Posts

Showing posts from January, 2020

प्रतापगडावरील शिवस्मारक :

Image
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र व त्यांचे चित्र अथवा शिल्प दर्शन महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाला प्रेरणादायक ठरले आहे. अनेक ठिकाणी उभारलेले महाराजांचे भव्य पुतळे नेहमीच आपणाला स्फूर्ती देत असतात. आग्र्याच्या लाल किल्ल्यासमोर उभारलेलं पुतळाही प्रत्येक मराठी मनाला आनंद देणारा आहे. केवळ महाराजांचे नामःस्मरण करताच आपले मस्तक त्यांच्यापुढे भक्तीभावाने, आदराने विनम्र होते. अश्या महापुरुषाच्या एका भव्य पुतळ्याचे अनावरण भूतपूर्व पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते शनीवार दिनांक ३० नोव्हेंबर, १९५७ रोजी प्रतापगडावर झाले. हिंदवी स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजलखानाला महाराजांनी जेथे मातीत मिळवले, त्या प्रतापगडावरील या पुतळ्यामागे काही इतीहास लपला आहे हे कदाचीत सर्वाना माहीती नसेल. सातारा जिल्ह्यांत वाई तालुक्यांत महाबळेश्वर पासून पश्चिमेस आठ मैलांवर प्रतापगड आहे. जावळीजवळ असलेल्या भोरण्या डोंगरावर हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३५४३ फूट उंचीवर बांधण्यात आला. त्रिदळासारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला बांधताना महाराजांनी आपणाला शत्रूचा उपसर्ग होणार नाही व सुरक्षीतपणे कोकण

विकास सबनीस आणि व्यंगचित्रे.

Image
नुकताच विकास आपणास सोडून गेला. आपल्या व्यंगचित्रांसहीत गेला. व्यंगचित्रे हीच त्याची भाषा होती. आणि तेच त्याचे व्यक्त होण्याचे एक माध्यम होते. आधीच या महाराष्ट्रात तशी व्यंगचित्रकारांची वानवाच आहे. आणि त्यातही राजकीय व्यंगचित्रे काढणे हे तर दुर्लभच! व्यंगचित्र ही अशी कला आहे की त्यात केवळ चित्रे काढता येऊन भागत नाही. केवळ त्याची चेहरेपट्टी ओळखता येऊन चालत नाही तर याच्याही पुढे जाऊन ज्या व्यक्तीचे व्यंगचित्र आपण रेखाटतो त्यातील त्याचे वर्म शोधून तो आपल्या कुंचल्याद्वारे आविष्कृत करण्याची ताकद त्यांमागे असावी लागते. असे म्हटले जाते की व्यंगचित्रकार दोन ओळींच्या मधील वाचतो. शंभर अग्रलेखांची ताकद एका राजकीय व्यंगचित्रात असते. पूर्वीच्या काळी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कला दिग्दर्शक  वॉल्टर लॅंगहॅमर हे राजकीय व्यंगचित्रेही काढीत असत. मोजक्या रेषातून त्यांचा आशय प्रकट होत असे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तो! चर्चील, रुझवेल्ट, हिटलर,मुसोलीनी, चेम्बरलेन, स्टालीन, नेहरू, गांधी अशी जबरदस्त मॉडेल्स त्यांच्यापुढे असत. त्याच सुमारास गोडसे, दलाल,असे लोकही या राजकीय व्यंगचित्रांच्या मालीकेत आले होते.