Posts

Showing posts from November, 2018

कल्पक नेपथ्यकार : रघुवीर तळाशीलकर

Image
अठराव्या शतकापासूनच बंगाल व महाराष्ट्रात मनोरंजनाचे साधन म्हणून थेटरमध्ये लोक जाऊ लागले. नाटक हे अर्थातच मनोरंजनाचे साधन असायचे. नाटकाच्या  एकूण आशयाचे प्रतीक म्हणून एकच भव्य चित्रांकृत पडदा पार्श्वभूमीवर दाखवीला जाऊ लागला. यानंतर त्यात सुधारणा होऊन नाटकातील दृश्याप्रमाणे तीन ते सहा पडदे राजवाडे, जंगल, मंदीर, महाल अशी ठिकाणे नाटकाच्या आषयाप्रमाणे दाखवू लागले. हे पडदे एरव्ही वरती गुंडाळून ठेवण्यात येत व गरजेचा पडदा खाली सोडण्यात येत असे. हे पडदे रंगविणारे कलाकारही निष्णात असे असत. कांही कलाकार तर पहील्या पडद्यालाच टाळी घेण्याचा विक्रम करीत असत. गंधर्व संगीत मंडळी, ललीत कलादर्श, किर्लोस्कर नाटक मंडळी अश्या मोठमोठ्या संगीत नाटकें सादर करणाऱ्या नाट्य संस्था अश्या मातब्बर कलाकारांकडून हे भव्य पडदे बनवून घेत. पुढे साधरणतः त्या शतकाच्या अखेरीस निरनिराळ्या आकाराची चित्रे कापून ती एकमेकांपुढे ठेवून त्यातील खोली ( depth ) दाखविण्यांत येऊ लागली. यानंतरचा काळ होता तो वास्तववादी दृष्य निर्मीतीचा! यापूर्वी नाटके असत ती बहुदा पौराणीक,ऐतिहासीक आणि  संगीतप्रधान नाटके असल्याने त्यातील नट हा गायक असाय

'पब्लीक क्राय फंड' अर्थात लोकांकडून पैसे मिळवणे :

Image
हल्ली बऱ्याच वेळा टीव्ही चॅनल असो, वा वृत्तपत्रे असोत त्यावर एखाद्या गोष्टीसाठी पैसे जमवायचे असतात, त्यासाठी जनतेला एक भावनीक आवाहन केले जाते. मग ती व्यक्ती गरीब कुटुंबातील परीक्षेत जास्ती मार्क मिळवणारा अथवा मिळवणारी आणि पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज असलेली असते, मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अथवा एकाकी जीवन जगणाऱ्यांसाठी  अश्या प्रकारे आपापल्या चॅनलवरून अथवा वृत्तपत्रातून त्यांच्यासाठी खास बॅंक खाते उघडून त्यात रक्कम जमा करण्यास सांगीतले जाते. आणि यामुळे कित्येक व्यक्तींना त्यांच्या जीवनांत स्थैर्य मिळाले आहे. एका प्रकारे हा उपक्रम स्तुत्य मानला जावा. पण त्यातील दुसरीही बाजू आहे, ती म्हणजे अश्या आवाहनानंतर लोक विचार न करता भराभर चेक पाठविण्यास सुरुवात करतात. आपल्या पैशांचे पुढे काय होते, एकूण किती पैसे जमा होतात याचा विचार क्वचीतच कोणी करीत असेल. येथे कोणाचा उपमर्द करणे अथवा त्यावर शंका उपस्थीत करण्याचा प्रश्न नाही. पण आपण जे पैसे देतो त्याचा विनीयोग योग्य होतो की नाही याची माहीती मिळवणे हा प्रत्येक दात्याचा हक्क आहे. जेव्हां डी.एस.कुलकर्णी आपल्या व्यवसायांत डुबले तेव्हां त्यांनी

आणि डॉ. काशीनाथ घाणेकर :

