Posts

Showing posts from February, 2019

आणि ‘मॅकडोनाल्ड’ने जग जिंकले.

Image
रे क्रॉग, एक खटपट्या फिरस्ता सेल्समन . अनेक उद्योग करूनही त्यात फारसे यश न मिळवलेला. पत्नीचे उत्पन्न व सेव्हींग या आधारावर राहीलेला. या क्र्याॅगने पाच प्रकारचे मिल्कशेक बनवणारा एक मिक्सर बनवला व तो विकण्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतो आहे. पण कोणाकडूनच त्याला प्रतीसाद मिळत नाही. त्या काळात अमेरीकेत कारहोप्स ही गाडीत बसून रेस्टारंट मध्ये ऑर्डर देण्याची पद्धत होती. ज्या ज्या रेस्टारंटना त्याने हे मिक्सर विकण्याचे प्रयत्न केले तेथे त्याला जाणवले की या ठिकाणी खाद्यपदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर ती गाडीत येण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. आणि हे त्याला नेहमी खटकत असे. आणि अचानक क्रॉकला कॅलिफोर्नियातील स्यान बर्नार्डिनो येथून एका रेस्टारंट मधून मिल्कशेक मिक्सरची ऑर्डर येते तीही एकदम आठ मिक्सरची. क्रॉक ती पाठवतो, शिवाय एवढी मोठी ऑर्डर देणारे हे रेस्टारंट कोणाचे आहे ते तरी पहावे म्हणून तो सरळ ते पहाण्यास कॅलिफोर्नियाला निघतो. आणि तेथे त्याला दिसते ते ' म्यॅकडोनाल्ड' नावाचे एक प्रसिध्द असे रेस्टारंट जेथे वेगवेगळ्या रांगा लागल्या होत्या. फास्टसर्व्हिस, उत्तम दर्जाचे चवदार खाणे, डिस्पोजेबल