Posts

Showing posts from May, 2019

र. कृ. जोशी : एका अक्षर यज्ञाची सांगता...

Image
( माझ्या 'यादोंकी बारात मधील सुप्रसीध्द सुलेखनकार श्री र.कृ. जोशी यांच्यावरील लेख परत फेसबुकवर आल्यानंतर एका मित्राने या विषयावर ती अक्षर लेखनाची चळवळ समजून यासाठी सविस्तर त्यावर लिहिण्यास सांगितल्यामुळे तोच लेख जरा विस्ताराने लिहीत आहे. र. कृ. जोशी सरांविषयी आजच्या पिढीला कांही जास्त कळावे हीच भावना त्यामागे आहे)   जे.जे. मध्ये मी असताना माझ्यावर सर्वानीच प्रेम केले म्हणा किंवा लाड केले म्हणा. पण सर्वच जण कश्यासाठीही यायचे ते माझ्याकडेच ! मग ते मनु देसाई असोत, यशवंत चौधरी असोत, र.कृ. जोशी, डॉ. रेगे, मनोहर जोशी, रमेश कुलकर्णी, अविनाश गुप्ते, किंवा इतर कोणीही येवोत, माझ्याकडेच आपली मागणी घेवून येत. आणि अश्या लोकांचा संग्रह ही मोठी संपत्ती मी जमा केली होती. तिचा अभिमान होता. आणि हे डीन  नसतानादेखील ! अश्याच एकावेळी, १९८६ साली र.कृ.जोशी सर माझ्याकडे आले व मला म्हणाले, दिल्लीला ' जागतिक कॅलीग्राफीक परिषद भरवत आहे व इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट तर्फे डॉ. कपिला वात्सायन यांनी हे काम मला सांगितले आहे. प्रोजेक्ट मोठे होते. त्यासाठी काम करायला त्यांना हवे होते काही पक्क

जयप्रकाश नारायण यांचे सरकारी पातळीवरील खोटे निधन :

Image
२३ मार्च १९७९ चा दिवस एक भयानक रूप घेऊन या देशात आला.  दुपारी १.१० च्या सुमारास आकाशवाणीने आपले रोजचे दैनंदिन कार्यक्रम अचानकपणे बंद करून देशाला एक सुन्न करणारे वृत्त दिले. आणि ते होते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे दुःखद निधन! वास्तवीक जयप्रकाश नारायण हे त्याकाळी जसलोक इस्पीतळात मृत्यूशी झुंजत होते. कोणत्याही क्षणी अशी बातमी येईल ह्याची जनतेला अपेक्षा होती. आणि या बातमीवर विश्वास न ठेवण्यासारखे कांहीच नव्हते. थोड्याच वेळात जसलोक इस्पीतळाला वृत्तपत्र वार्ताहर, दूरदर्शन चॅनल, छ्यायाचित्रकार यांनी गराडा घातला. आणि इकडे निष्णात डॉक्टरांची फौज जयप्रकाश याना आराम पडावा म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत होते. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून झटत होते. आणि त्यावेळी त्यांनी हे वृत्त पाहीले तेव्हां जसलोकचे संचालक डॉ. टी. एच. रिंदानी ओरडलेच, येथे आम्ही शर्थीचे प्रयत्न करीत आहोत, आणि तेथे पहा ते काय वृत्त देत आहेत ? एका जिवंत व्यक्तीला मृत समजून ही बातमी दिली होती, तीही अश्या व्यक्तीला की त्याकाळात आपल्या एका शब्दावर संपूर्ण देशाला हालवीत असे. आणि राज्यसभेत पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जयप्रकाश नार

एक दृष्टा औद्योगीक विकास महापुरुष : भाऊसाहेब नेवाळकर

Image
या महाराष्ट्रात अशी अनेक व्यक्तीमत्वे घडली, की ज्यांची फक्त आपण शिखरेच पाहू शकलो. पण त्यांच्या अफाट कार्याचा भाग जो आपणास दृष्टीक्षेपात आला नाही, त्यावरून आपण त्यांचे मोठेपण जोखू शकलो नाही. एखाद्या प्रभावशाली ज्योतीचा दूरवर पडलेला प्रकाश केवळ आपण जाणू शकलो. त्या ज्योतीची संवेदनशक्ती पाहू शकलो नाही. आणि आपल्या कर्तव्याने, कृतीने, युक्तीने , व्यासंगाने अफाट असलेली ही दृष्टी माणसे आपण आपणाप्रमाणे सर्वसामान्य समजू लागलो. त्यांना आपल्यातीलच समजू लागलो. कारण त्या व्यक्तीही आपले मोठेपण विसरून सर्व सामन्यांमध्ये समरस होत. त्यांच्यातच मिसळून जात. अश्याच एका महापुरुषाचे नांव आहे, गणेश बा. उर्फ भाऊसाहेब नेवाळकर. २८ ऑगस्ट १९१५ रोजी जन्मलेल्या भाऊसाहेबांचा स्वातंत्र्य चळवळीशी जवळून संबंध आला. अनेक पुढारी त्यांच्या सान्नीध्यात आले.  ते स्वतः भूमीगत होते. अनेक मोठमोठ्या नेत्यांची संगत त्यावेळी त्यांना होती. सर्वानीच आपली नांवे बदलली होती..भाऊसाहेबांनी 'नवरे' हे नांव घेतले होते. पण स्वातंत्र्यानंतर मात्र भाऊसाहेबांनी राजकारण अंगीकारले नाही. लहान सहन नोकऱ्या करणे, पत्रकारीता करणे यातच ते आपल

अग्रलेखांचा बादशहा : निळकंठराव खाडीलकर

Image
या महाराष्ट्रात अनेक साहीत्यिक झाले. ज्यांच्या साहीत्याने भारलेल्या अनेक पिढ्या येथे समृद्ध झाल्या.अनेक विचारवंतांना त्यांनी प्रगल्भ बनवीले. तसेच या मातीत अनेक पत्रकारही निर्माण झाले. पत्रकारांची थोर परंपरा या महाराष्ट्राला लाभली. अगदी लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर, ज्ञानप्रकाशचे काकासाहेब लिमये, काळ कर्ते शिवरामपंत परांजपे असे एकापेक्षा एक दिग्गज असे विद्वान आणि विचारवंत अभ्यासू पत्रकार त्या स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले. टिळकांचा केसरी, कोल्हटकरांचा संदेश, अशी समाचार पत्रे त्याकाळी निघत होती ही पत्रे केवळ बातम्या देण्याची कामे करीत नसत, तर ती स्वातंत्र्याने प्रेरीत झाली होती. त्यांची स्वतःची वैयक्तीक विचारशैली होती. ही वृत्तपत्रे  स्वातंत्र्यासाठी लढत होती. पिढ्या घडवीत होती. केसरी हे पत्र विचारवंतांचे होते. त्यातून टीकाही तारतम्य राखून केली जायची. पुढे लो.टिळकांना त्यांच्या सरकारविरोधी लेखनामुळे शिक्षा झाली अन केसरी चालविण्याची जबाबदारी नरसिंह चिंतामण केळकर यांच्यावर पडली. जोडीला होते संपादकीय व्यवस्था पाहणारे काका