Posts

लोकशाहीचा कैवारी: बॅ. नाथ पै

Image
    कोकणच्या भूमीने या महाराष्ट्राला, पर्यायाने राष्ट्राला अनेक नररत्ने दिली आहेत. राजकारण, साहीत्य, काव्य, कला, समाजसेवा या सर्वच आघाडयांवर येथील लोक गाजले. आपला देश गुलामगिरीत असतांना या भूमीतील अनेकांनी तळहातावर शीर घेऊन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला. त्यापैकी कांही भाग्यवानांना स्वतंत्र हिंदुस्तानामध्ये जनतेचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. व ती संधी त्यांनी निःस्वार्थीपणानें पार पाडली. यापैकी बॅरीस्टर नाथ पै हे एक लढवैये नेते.  २५ सप्टेंबर १९२२ साली कोकणातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथ पै यांना पितृछत्र फारसे लाभले नाही.त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांचे वडील वारले. मात्र त्यांना घडवण्यात त्यांच्या मातोश्री तापी व वडील बंधू अनंत यांच्या संस्काराचा मोठा वाटा होता. नाथांचे प्राथमीक शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. नंतर ते बेळगाव येथे आले. तेथील बेनन स्मिथ हायस्कुल व नंतर लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून  अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असतानाच त्यांना त्यांच्या ठायी असलेल्या वकृत्व ...

निसर्गप्रेमी प्रतिभावान स्वयंप्रेरीत कलाकार : अरुंधती वर्तक.

Image
  निसर्गाने आपल्याला वृक्षांच्या रूपाने आपलें जीवन समृद्ध होण्याचे एक महत्वपूर्ण साधन दिले आहे..या वृक्षांमुळे वातावरणातील पर्यावरणाचा समतोल रहातो, मानवी जीवन समृद्ध होतेच, हेंच वृक्ष आपल्याला सावली देतात, फळे देतात, याशिवाय त्यात एक भाव असतो तो या वनराईचे सौंदर्य. प्रत्येक ठिकाणच्या, भागातील वातावरणाच्या परिस्थितीमुळे तेथील वृक्षसौंदर्य बदलत असते. आणि हे सौंदर्य आपल्या कुंचल्यात नेमके पकडून त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीचा भर घालून त्यावर रंगांची उधळण करून आपल्या कॅनव्हासवर आविष्कृत करणारी एक जागतिक कीर्तीची चित्रकर्ती म्हणजे अरुंधती वर्तक. जणू जन्मापासून वृक्ष वेडाने भारावून निघालेली एक निसर्गवेडी कलाकार. अश्या या मनस्वी कलावंताला भेटण्याचा योग  मला अकस्मात आला. मी जे. जे.ला अधीष्ठाता म्हणून कार्यरत असतांना  आपल्या नियोजीत प्रदर्शनाचे आमंत्रण देण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या आमंत्रण पत्रिकेवरच त्यांच्या कलेची कल्पकता आणि ताकद दाखवणारी वृक्ष चित्राची कलाकृती होती.  प्रथमदर्शनी छाप पडेल अशा शांत, संयमी व्यक्तिमत्वाच्या अरुंधती  वर्तक अत्यंत मृदू स्...

तो एक काळ होता....

Image
  तो एक काळ होता, जेव्हां आम्हांला शाळा म्हणजे एक मंदीर वाटत होते, अन आमचे शिक्षक त्यातील देव. घासून पुसून, तावून सुलाखून आमच्या बुद्धीच्या रांजणात आपल्या ज्ञानाचे कलश रीते करीत होते. आम्हांला परीपू्र्ण करीत होते. आपली नांवे आमच्या हृदयावर कोरीत होते. आणि आमची मस्तके त्यांच्या चरणी ठेवीत होतो.   तो एक काळ होता, जेव्हां हरी नारायण आपटे, नाथ माधव, वि.सी.गुर्जर, न.चिं.केळकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, गो.ना.दातार, वि.स. खांडेकर, वि.वि.बोकील, मालतीबाई बेडेकर, ईरावती कर्वे या सारखे चतुरस्त्र कादंबरीकार आमचे साहीत्यिक ज्ञान वाढवीत होते. ग.दि.माडगूळकरांसारखे आधुनीक वाल्मीकी आपल्या अमृतमय शब्दलेण्यांनी महाकाव्याची बरसात करीत होते. जोडीला चित्रपट, कथा,भक्तीगीते, लावणी, अभंग अशा रचनानी चहुबाजूनी आमच्यावर संस्कार करीत होते.   तो एक काळ होता, चित्र महर्षी बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत पागनीस, वसंतराव जोगळेकर, राजा परांजपे, राजा गोसावी, विवेक अभ्यंकर, शरद तळवलकर, राजन जावळे, दामूआण्णा मालवणकर, धुमाळ, चंद्रकांत, सूर्यकांत, रमेश देव, दादा कोंडके, उषा किरण, बेबी शकुंतला, सुलोचना...

