स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण
आज २६ फेब्रूवारी २०२०. चोपन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले. त्या आधी " आत्महत्या आणि आत्मार्पण " हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईचे महापौर, सोपानदेव चौधरी, सुधीर फडके आदी सावरकर भक्त होते. लाखो लोकांचा महासागर चंदनवाडीच्या स्मशानभूमीकडे वळला होता. त्यामध्ये तरुण होते वयस्क होते, पुरुष -स्त्रिया शाळकरी विद्यार्थी असे सर्वच भावनाशील होऊन सामील झाले होते. नव्हते फक्त काॅंग्रेसवाले. खुद्द राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई हे स्वतः सावरकर भक्त होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या अंत्ययात्रेत सामील व्हायचे होते, पण सरकारने त्यांनाही मनाई केली होती.
स्मशानभूमीत अत्र्यांनी भाषणात सांगितले," येथे लाखो लोक जमलेले आहेत पण या महाराष्ट्र सरकारचा एकही मंत्री हजर नाही त्याचा मी धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर तात्या आज आपणातून गेले.तात्यांनी जन्मभर मृत्यूशी झुंज दिली. अनंत मरणे मारून ते शेवटपर्यंत जगले. आणि मृत्यूशी झगडता झगडता आज निघून गेले. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे अप्रिय काम आपल्यावर येऊन पडले आहे. स्वातंत्र्यवीर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते. वाङ्मयीन, सामाजीक अशा प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसर होते. आज वास्तविक राष्ट्रपतींनी तात्यारावांना " भारतरत्न " पदवी द्यावयास हवी होती ! आज महाराष्ट्र सरकारचा कोणीही मंत्री हजर नाही याला काय म्हणावे? तात्या महान क्रांतिकारकच नाहीत , महान साधू आहेत ! त्यांनी प्रायोपवेशन केले ! आत्मार्पण केले ! कुमारील भट्टाने अग्निकाष्टे भक्षण केली. शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. ज्ञानेश्वरांनी - एकनाथांनी समाधी घेतली. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. तसे आमचे तात्या ! त्यांनी आत्मार्पण केले. प्रायोपवेशन केले ! तात्यांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. यानंतर सुधीर फडके यांनी “ आम्ही जातो आमुच्या गांवा “ हा तुकोबांचा अभंग गात सर्व जमावाला त्यात सामील करून घेतले व थोड्याच अवकाशात तात्याराव अनंतात विलीन झाले.
आणि दुसऱ्या दिवसापासून आचार्य अत्रेंनी 'दैनिक मराठा ' मधून रोज तात्यारावांच्या जीवनाचे एकेक पैलू उलगडणारे चौदा अमर लेख लिहिले. स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारी गाथा आणि आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी यांच्या संगमाचा हा एक मनोमिलाप होता. सावरकरांच्या हाल अपेष्टा आणि यमयातना त्यांच्या लेखांतून वाचताना आपले रक्त उसळू लागते. काळजात हजारो सुया टोचल्या जातात. आपल मेंदू जणू उखळात घालून ठेचत आहे असे जाणवते. आणि त्या सावरकर नामक क्रांतीकारकांच्या मुगुटमणीप्रती आपण नतमस्तक होतो. केवळ त्या पवित्र पायावर साक्षात दंडवत घालावेत, हीच एक भावना मनांत शिल्लक रहाते. ते सर्व मृत्युलेख वाचून मी इतका भारावून गेलो की ते सर्व लेख माझ्या हस्ताक्षरात लिहून
त्याचे "मृत्युन्जय " हा ग्रंथ हस्तलिखीत ग्रंथ तयार करून मी आचार्य अत्रे याना अर्पण केला. एखाद्या छापील पुस्वतकांप्ररमाणे मी त्याची रचना केली होती. आ. अत्र्यांनी दैनिक मराठा मध्ये माझ्यावर लिहून माझे कौतुक केले होते.आचार्य अत्र्यांच्या त्या अग्रलेखांचे पुस्तक कधी निघाले नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबीयाकडेही हे लेख नसावेत. मात्र आजही ते सर्व अग्रलेख माझ्या संग्रहात आहेत. एकेक अग्रलेख वाचताना आजही अत्र्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास किती प्रभावी होता, याची जाणीव या भाषाप्रभूंची लेखणी आणि वाणी वाचता ऐकताना होते.खुद्द आचार्य अत्र्यांनीच म्हटले होते ' भाषा प्रभू म्हणवणारे आम्ही, पण आज आम्हांलाही शब्द वाकवताना कसरत करावी लागते आहे. इतके ते दुःखाने उन्मळून गेले होते. त्यांनी लिहीलेल्या त्या अमर अग्रलेखामधील पहीलाच अग्रलेख मी माझ्या मित्रांच्या अवलोकनार्थ आज स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त वाचनासाठी देत आहे. क्रांतीकारकांच्या मुकुटमणीला कोटी कोटी प्रणाम.
— प्रा. मं. गो. राजाध्यक्ष.
१. तात्या गेले !
अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,
की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने,
जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,
बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !
तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.
सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, " देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !" वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ' अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ' १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ' अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.
अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ' मोरिया ' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ' भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर " आझाद हिंद "चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ' पाया ' आणि सुभाषचंद्र हे ' कळस ' आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.
मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ' हे कृष्ण, हे श्याम ' असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.
तुकोबा ' आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून
कांहीच उरले नाही.
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
आचार्य अत्रे.
दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.






हा लेख हे शब्द ऐकून, स्मरून मी धन्य झालो.
ReplyDeleteअसा देशभक्त पुन्हा होणे नाही 🙏🙏
Deleteशब्दच नाही. बोलायला . केवळ शब्दातीत.... साक्षात लोटांगण.... 🙏🙏
ReplyDeleteकाय लिहू? मी अगदीच घुंगुरडे आहे या महान व्यतिमत्वांपुढे. विनम्रपणे प्रणाम करणे हेच फक्त मी करु शकते.प्रणाम वीरवरा.
ReplyDeleteनि:शब्द🙏
ReplyDeleteसर तुम्ही बनवलेले पुस्तक किंवा ते १४ लेख शेअर करता येतील का?
ReplyDeleteखरंच, कृपया ते पुस्तक किंवा लेख शेअर करू शकला तर खूप आभार होतील... पुढच्या पिढीला किंवा प्रत्येक पिढीला स्वातंत्रवीर सावरकर कोण होते हे कळणे गरजेचे आहे.
Deleteअदभुत, विस्मयकारक
Deleteकितीही लिहिले तरी कमीच आहे असे देश भक्त परत होणे नाही असा रास्ट्र पुरूषाबद्दल पूर्वीच्या सरकारने साधे चांगले शब्द उच्चारले नाही याचाच दुखः वाटते, त्या माहान राष्टपुरूषाला माझा सास्टांग नमस्कार
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete🙏🙌🙏🙌🙏🙌🌹🌹🌹
ReplyDeleteआता या पेक्षा वेगळे काय मांडू शकतो मी...साक्षात स्वातंत्र्यतेज,भारत मातेला जोखडातून मुक्त करण्याची अपार ईच्छा...या पेक्षा म्रुत्युलाही सामोरे जात स्वातंत्र्य संग्रामात झोकून देणारा योद्धा आणखी कोण...?
ReplyDeleteहे चौदा लेख वाचावयास मिळू शकतील का?
ReplyDeleteमहोदय,नमस्कार, सर्व अग्रलेख क्रुपया वाचणेसाठी उपलब्ध व्हावेत ही विनंती
ReplyDeleteहे सर्व लेख मिळतील का ?
Deleteसर, आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेला तेजस्वी तार् यांचा लेख वाचला सर्व चौदा लेख वाचायला मिळाले तर माझ्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन, सावरकरांना जगानेच विश्व गुरू मानले आहे,यातच सर्व काही आले,
DeleteNatmastak
ReplyDeleteखरोखर केवढा त्याग,एवढे देशासाठी करून त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या,अगोदर व नंतरही.
ReplyDeleteत्या महान महानायकाला माझा साष्टांग नमस्कार.
अलौकिक,
ReplyDelete*मृत्युंजय* प्रकाशीत व्हायलाच हवा.
हो...सहमत....
Delete🙏🙏🙏
ReplyDeleteनिःशब्द.. सावरकर पुन्हा या... तुमची खूप गरज आहे. 😥
ReplyDeleteआम्हा भारतीय लोकांची लायकी कमी असल्याने खरेतर लायकी नसल्याने तुमच्या सारख्या 100 लोकांनी जरी भारतात जन्म घेतला तरी आम्ही सुधारू शकणार नाही.
Deleteसबब भारतात जन्म घेऊन अपमान करून घेऊ नये.
आम्हा भारतीय लोकांची लायकी कमी असल्याने खरेतर लायकी नसल्याने तुमच्या सारख्या 100 लोकांनी जरी भारतात जन्म घेतला तरी आम्ही सुधारू शकणार नाही.
Deleteसबब भारतात जन्म घेऊन अपमान करून घेऊ नये.
कोटि कोटी प्रणाम. वाचून निश्बद झाले.भारतमाताकी जय.
Deleteविर देश सेनानी सावरकर यांना त्रिवार अभिवादन
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteत्रिवार अभिवादन
ReplyDeleteस्वामी. वीर सावरकरांना शत शत नमन. असा योद्धा होणे नाही. एक विनंती आहे सर ते चौदा लेखाची प्रत मला पाठवु शकाल का ❓जो काय खर्च येईल तो मी आवडीने करेन माझा फोन नंबर 8806652713. होणाऱ्या तसदी बद्दल क्षमस्व.
ReplyDeleteते 14 लेख कृपया प्रसिद्ध करावेत..
ReplyDeleteअप्रतिम लेख आहे , Please उर्वरित १३ मृत्यूलेख प्रकाशित करा. धन्यवाद.
