Posts

आय लव्ह यू रसना!

Image
  प्रत्येक घरातील , कुटुंबातील आणि बच्चा कंपनीतील हृदयातील जागा व्यापणारे एक मधुर पेय त्या काळात आले , जेव्हां बाजारातील ब्रँडेड पेय मध्यम वर्गीयांना परवडणारी नव्हती . आणि अश्या गरमीच्या वातावरणात अवतरली एक मनाला भावणारी लाईन , ' आय लव्ह यू रसना !'   १९६० च्या दशकात शीत पेय होती ती मुख्यत्वे करून कोका कोला , व्हीम्टो , गोल्ड स्पॉट , लेमन , मॅंगोला आदी सामान्य लोकांना क्वचित परवडणारी अशी . त्यावेळच्या त्यांच्या किमतीही साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या खिशांना परवडणे कठीणच असायच्या . आणि याचं दरम्यान भारतीयांना एक मधूर आणि उन्हाळ्यातील तहान   भागवणारे शीत   पेय   मिळाले . जे खिशाला सहजी परवडणारे होते , झटपट तयार करता येत होते , पाहुणे अचानक   घरीं आले तरी पाहुणचाराला तयार होतें किंवा छोट्या बच्चा   कंपनीच्या वाढदिवस अथवा तत्सम पार्टीला उपयुक्त होते . आणि ते पेय म्हणजे ' रसना ' हे कॉन्सन्ट्रेट सॉफ्ट ड्रिंक . आणि बघता बघता त्यांने येथील मार्केट तसेच माणसांची ...