Posts

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

Image
आज २६ फेब्रूवारी २०२०. चोपन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले.  त्या आधी " आत्महत्या आणि आत्मार्पण " हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईच...

चित्रमंदीरातील तपस्वी : कला महर्षी के.बी.कुलकर्णी

Image
( बेळगांवचे विख्यात कलाकार व ज्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या निर्माण केल्या ते के.बी. कुलकर्णी सर  यांची जन्म शताब्दी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु होत आहे. बेळगांवात ती आज त्यांनी घडवीलेले त्यांचे माजी विद्यार्थी, त्यांचे स्नेही हे सर्व कलाप्रेमी मोठ्या प्रमाणात साजरी करीत आहेत. त्या निमित्ताने माझ्या गुरूना माझ्याकडून ही शब्दांचे भावपूर्ण अभिवादन! ) आजच्या पिढीला गुरु - शिष्य परंपरेबद्दल कितपत माहीत आहे, अथवा तसे शिक्षण घेतल्याची जाणीव आहे माहीत नाही. कारण आता शिक्षण एक पवित्र अशी परंपरा राहीली नसून ते एक अर्थार्जनाचे साधन बनले आहे. तरीही अजूनही संगीत, चित्रकला सारख्या क्षेत्रांत ही पवित्र परंपरा जोपासली जाते. शिक्षक -विद्यार्थी मध्ये एक जे व्यावहारीक नाते आज पाहीले जाते, ते गुरु- शिष्यामधे एका घट्ट अश्या पवित्र बंधनाने विणले जाते. एकदा चित्रकार वासुदेव कामतांनी म्हटले होते की, 'मला कांही असे चित्रकलेचे विद्यार्थी पहायला मिळाले, जे आपली कला निपुणतेने सादर करीत होते. मला हे विद्यार्थी जे.जे.स्कुल मध्ये पहायला मिळाले नाहीत, नाशीक अथवा पुण्याच्या कला महाविद्यालयात मल...

प्रतापगडावरील शिवस्मारक :

Image
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र व त्यांचे चित्र अथवा शिल्प दर्शन महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाला प्रेरणादायक ठरले आहे. अनेक ठिकाणी उभारलेले महाराजांचे भव्य पुतळे नेहमीच आपणाला स्फूर्ती देत असतात. आग्र्याच्या लाल किल्ल्यासमोर उभारलेलं पुतळाही प्रत्येक मराठी मनाला आनंद देणारा आहे. केवळ महाराजांचे नामःस्मरण करताच आपले मस्तक त्यांच्यापुढे भक्तीभावाने, आदराने विनम्र होते. अश्या महापुरुषाच्या एका भव्य पुतळ्याचे अनावरण भूतपूर्व पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते शनीवार दिनांक ३० नोव्हेंबर, १९५७ रोजी प्रतापगडावर झाले. हिंदवी स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजलखानाला महाराजांनी जेथे मातीत मिळवले, त्या प्रतापगडावरील या पुतळ्यामागे काही इतीहास लपला आहे हे कदाचीत सर्वाना माहीती नसेल. सातारा जिल्ह्यांत वाई तालुक्यांत महाबळेश्वर पासून पश्चिमेस आठ मैलांवर प्रतापगड आहे. जावळीजवळ असलेल्या भोरण्या डोंगरावर हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३५४३ फूट उंचीवर बांधण्यात आला. त्रिदळासारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला बांधताना महाराजांनी आपणाला शत्रूचा उपसर्ग होणार नाही व सुरक्षीतपणे कोकण...

विकास सबनीस आणि व्यंगचित्रे.