काळाच्या पुढे पहाणारा द्रष्टा चित्रकार: ग. ना. जाधव

Image
  वाचनाचे वेड अन घरात वडीलांच्या वाचन व्यसनाने येणारी असंख्य पुस्तके, मासीके यामुळे माझे वाचनाचे वेड तर वाढलेच, शिवाय त्यासाठी चित्रे काढून सजवणारे चित्रकारही त्या मासिका - पुस्तकातून माझ्या परीचयाचे होत गेले.दर्जेदार अशी त्याकाळची ती मासिके, त्यात लिहिणारे तितकेच व्यासंगी आणि शैलीदार असे लेखक आणि त्यांच्या कथा-लेख आपल्या चित्रशैलींनी वाचनीय आणि आकर्षित करणारे चित्रकार ह्या सर्वांचा तो सुवर्ण काळ होता. आणि या प्रकाशनामागे तितकीच समर्थ अशी लेखन कौशल्य असणारी संपादक मंडळी असे. त्यामधे झंकार व अंजली काढणारे ना. सी. फडके, वसंतचे दत्तप्रसन्न काटदरे, हंस-मोहीनी-नवलचे अनंत अंतरकर, नवयुगचे आचार्य अत्रे, प्रसादचे य.गो.जोशी-स.आ.जोगळेकर-सोनोपंत दांडेकर, दीपलक्ष्मीचे ग.का.रायकर, आवाजचे मधुकर पाटकर  असे एकापेक्षा एक असे मातब्बर. या सर्वांचे त्यांच्या प्रकाशनासाठी चित्रकार ठरलेले असत. यात प्रामुख्याने दीनानाथ दलाल, एस.एम.पंडीत, रघुवीर मुळगांवकर, व्ही.एस.गुर्जर,प्र.ग.शिरूर, शि.द.फडणीस, शंतनू माळी, वसंत सरवटे असे नामांकीत चित्रकार होते. त्यामुळे त्यांच्या शैलीचीही ओळख घडून येत असे. आणि त्याका...

रेषेने संवाद साधणारा चित्रकार: बाळ ठाकूर

Image
माझ्या शालेय जीवनापासून अनेक पुस्तके, मासिके, दिवाळी अंक माझ्या पहाण्यात आली. त्यातील कथांना असलेली विवीध चित्रकारांची चित्रे पहाण्यात अली. त्यांचा वेगवेगळ्या शैली मी ओळखू लागलो. त्यामध्ये बरेचसे पारंपारीक रूढीनुसार चित्रे काढणारे होते.तसेच कांही विशेष लक्षात रहाणारे, आधुनिकतेने काम करणारे होते. काळाच्या पुढे जाऊन त्यांची कामे आविष्कृत होत असत. त्यापैकी कांही म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, द. ग. गोडसे, स्वतःच्या कथांना चित्रे काढणारे व्यंकटेश माडगूळकर शिवाय ग.ना.जाधव, शि.द.फडणीस असे कांही कलावंत. त्यातही आपल्या रेषेने कथाचित्रांना प्रभावीत करणारे एक नांव होते, ते म्हणजे बाळ ठाकूर. आपल्या जोरकस व प्रवाही अश्या रेषेने कथा विषयाचे आकलन करून देणारे एका बोधचित्रकार.   भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण समस्त जाहीरात व साहीत्य क्षेत्रात ते बाळ ठाकूर या नावानेच परीचीत आहेत. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रील १९३० साली कोकणातील लांजा जिल्ह्यातील भांबेड या गांवी झाला. त्यावेळी शाळेत जाताना आतासारखी वह्या पेनची सोय नव्हती. असे ती लाकडी चौकटीतील दगडी पाटी. खाली पडली की तिचे...

सात्वीक मनाचा सोज्वळ, अध्यात्मिक चित्रकार : जिवाजी भिकाजी दीक्षित.

Image
  अगदी प्राथमीक शाळेत असल्यापासूनआमच्या घरी येणाऱ्या त्या काळातील मासीकातील 'प्रसाद' हे सुप्रसीध्द मासीक माझ्या आवडीचे होते. त्याचे संपादक मंडळ होते तेही अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामध्ये संपादक म्हणून  य.गो.जोशी, स.आ.जोगळेकर, सोनोपंत दांडेकर अश्या तीन व्यक्ती होत्या. या मासिकात संत वाङ्मय, ललित लेख, पौराणीक कथा असे बरेच वाचनीय साहीत्य असे. आणि हे सर्व वाचायला उद्युक्त करीत असे ते त्यात असलेल्या कथांची, मुखपृष्ठाची चित्रे. अत्यंत सुंदर रीतीने काढलेली ही बोधचित्रे कथा विषय, त्यातील भाव दर्शन, त्यातील रचनात्मक मांडणी यामुळे मोहीत करीत असत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक आणि सहज सुंदर भाव, ज्यात केवळ असे तो सुशील आणि सोज्वळ पणा. आणि ही चित्रे रेखाटणारे कलावंत होते ते ही सात्विक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे. जिवाजी भिकाजी दीक्षित अथवा जि.भि.दीक्षित. केवळ त्यांच्या चित्रशैली मधूनच परमार्थाची ओळख करून देणारा एक मनस्वी कलावंत! या प्रसाद मासिकात त्याकाळी अनेक नामवंतांच्या कथा असत. शिवाय त्यांनीच त्याकाळात महाराष्ट्राला 'वेताळ पंचविशी'  'सिंहासन बत्तीशी...