Image
आजच सुबोध भावे यांचा नितांत सुंदर असा 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा चित्रपट पाहीला, व कित्येक दिवसांनी एक सुंदर असा चरीत्रपट पाहिल्याचा आनंद मिळाला. चित्रपट सुंदर, त्यातील व्यक्तीरेखा सुंदर, संवाद सुंदर (कांही सोडून) मनाची पकड घेणारी गती सुंदर आणि विशेष करून डॉ. काशीनाथ घाणेकर यांची भूमिका चक्क जिवंत केलेला सुबोध भावे यांचा अप्रतीम अभिनय. आमच्या पिढीतील माहीती असलेले अनेक व्यक्तीमत्वे यातून दिसून आली. यापैकी काहींशी परिचयही झाला होता. आता यातील बरीचशी पात्रे मूळ पात्रांशी साधर्म्य दाखवीत नाहीत. पण खुद्द दिग्दर्शकानी एका मुलाखतीत सांगीतले होते की, आम्हांला यात मूळ नायक दाखवायचे अथवा त्यांची नक्कल करायची नाही तर ती पात्रे दाखवून तो काळ उभा करायचा आहे. तेव्हां तोही प्रश्न उरत नाही. मात्र काशीनाथ यांची भूमिका करणारे सुबोध भावे जर का थोडे बारीक झाले असते तर आणखी गंमत आली असती. कारण काशीनाथ यांची शरीरयष्टी किरकोळ होती. मात्र यातील सुलोचनाबाई कोणत्याही अंगाने वा बाजूने त्या वाटत नाहीत. केवळ एक हालणारे चालणारे पात्र वाटते. अर्थात हे माझे मत आहे. पण त्यांना तसा चित्रपटात फारसा वाव नाही.

माणूसकीचे मानदंड :

Image
एखाद्या माणसात माणूसकी नाही असे जेव्हां आपण म्हणतो म्हणजे काय ? म्हणजे इतर प्राणी आणि माणूस यात असलेला फरक. आपणाला मन आहे, मेंदूचा विचार करण्याची ताकद निसर्गाने आपणास दिली आहे. त्यायोगे माणसाने पाळायचा मानव धर्म आपण पाळला पाहीजे हे आपण समजू शकतो. जसे माझे हक्क अबाधीत राहीले पाहीजे हे विचारात घेऊन मी त्यांची जपणूक करतो, त्याचप्रमाणे समोरच्यालाही हे अधीकार आहेत हे मात्र आपण सोयीस्कररीत्या विसरतो.  प्रत्येक माणसाला त्याचा स्वाभीमान असतो, व त्याला ठेच पोचवण्याचा आपल्याला कांही एक हक्क नसतो, ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आमच्याकडे एक अध्यापक होते. ते हाताखालच्या लोकांना नेहमीच कमी लेखत. मात्र त्यांच्या फायद्याचे गणित जेव्हां असे, तेव्हां त्यांना शिपायाशीही बरोबरी चालत असे. मात्र एरवी त्यांना आपले पद, आपला राजपत्रीत अधिकाऱ्याचा दर्जा, आपली नोकरीतील सेवा जेष्ठता या सर्वच बाबींची नोंद त्यांच्या मनांत घट्ट कोरलेली असे. शिपायाला पान आणण्यास सांगीतल्यावर तो बिचारा शिपाई दूरवर जाऊन त्यांचे पान घेऊन येत असे, पण कित्येकदा ते पान उघडून पाहील्यावर त्या शिपायाची धडगत नसे, कारण एकदा त्यात १२० जर

रंगानंदात रंगलेली कलावंत : प्रफुल्ला डहाणूकर

Image
               " माझी पेंटीग्स ही कालातीत असलेले,                   खूप खोलवर अन शोषून घेणारे अवकाश दाखवीतात.                   सदैव स्तब्ध असे!                   ज्यातून शांत अशी अवस्था जाणवते.                   जणू कांही त्या निरव शांततेच्या                   निवांत पोकळीत                   मनाला सामावण्यासाठी उघडलेली                   एक खिडकी आहे,                   ज्यातून अंतर्मनाला शांत अशी                   स्थिरता लाभते "   गोमंतकाच्या भूमीने आजवर या देशाला अनेक कलाकार दिले आहेत. त्यामध्ये जसे पुरुष कलावंत आहेत, तश्याच स्त्री कलावंतही आहेत. मग ते संगीत क्षेत्रात असो, नाट्य वा चित्रकला क्षेत्रांत असो. विशेषतः चित्रकारांना भावतो तो येथील हिरवागार निसर्ग. माडाच्या वाड्या, हिरवीगार कुळागरे, मासेमारी करणारे कोळी आणि विविधतेने नटलेलं लोकजीवन. याच सहवासात हे कलावंत वाढत गेले, त्यातील अंश सामावत गेले आणि आपल्या कलेद्वारे आविष्कृत करू लागले. या कलाकारांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण विश्व् उजळवून टाकले. अश्याच या कलावंतांच्या मालिकेतील एक नांव म्हणजे जेष्ठ व श्रेष्ठ अश्