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDelete4 लेख कृपया प्रसिद्ध करावेत..त्रिवार अभिवादन
ReplyDeleteते 14 लेख प्रसिद्ध करावे आम्हा सगळ्यांना ते वाचता येतिल
ReplyDeleteKharach Savarkar ya Mahatmyachya vishyavr bolnyachi mazi layki nahich pn ekhadya Adgyan bbalkane Sadgurunchi stuti aaplya vedya vakudya shbdat karavi ts maz zalay...Shabdch nahit pn bolnyacha praytn.. Kay mhanaav ya Mahatmyala....jithe Hiryachi kimmat matimol zali tarihi ha Mahatma aaplyala srv bajuni pailuch padun ghet Swataachya Mnavr v Shariravr Matrubhumisathi zizat rahila tya Guru Tatyaravana Koti koti Pranaam
ReplyDeleteतात्यांना शत शत नमन
ReplyDeleteतात्या, तुम्ही केलेल्या त्यागाची आणि आम्हा भारतीयांवर केलेल्या उपकारांची जाणीव एकही भारतीय कधीही विसरणार नाही... 🌹🇮🇳🇨🇦
ReplyDeleteशतशः प्रणाम स्वातंत्र्यवीर सावरकरांना.१४ लेख वाचायला मिळतील अशी आशा बाळगतो
ReplyDeleteशतशः प्रणाम स्वातंत्र्यवीर सावरकरांना.१४ लेख वाचायला मिळतील अशी आशा बाळगतो
ReplyDeleteकृपया सर्व लेख post करा हिच नम्र विनंती.
अप्रतिम, लेखसंग्रह असल्यास तो सशुल्क मिळावा. फुकटाची जात कोणालाच नसते.
ReplyDeleteमाझा फोन क्र.९४२११८६७५४
सावरकर तुम्हाला लाख लाख सलाम
ReplyDeleteशतशः प्रणाम
ReplyDeleteअद्भुत,अगम्य,विचार शक्तीच्या पलिकडले असे कार्य हिमाल्यासारखे उत्तुंग व्यक्तिमतत्व असलेले वीर तात्याराव सावरकर हेच करू शकतात भ्रामक आहिंसेच्या विचाराल बळी पडलेल्या या देशातील जनतेने व शंड कांग्रेस राजवटीने तात्यांची नेहमीच अपेक्षा केली तात्याराव सावरकर म्हणजे धगधगते यज्ञकुंड ,क्रांतिकारकांचा मुकुटमणी थोर समाजसुधारक, प्रद्यावांत कवी,असे किती तरी अल्योकिक कार्य ऐका जन्मात अशक्य असलेले कार्य एका जन्मात करणाऱ्या तात्याराव सावरकरांना माझे कोटिकोटी नमन
ReplyDeleteसर तुम्ही बनवलेले पुस्तक किंवा ते १४ लेख शेअर करता येतील का?
ReplyDeleteते १४ लेख आता काढा, त्याची गरज आहे
ReplyDeleteस्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम ... अतिशय अभ्यासपूर्ण सुंदर लेख सर्व १४ लेख वाचायला मिळतील तर स्वतःला खुपच भाग्यवान समजेन आशा बाळगतो कि
ReplyDeleteकृपया सर्व लेख post करुन उपकृत करावे हिच नम्र विनंती. माझा Whatsup नं. 09922437799
Strange "water hack" burns 2 lbs overnight
ReplyDeleteOver 160,000 men and women are hacking their diet with a easy and secret "liquids hack" to burn 2 lbs each and every night in their sleep.
It's very simple and it works all the time.
Just follow these easy step:
1) Grab a drinking glass and fill it with water half glass
2) And then use this proven HACK
and you'll become 2 lbs lighter the very next day!
ईतक्या उत्तुंग नेत्याने देशाचे शीर्शनेत़ृत्व करावे अशी पात्रता हिंदुस्थानी जनता होती का किंवा आहे का ?
ReplyDeleteशालेय जीवनात "माझी जन्मठेप" तसेच तात्यारावांबद्दल प्रकाशीत झालेले व आमच्या गावात उपलब्ध असलेले साहित्य झपाटल्यासारखे वाचले होते. तेव्हापासून ह्या अद्वितीय महापुरूषाचे दर्शन घेण्याची अतीव इच्छा होती. १९६२ च्या जून महिन्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि त्या दिवसापासून बेचैनी कशीबशी एक आठवडाभर रोखून धरली. दादरला सावरकर सदनात प्रवेश मिळवायला खूप प्रयास करावे लागले नाहीत. "प्रयोजन काय?" अशी विचारणा झाली. "तात्यारावांचे पदस्पर्श " ह्या उत्तरानंतर प्रवेश मिळाला.
ReplyDeleteप्रत्यक्ष परमेश्वर समोर बाघून का कुणास ठाऊक डोळे डबडबले, मुखातून शब्द फुटेनात. भारावलेल्या स्थितीत त्या तेजाकडे बघूच शकलो नाही. तात्यांची प्रश्नांर्थक नजर पाहिली आणि त्यांच्या पायावर कोसळलो.
त्या दिवशी मला "सूर्य"दर्शन झालं
स्वातंत्रवीर सावरकर हे नेहमीच प्रेरणा दायी राहतील 🙏
ReplyDeletekindly share remaining articles . and pls reply
ReplyDeleteregards