Posts

'बॉंबे स्कुल' कला परंपरेतील स्त्री चित्रकार : एक अभ्यासपूर्ण कला विषयक पुस्तक

Image
  नुकतेच श्रीमती साधना बहुळकर यांनी लिहीलेले ' बॉंबे स्कुल कला परंपरेतील स्त्री चित्रकार' हे कला विषयक पुस्तक वाचनात आले, आणि ते संपूर्ण पुस्तक वाचताना मला त्या काळातील चित्रकारांच्या जगात घेऊन गेले. साधना बहुळकर या मूळच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी. त्यांना चित्रे काढतानाच या चित्र परंपरेचा अभ्यास करण्याची  विलक्षण ओढ होती. त्यामुळे त्या अंगानेही त्या प्रगल्भ होत गेल्या. त्यांचा विवाह झाला तोही विख्यात चित्रकार श्री सुहास बहुळकर यांच्याशी. यामुळे त्यांच्या अभ्यासू मनाला शिक्षकी खतपाणी मिळणे हे ओघानेच आले. आपल्या आयुष्यात साधनाताईंनी अनेक भुमिका वठवील्या. चित्रकार त्या होत्याच, शिवाय प्रख्यात वृत्तपत्रे, नियतकालिके यातून चित्र समीक्षण त्या करीत असत. कांही काळ त्यांनी ॲनीमेशन फिल्मसाठी सहाय्यक चित्रकार म्हणून कार्यरत राहिल्या. कला समीक्षक म्हणून त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली. अर्थात मी त्यांना त्यांचा सुहास बहुळकर यांच्याशी विवाह होण्यापूर्वीपासून त्या साधना खडपेकर असल्यापासून ओळखत होतो. आमच्या उपयोजीत कलेच्या कांही उपक्रमावर देखील त्यांनी त्याकाळात नवशक्तीमधून ले...

दीनानाथ दलाल- चित्र आणि चरीत्र

Image
  २५ तारखेला दुपारी कुरिअरवाल्याने एक जाडजूड पार्सल आणून दिले. इतके व्यवस्थीत आणि नीटनेटके पार्सल उघडून पाहील्यावर आतून निघाले ते राजहंस प्रकाशनाचे एक नवीन प्रकाशन ' दीनानाथ दलाल -चित्रं आणि चरित्र' हे सुहास बहुळकर यांनी लिहीलेला आणि राजहंस ने प्रकाशीत केलेला ग्रंथ. वास्तवीक दलाल हे आमच्या लहानपणापासून आमच्या आवडीचे चित्रकार. तो काळच असं होता की मुळगांवकर आणि दलाल या दोघा कलाकारांनी समस्त मराठी घरातील माणसांना आपसात वाटून घेतले होते. आणि चित्रकलेचा ओढा लागण्याचे काम मुळगावकरांची मनमोहक सौंदर्ययुक्त चित्रे करीत असत, अन जरा चित्रकलेतील कळू लागले की आपोआप सर्वजण दलालांकडे वळत असत. त्यांची रंगीत चित्रे आम्ही त्यावर चौकोन आखून मोठी कॅनव्हासवर मोठी करून ऑइल पेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करीत असू. एवढे त्यावयात आमच्यात दलाल भिनले होते. त्यांची प्रसीद्ध झालेली सर्वच चित्रे आम्ही अंकातून कापून व्यवस्थीत जपून ठेवीत असू. पुढे जे.जे.मध्ये शिकायला आल्यावर केनेडी ब्रिजवरून जातांना पहील्या मजल्यावरील त्यांच्या स्टुडिओवरील 'दलाल आर्ट स्टुडीओ' ही दिमाखदार पितळी पाटी दिसत असे. वाटे की कधीत...

सर्वांगसुंदर पाडेकर.

Image
  दत्तात्रय पाडेकर आणि त्यांची लयबद्ध सही ही सर्वच कलाकार, कलाविद्यार्थी, आणि कलारसीक यांच्या ओळखीची आहेच! पाडेकर हे सतत प्रयोगशील असतात. संपूर्ण कलाक्षेत्रात त्यांची चित्रे, त्यांची शैली, आणि त्यातील लयबद्धता याबद्दल माहीती आहे. असे हे पाडेकर सतत चित्रे आविष्कृत करण्यात मग्न असतात, त्यातूनही त्यांची ग्राफिक्स, प्रिन्टमेकींग, निसर्गचित्रे, बोधचित्रे, शिल्प अश्या चित्रकलेच्या विविध दालनातून मुक्त मुशाफिरी सुरु असते. आणि गंमत म्हणजे, निरनिराळी प्रदर्शने, चर्चासत्र, कला महाविद्यालयातून प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असलेले पाडेकर पाहणाऱ्याला बहुदा बाहेरच दिसत असतात. म्हणजे यांचा दिवस किती तासाचा असतो, हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतो, इतके ते चतुरस्त्र आहेत. पेहरावही कसा तर स्वच्छ असा खादीचा पांढरा कुडता आणि पांढरा पायजमा. यात कधीच बदल झाला नाही. किंबहुना ती त्यांची आता ओळख बनली आहे. विध्यार्थी दशेपासूनच बाहेरून संस्थेत मार्गदर्शनासाठी येणाऱ्या चित्रकाराकडूनही त्यांचे कौतुक केले जात असे. आणि यामुळेच थोर चित्रकार व्ही.एस.गुर्जर यांच्याशी त्यांचे अखेरपर्यंत सौख्य राह...

