Posts

Showing posts from December, 2020

उद्योजक चित्रकार : शं.वा. किर्लोस्कर तथा शं.वा.कि.

Image
  साहीत्यप्रेमी महाराष्ट्रात अनेक चित्रकारांनी मासीके चालवीली. त्यांची ही मासीके मुख्यत्वे चित्रकलेला वाहीलेली असत. व जोडीला ती ललित वाङ्मयालाही उत्तेजन देत. पण एका चित्रकाराने केवळ जाहीरातीपोटी एखादे नियतकालिक सुरु करणे व पुढे त्याला वाङ्मयीन दर्जा देऊन त्याचे एक अभिरुचीपूर्ण नियतकालिक होण्यात रुपांतर होणे हा मराठी साहीत्यसृष्टीतील एका चमत्कारच मानला पाहीजे हे मासीक होते ' किर्लोस्कर' व त्यांचे संपादक होते, शंकरराव वासुदेव किर्लोस्कर तथा सर्व महाराष्ट्र जसा त्यांना त्यांच्या आद्याक्षरावरून ओळखत होता ते महाराष्ट्राचे लाडके चित्रकार संपादक 'शं.वा.कि.'!  यासाठी आपणाला किर्लोस्कर घराण्याची थोडी पूर्व पिठीका पहाणे जरुरीचे आहे. 'किर्लोस्कर'चे आद्य प्रवर्तक श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर हे बेळगांव जिल्ह्यातील गुर्लहोसूर येथील. लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींची आवड होती. त्या म्हणजे पेंटींग करणे व निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे. त्यांना दोन वडील बंधू होते. वासुदेवराव व रामूअण्णा. रामूअण्णांच्या पाठींब्याने लक्ष्मणरावांनी पेंटींग शिकण्यासाठी मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर