Posts

Showing posts from March, 2019

बेळगांव ते गिरगांव : एक प्रवास, पांडूरंग नागेश कुमठा यांचा:

Image
कांही दशकांपूर्वीची गोष्ट. कोणाताही मराठी पुस्तकप्रेमी माणूस गिरगावातील पोर्तूगीज चर्च समोरील 'बॉंबे बूक डेपो' ह्या  भरस्त्यावरील पुस्तकांच्या दुकानाच्या पायऱ्या चढल्याशिवाय राहीला नसेल. आम्हीही कित्येकवेळा त्या पुस्तकांच्या दुकानांतून अनेक पुस्तके विकत घेतली आहेत. दुकानांत गेल्यावर दिसत ते एक मितभाषी पण सुहास्य चेहऱ्याचे त्या बुक डेपोचे मालक पांडूरंग कुमठा. नांवावरूनच जाणवत असे ते कर्नाटकाच्या बाजूचे आहेत. मंगलोरी कोंकणी ही त्यांची भाषा होती.  पण पुस्तकांची ओढ, त्यांची आवड, वाचनाचे  लिहीण्याचे वेड यामुळे हा माणूस या पुस्तक विक्रीच्या व्यवसायात पडला. तो नेटाने चालवीला अन आपले या पुस्तकी विश्वात एक स्वतंत्र असे स्थान निर्माण केले. आपल्याला हवे ते पुस्तक या 'बॉंबे बुक डेपो'त मिळणारच याची खात्री सर्वसाधारण वाचकाला असेच! पांडूरंग कुमठा यांचा जन्म बेळगावातील बैलहोंगल या तालुक्यांत २५ मे १९२१ रोजी झाला. आई लवकरच वारल्यामुळे शेंडेफळ म्हणून त्यांचे नेहमीच घरी कौतुक होत असे. पुढे तेथेच त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. त्या शाळेत कानडीही शिकविण्यात येत असे. त्यांचा वडील भाऊ