते होते दामू केंकरे सर. दुसऱ्या वर्षाला साठ्ये सर आम्हाला लेटरिंग टायपोग्राफी शिकवायला आले. त्यावेळी त्यांचे ब्रश स्क्रिप्ट व कॅलिग्राफी आम्हाला मोहवून टाकीत असे. ब्रश रंगात अथवा शाईत बुडवून ते कागदावर असा काही चालवीत की तश्या प्

'My Rooted Friends'

Image
नुकतेच वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनात भरलेले वरील विषयावरचे माझे झाडांच्या चित्रणाचे प्रदर्शन संपले. वाटले नव्हते कधीकाळी मी एखाद्या नामांकीत गॅलरीत माझे प्रदर्शन भरवेन. कारण गॅलरीचा आकार पहाता तो एकदम अंगावरच यायचा. आणि आम्हां उपयोजीत कलाकारांची कामे लहान आकारातील. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात काम कसे होईल. त्यामुळे प्रदर्शनाचा विचारच माझ्या कधी मनात आला नव्हता. पण निवृत्त झाल्यावर मी बाहेरील कामे जवळ जवळ बंदच  केली. कारण आताची नवीन टेक्नॉलॉजी. ज्यामध्ये मी अशिक्षीत होतो. तरी माझ्या मुलांकडून पोटापुरते जुजबी संगणकी ज्ञान मी मिळवले होते. पण माझा हात सतत चालूच होता. स्केचिंगची आवड मला लहानपणापासूनचीच! माझ्या हाताला तो चाळाच असे. कळत नकळत माझ्या हातून कोठेही बसलो तरी स्केच करणे सुरूच असे. जे माझ्या दृष्टीसमोर दिसे, तेते मी कागदावर आणण्याचा प्रयत्न करीत असे. आणि याला एकमेव व्यासपीठ म्हणजे सोशल मिडीया. फेसबुकवर अथवा इंस्टाग्रामवर मी नेहमी माझी चित्रे आणि लिखाण टाकू लागलो. चित्रे तर मी विविध माध्यमात व विविध पृष्ठभागावर काढु लागलो. मध्ये तर मी वृत्तपत्रावर देखील चित्रे काढली. व बऱ्याच जणांना