Image
नुकताच विकास आपणास सोडून गेला. आपल्या व्यंगचित्रांसहीत गेला. व्यंगचित्रे हीच त्याची भाषा होती. आणि तेच त्याचे व्यक्त होण्याचे एक माध्यम होते. आधीच या महाराष्ट्रात तशी व्यंगचित्रकारांची वानवाच आहे. आणि त्यातही राजकीय व्यंगचित्रे काढणे हे तर दुर्लभच! व्यंगचित्र ही अशी कला आहे की त्यात केवळ चित्रे काढता येऊन भागत नाही. केवळ त्याची चेहरेपट्टी ओळखता येऊन चालत नाही तर याच्याही पुढे जाऊन ज्या व्यक्तीचे व्यंगचित्र आपण रेखाटतो त्यातील त्याचे वर्म शोधून तो आपल्या कुंचल्याद्वारे आविष्कृत करण्याची ताकद त्यांमागे असावी लागते. असे म्हटले जाते की व्यंगचित्रकार दोन ओळींच्या मधील वाचतो. शंभर अग्रलेखांची ताकद एका राजकीय व्यंगचित्रात असते. पूर्वीच्या काळी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कला दिग्दर्शक  वॉल्टर लॅंगहॅमर हे राजकीय व्यंगचित्रेही काढीत असत. मोजक्या रेषातून त्यांचा आशय प्रकट होत असे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तो! चर्चील, रुझवेल्ट, हिटलर,मुसोलीनी, चेम्बरलेन, स्टालीन, नेहरू, गांधी अशी जबरदस्त मॉडेल्स त्यांच्यापुढे असत. त्याच सुमारास गोडसे, दलाल,असे लोकही या राजकीय व्यंगचित्रांच्या मालीकेत आले हो...

आमचा मार्शल

Image
अगदी समजायला लागल्यापासूनच मला प्राण्यांची ओढ होती. त्यातही कुत्रा व मांजर हे सर्वाप्रमाणे माझेही आवडते प्राणी. गावाकडे कोणाकडे कुत्रीला अथवा मांजरीला पिल्ले झाल्याचे समजले की आधी त्याचे आरक्षण करणे हे आम्हां भावंडांचे काम. त्यात माझ्या मोठ्या बहिणीला तर मांजर म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे एकमेकांचे शत्रु समजले जाणारे हे दोघे प्राणी आमच्या घरात सुखानैव रहात असत. मांजर दिवसभर घरातील चुलीच्या कोपऱ्यात उबेला बसलेले असे, तर कुत्र्याची सोय ही नेहमी घराबाहेर. त्यालाही माहीत असे की आपल्याला घरात प्रवेश नाही. त्यामुळे जेवण मागतांना तो उंबऱ्यावर दोन पाय ठेवून भुंकू लागे.  त्यामुळे कायमच कुत्रा आमच्या घरातील एक कुटुंबाचा सदस्य म्हणूनच राहीला. मी मुंबईला आल्यावर माझा लहान मुलगा हर्षद याला कुत्र्याचे बरेच वेड होते. मी त्याला अनेकवेळा क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेवून तेथील वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे, मांजरे, पक्षी वगैरे दाखवीत असे. व त्याचा एकच ध्यास होता, तो म्हणजे त्याला एक कुत्रा घेऊन देण्याचा. आमची जागा, त्यातून अश्या जातीवंत कुत्र्यांना लागणारी देखभाल, आपल्याला झेपेल की नाही याचे त्यावयात...

सौ. भारती : माझी सहचारीणी

Image
मला अजूनही आठवतो तो दिवस. १ डिसेंबर १९६८. त्यादिवशी मी जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागलो. तो दिवस रवीवार असल्याने मी दोन तारखेला कामावर रुजू झालो. तसे जे.जे. मला नवीन नव्हते. अगदी बालपणापासूनच त्याची लागलेली ओढ माझ्या वडीलबंधूंनी पूर्ण करून मला तेथील जे.जे. इंस्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचा विध्यार्थी हे नामाबिधान लावण्याची संधी मिळवून दिली. या काळात अनेक जणांच्या आशीर्वादाचे हात माझ्या मस्तकावर मला लाभले. त्यामुळे येथे अध्यापक म्हणून आल्यावर मला सर्वप्रथम जाणवले ते माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या जे.जे.त मी परत आल्याची सुखद जाणीव. फरक इतकाच होता, की यापूर्वी मी घोळक्यासह शिक्षकांच्या टेबलासमोर उभा असे, ते आता माझ्यासमोर माझ्या विद्यार्थ्यांचा घोळका समोर घेऊन. आणि माझे सर्वच गुरुवर्य सोबत असतांना आणि त्यांचे प्रेम मला सतत लाभत असताना मला त्यांच्या शेजारी बसण्याचे भाग्य लाभले हे देखील ईश्वराने मला दिलेले लेणं होते. आणि तेथून सुरु झाली ती माझी शिक्षकी पेशातील वाटचाल. शाळेत असल्यापासूनच आम्ही सर्व मुलांच्या शाळेत शिकलो असल्याने येथील वर्गात असल...