मुंबई पोलीसातील एक मानवतावादी, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी मैत्री साधणारा सहाय्यक पोलिस आयुक्त : अविनाश धर्माधिकारी

Image
  आज मुंबई पोलीस खात्यात एकापेक्षा एक असे कर्तबगार पोलीस अधिकारी आहेत. पोलीस सेवेत असताना त्यांचा दिवस सर्वसाधारण माणसाप्रमाणे चोवीस तासांचा नसून तो चक्क छत्तीस तासांचा असतो. पोलीस अधिकारी हा कधीच रिकामा दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याची उकल त्यांना सतत करावी लागत असते. त्याशिवाय रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासोबतच कायदा व सुरक्षितता यांचेही रक्षण करावे लागते. या त्यांच्या मानसीक तणावामुळे कित्येकदा एखादा माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढल्यावर कदाचित दुखावला जातो. पण पोलीस खात्यातील अधिकारी वर्ग मात्र जनतेची मानसीक परिस्थिती जाणून त्यांच्या मनाला दुखावेल अशी कोणत्याही तऱ्हेची गोष्ट न करता शांतपणे, हळुवारपणे त्याच्याशी संभाषण साधून त्याच्या मनातील दुःखावर फुंकर घालतात. पण बहुतेक वेळा सामान्य लोकांचा या अधिकारी वर्गाशी फारसा संबंध येत नाही. त्यांचा बहुतेक संबंध येतो तो रस्त्यावरील हवालदाराशी, पोलीस शिपायाशी आणि त्यात कांही वेळा लोकांना कांही पोलिसांचा अनुभव बरा आलेला नसतो. व त्यावरून जनता सर्वच पोलीस खात्याबद्दल आपले मत बनवते. आणि हा पोलीस शिपाई त्या खात्याचा चेहरा होतो. आणि जनता व र...

भक्ती आणि शक्ती, चारित्र्य आणि चैतन्य यांचा संगम : गुरुजी गोळवलकर

Image
  'देवाचा शोध की देशाची सेवा' या दोन गोष्टींच्या संभ्रमात एक तेवीस वर्षाचा तरुण पडला होता. या वयातील त्याचे मित्र आपले उमलते आयुष्य सुखासमाधानात, ख्याली खुशालीत वा मौज मजेत घालवीत होते. या तरुणाच्या सभोवतालीही तशी प्रलोभने होती. पण हा युवक मात्र खंबीरपणे त्या लौकीक सुखाना लाथाडून 'देश की देव' या विवंचनेत पडला होता. आत्मोन्नती व मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाऊन तप करावे, का आपल्या देशासाठी, त्याच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य समर्पित करावे. याच द्विधा मनस्तीतीत तो होता. मात्र कोणत्याही वाटेवरून गेले तरी त्यामध्ये अपरंपार कष्ट, काटेरी वाटचाल व खडतर साधना आहेच, याचीही त्याला पूर्ण जाणीव होती. विचारांती या युवकाने ठाम निर्धार केला की, हिमालयात न जाता येथेच या भवसागरात राहूनच संन्यस्त वृत्तीने मी माझी कर्मे पार पाडीन. या तेजस्वी तरुणाचे नांव होते ' माधव सदाशीव गोळवलकर'. १९ फेब्रुवारी १९०६ रोजी नागपुरमधील रामटेक येथे एका शिक्षकाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. एकूण नऊ अपत्यांपैकी वाचला फक्त एक. माधव! त्यामुळे आई-वडिलांचा त्यांच्यावर खूपच जीव होता. १९२२ मध्ये म्यॅट्रिक झाल्याव...

लोकशाहीचा कैवारी: बॅ. नाथ पै

Image
    कोकणच्या भूमीने या महाराष्ट्राला, पर्यायाने राष्ट्राला अनेक नररत्ने दिली आहेत. राजकारण, साहीत्य, काव्य, कला, समाजसेवा या सर्वच आघाडयांवर येथील लोक गाजले. आपला देश गुलामगिरीत असतांना या भूमीतील अनेकांनी तळहातावर शीर घेऊन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला. त्यापैकी कांही भाग्यवानांना स्वतंत्र हिंदुस्तानामध्ये जनतेचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. व ती संधी त्यांनी निःस्वार्थीपणानें पार पाडली. यापैकी बॅरीस्टर नाथ पै हे एक लढवैये नेते.  २५ सप्टेंबर १९२२ साली कोकणातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथ पै यांना पितृछत्र फारसे लाभले नाही.त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांचे वडील वारले. मात्र त्यांना घडवण्यात त्यांच्या मातोश्री तापी व वडील बंधू अनंत यांच्या संस्काराचा मोठा वाटा होता. नाथांचे प्राथमीक शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. नंतर ते बेळगाव येथे आले. तेथील बेनन स्मिथ हायस्कुल व नंतर लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून  अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असतानाच त्यांना त्यांच्या ठायी असलेल्या वकृत्व ...