Posts

Showing posts from November, 2020

चित्रकार ते वेषभूषा संकल्पन - एक प्रवास : भानू अथैय्या

Image
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कला इतिहासकार व क्युरेटर जेहरा झुमाभॉय ह्या न्यूयॉर्क मधील एशिया सोसायटी म्युझियमसाठी भारतातील एके काळी गाजलेल्या ‘प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’च्या प्रदर्शनाची तयारी करीत असता त्याचा मागोवा घेण्यास आरंभ केला. त्यावेळी त्यांना प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या मुंबईतील शेवटच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग मिळाला. तो अभ्यासत असताना त्यांना आढळले की हा ग्रुप केवळ पुरुष कलाकारांशी संबंधीत नव्हता. त्या प्रभावाखाली आधुनीक चित्रकला आविष्कृत करणाऱ्या  एका अनोळख्या  महिलेचेही नांव त्यामध्ये होते. आणि यावर झुमाभॉय यांनी संशोधन सुरु केले. ते नांव होते, भानुमती राजोपाध्ये. आणि त्या नांवाचा शोध घेत असता त्या थेट पोचल्या त्या भानू अथैय्या या नावापाशी. आणि या भानू अथैय्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून १९८३ मध्ये रिचर्ड ॲटेनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर अवार्ड पटकावणाऱ्या भानू अथैय्या ह्याच होत्या. ऑस्कर मिळताच भानू अथैय्या या जगप्रसीध्द झाल्या. कॉश्च्युम डिझाइनर म्हणून त्यांचे नांव सर्वत्र गाजू लागले. तसे ते आधीपासूनच चित्रपट सृष्टीत गाजत होते. पण चित्रकल

प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपचा शेवटचा शिलेदार : मनोहर म्हात्रे.

Image
  एखादी व्यक्ती इतकी चांगली असू शकते? कुणाबद्दल असूया नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही किंवा कुणाच्या अपरोक्ष कधी वाईट बोलणे नाही. आहे तो केवळ मनाचा चांगुलपणा, बोलण्यातील मार्दव, दुसऱ्याबद्दल केवळ आपुलकी आणि स्वभावातील पारदर्शकपणा. स्वतः कलाकार तर आहेच शिवाय कला क्षेत्रातील एवढी प्रचंड माहीती, वारसा आणि व्यासंग हे की एखाद्याला एनसायक्लोपीडीयाची गरजच भासू नये. आणि ही व्यक्ती म्हणजे ज्या प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपने कलेची मूल्यच बदलली त्या कलाकारामधील एक शेवटचे शिलेदारच म्हणा ना! किँवा ' द लास्ट एम्पेरीयर मनोहर म्हात्रे. चित्रकलेतील एक प्रयोगशील,  आणि आदरणीय असे नांव.   मनोहर म्हात्रें यांचा जन्म अलीबाग जवळील धाकोडे नावाच्या एका लहानश्या गावात झाला.  यांना त्याकाळातील अनेक चित्रकलेने झपाटलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे कलेच्या ओढीने ग्रासले होते. मिळेल ते पुस्तक, मिळेल तो कागद घेऊन त्याच्यावर चित्रे रेखाटने हे एकच काम मनोहर करीत असे. हा मुलगा पुढे काहीच करणार नाही याची जणू खात्रीच सर्वाना वाटत असे. आणि काहीच न येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे.जे.स्कुल मध्ये घालतात हा एक प्रवाद त्याकाळात असे.

एक सज्जन, प्रेमळ, सच्चा कलोपासक पारशी : केकू गांधी.

Image
  माझ्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट च्या सहवासात जे.जे.च्या पुण्याईमुळे अनेक महापुरुष माझ्या संपर्कात आले. आणि त्यापैकी कांही तर माझ्या काळजाचा तुकडा बनून राहीले. अशीच एक प्रेमळ आणि मायेचा वर्षाव करणारी, आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने दुसऱ्यांची मनं जिंकणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे कलाक्षेत्रात ज्यांचे नांव अत्यंत आदरपूर्वक घेतले जाते ते कलोपासक केकू गांधी. मुळातच पारशी लोक हे प्रेमळ स्वभावाचे. त्यातही कलासक्त मनोवृत्तीचे असले की त्यांच्या आचार विचारातून, त्यांच्या वाणीतून तो खानदानीपणा आवर्जून दिसून येतो. अश्याच एका धनाढ्य पारशी कुटुंबात  कैखुश्रू मिनोचेअर गांधी यांचा जन्म  २१ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. लहानपणापासून तो केकू या नांवानेच ओळखू जाऊ लागला.  वडील मोठे कारखानदार होते. त्यांचा केमीकल मोल्डींगचा कारखाना होता. वांद्र्याला समुद्राच्या जवळ तोंड करून असलेला त्यांचा 'केकी मंझील' हा मोठा बंगला होता. लहानग्या केकूचे आयुष्य तेथे मोठ्या लाडाकोडात गेले. मुंबईतील शालेय शिक्षण झाल्यानंतर केकू १९३८ साली लंडनला पुढच्या शिक्षणासाठी केम्ब्रीज येथे पेमब्रोक काॅलेजमध्ये गेले.