Posts

Showing posts from April, 2019

पुण्यांतील अभीनव कलाकारांचे पाशवी हत्याकांड :

Image
आम्ही जेजेची स्टडी टूर घेऊन केरळ येथे गेलो होतो. सोबत अध्यापक होते, डीन प्रा. हणमंते, रमाकांत देशपांडे, अरुण काळे,खांबेकर व मी. त्या काळात आतासारख्या टूर आंखणे, रेल्वेचे आरक्षण करणे अश्या सोयी नव्हत्या. त्यामुळे केरळहून परतण्याची तिकीटे आम्हांला मिळाली नाहीत. तेव्हां चक्क आम्ही तेथून बसने प्रवास सुरु केला. सुरुवातीला मजेशीर वाटणाऱ्या या प्रवासाने नंतर कंटाळवाणे रूप धारण केले. तरी आम्ही काही ठरावीक अंतर झाल्यानंतर बस ड्रायव्हर व विध्यार्थ्यांना विश्रांती देण्यासाठी एखादे हॉटेल पाहून तेथे कांही तास उतरत असू. शेवटी दोन रात्री व तीन दिवस पूर्ण झाल्यावर रात्री आम्ही पुण्याला येऊन ठेपलो. त्यावेळी हणमंते सरांनी निर्णय घेतला की आजची रात्र पुण्यात काढायची. पुण्यात आमचे हक्काचे ठिकाण होते ते तेथील टिळकरोडवरील अभिनव कला महाविद्यालय. तेथील प्राचार्य दिवाकर डेंगळे यांना बोलावल्यावर त्यांनी येऊन आम्हां सर्वांची राहण्याची सोय केली. अभिनवला प्रगतीवर आणणारे ते एक व्यासंगी व्यक्तीमत्व होते. सकाळी आम्ही मागच्या बाजूला असलेल्या 'हॉटेल विश्व' येथे चहा नाश्त्यासाठी गेलो. तुम्हांला वाटेल यात मह

सार्वत्रीक निवडणुका, राजकीय पक्ष आणि त्यांची चिन्हे

Image
आजचा भारतीय नागरीक हा आपल्या सार्वभौम प्रजासत्ताकाच्या सतराव्या लोकसभेच्या उमेदवारांना मतदान करणार आहे. यामध्ये कित्येक मतदार प्रथमच मतदानाचे पवीत्र कर्तव्य पार पडणारे असतील. या निवडणुका कश्या होतात, त्यांचे उमेदवार कोण, त्यांचे पक्ष कोणते, त्यांचे धोरण काय या कोणत्याच गोष्टी कदाचीत कोणाला माहीत नसतील.  आजवर किती आणि कोणकोण पंतप्रधान या देशाला लाभले, हेही कदाचीत आठवीत नसेल. आज त्याविषयी हा थोडासा परामर्ष!          भारत देश स्वतंत्र झाल्यावर प्रथमच संवीधान निर्माण झाल्यावर पहील्या देशव्यापी सार्वत्रीक निवडणूका या देशात झाल्या. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय नागरीकाला मतदान करण्याचा हक्क मिळाला.  आणि स्वतंत्र भारताची पहीली सार्वत्रीक निवडणूक ठरली ती २५ ऑकटोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२. अर्थात तो काळच असा होता की काँग्रेस पक्ष हा देश्याच्या स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर होता. आणि जनमानसात त्याचा खूप मोठा प्रभाव होता. या निवडणूकीत एकूण ५३ पक्षांनी भाग घेतला होता. त्याप दोन होते ज्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे सहकारी म्हणून त्याच्या सोबत काम केले होते ते म्हणजे एक डॉ. श्यामाप

माझ्या मुंबईतील माझ्या आठवणी.

Image
५ जून १९६२ . हा दिवस मी मुंबईत माझ्या लहानपणापासून स्वप्न पाहीलेल्या नगरीत पाय टाकलेला दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्याच्या करिअरचा पहीलाच दिवस होता तो. मुंबईत आल्यावर काय पाहू, काय नको हेच कळत नव्हते. सर्वच भव्य दीव्य असे भासत होते. पुढे आपले संपूर्ण आयुष्य या महानगरीत काढायचे आहे, हे ध्यानांत येऊन छातीवर एक प्रचंड दडपण येत होते. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रचंड अश्या बी.इ.एस.टी. च्या बस व त्यावरील A, A4, O2, L, अश्या अक्षरांच्या रूट दिसत. ( तेव्हां आकडे आलेले नव्हते ) डबल डेकर ह्या बस मी प्रथमच पहात होतो. सिंगल डेकर बसमध्ये दोन दोन कंडक्टर असत. बसच्या दोन्ही बाजूनी ते तिकीटे देत फिरत असत.  तसेच बाहेरून आलेल्याना किंवा येथील नागरीकांनाही सोयीचे ठरेल असे १.२५ रुपयांचे 'Travel as you like” हे दिवसभर चालणारे तिकीटही मिळत असे. ते काढल्यास कोणत्याही बसमध्ये आपणास चढता येत असे. बसच्या सर्वच रूट ना ते तिकीट चालत असे.   शिवाय याच बी.इ.एस.टी. ची ट्राम दादर टी.टी. ते म्यूझियम पर्यंत रस्त्यावरील ट्रॅक वरून धावत असे १९६२ साली जेव्हां ही ट्राम बंद झाली, तेव्हां तिचे रूळ काढण्याचे मह