Posts

रेषेने संवाद साधणारा चित्रकार: बाळ ठाकूर

Image
माझ्या शालेय जीवनापासून अनेक पुस्तके, मासिके, दिवाळी अंक माझ्या पहाण्यात आली. त्यातील कथांना असलेली विवीध चित्रकारांची चित्रे पहाण्यात अली. त्यांचा वेगवेगळ्या शैली मी ओळखू लागलो. त्यामध्ये बरेचसे पारंपारीक रूढीनुसार चित्रे काढणारे होते.तसेच कांही विशेष लक्षात रहाणारे, आधुनिकतेने काम करणारे होते. काळाच्या पुढे जाऊन त्यांची कामे आविष्कृत होत असत. त्यापैकी कांही म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, द. ग. गोडसे, स्वतःच्या कथांना चित्रे काढणारे व्यंकटेश माडगूळकर शिवाय ग.ना.जाधव, शि.द.फडणीस असे कांही कलावंत. त्यातही आपल्या रेषेने कथाचित्रांना प्रभावीत करणारे एक नांव होते, ते म्हणजे बाळ ठाकूर. आपल्या जोरकस व प्रवाही अश्या रेषेने कथा विषयाचे आकलन करून देणारे एका बोधचित्रकार.   भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण समस्त जाहीरात व साहीत्य क्षेत्रात ते बाळ ठाकूर या नावानेच परीचीत आहेत. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रील १९३० साली कोकणातील लांजा जिल्ह्यातील भांबेड या गांवी झाला. त्यावेळी शाळेत जाताना आतासारखी वह्या पेनची सोय नव्हती. असे ती लाकडी चौकटीतील दगडी पाटी. खाली पडली की तिचे...

सात्वीक मनाचा सोज्वळ, अध्यात्मिक चित्रकार : जिवाजी भिकाजी दीक्षित.

Image
  अगदी प्राथमीक शाळेत असल्यापासूनआमच्या घरी येणाऱ्या त्या काळातील मासीकातील 'प्रसाद' हे सुप्रसीध्द मासीक माझ्या आवडीचे होते. त्याचे संपादक मंडळ होते तेही अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामध्ये संपादक म्हणून  य.गो.जोशी, स.आ.जोगळेकर, सोनोपंत दांडेकर अश्या तीन व्यक्ती होत्या. या मासिकात संत वाङ्मय, ललित लेख, पौराणीक कथा असे बरेच वाचनीय साहीत्य असे. आणि हे सर्व वाचायला उद्युक्त करीत असे ते त्यात असलेल्या कथांची, मुखपृष्ठाची चित्रे. अत्यंत सुंदर रीतीने काढलेली ही बोधचित्रे कथा विषय, त्यातील भाव दर्शन, त्यातील रचनात्मक मांडणी यामुळे मोहीत करीत असत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक आणि सहज सुंदर भाव, ज्यात केवळ असे तो सुशील आणि सोज्वळ पणा. आणि ही चित्रे रेखाटणारे कलावंत होते ते ही सात्विक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे. जिवाजी भिकाजी दीक्षित अथवा जि.भि.दीक्षित. केवळ त्यांच्या चित्रशैली मधूनच परमार्थाची ओळख करून देणारा एक मनस्वी कलावंत! या प्रसाद मासिकात त्याकाळी अनेक नामवंतांच्या कथा असत. शिवाय त्यांनीच त्याकाळात महाराष्ट्राला 'वेताळ पंचविशी'  'सिंहासन बत्तीशी...

एनसायक्लोपीडिया: व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्.

Image
भारतीय चित्रकार-शिल्पकार यांची जगाला ओळख करून देणारा चित्रकोश आज पाश्च्यात देशांच्या तुलनेने आपल्या भारतीय कलाकारांची-कला संस्थांची माहीती आपल्या देशात फारच थोडी उपलब्ध आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक सृजनशील चित्रकार-शिल्पकार काळाच्या उदरात गडप झाले, कित्येकांचे काम नजरेआड झाले, तर कित्येक कलाकार अनामीक राहीले. अश्या कलाकारांना लोकांसमोर आणण्याचे काम हे वास्तवीक शासनाच्या सांस्कृतीक विभागातर्फे व्हावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. शिवाय महाराष्ट्र राज्याने स्वत:चे असे  कला संचालनालय  स्पथापन केले आहे. त्यांच्याकडूनही असा दस्तावेज करणे गरजेचे आहे. पण आजवरचा अनुभव पहाता दृक कलेच्या बाबतीत शासनाची उदासीनता नेहमीच आढळून येते. आणि याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे 'राज्य कला प्रदर्शना'चे सोहळे. राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चित्रकार- शिल्पकार यांची नांवे चित्रपट, दूरदर्शन अभिनेत्यांच्या तुलनेने अभावानेच असतात. सांस्कृतीक खात्याच्या पुरस्कार सोहळ्याचा दिमाखदारपणा कला संचालनालयाच्या राज्य-पुरस्कार सोहळ्याला कधीच दिसत नाही. आज महाराष्ट्राकडे कलाकृती जतन करण्यासाठी अथवा त्या रसिकांसाठी प्रद...

उद्योजक चित्रकार : शं.वा. किर्लोस्कर तथा शं.वा.कि.

Image
  साहीत्यप्रेमी महाराष्ट्रात अनेक चित्रकारांनी मासीके चालवीली. त्यांची ही मासीके मुख्यत्वे चित्रकलेला वाहीलेली असत. व जोडीला ती ललित वाङ्मयालाही उत्तेजन देत. पण एका चित्रकाराने केवळ जाहीरातीपोटी एखादे नियतकालिक सुरु करणे व पुढे त्याला वाङ्मयीन दर्जा देऊन त्याचे एक अभिरुचीपूर्ण नियतकालिक होण्यात रुपांतर होणे हा मराठी साहीत्यसृष्टीतील एका चमत्कारच मानला पाहीजे हे मासीक होते ' किर्लोस्कर' व त्यांचे संपादक होते, शंकरराव वासुदेव किर्लोस्कर तथा सर्व महाराष्ट्र जसा त्यांना त्यांच्या आद्याक्षरावरून ओळखत होता ते महाराष्ट्राचे लाडके चित्रकार संपादक 'शं.वा.कि.'!  यासाठी आपणाला किर्लोस्कर घराण्याची थोडी पूर्व पिठीका पहाणे जरुरीचे आहे. 'किर्लोस्कर'चे आद्य प्रवर्तक श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर हे बेळगांव जिल्ह्यातील गुर्लहोसूर येथील. लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींची आवड होती. त्या म्हणजे पेंटींग करणे व निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे. त्यांना दोन वडील बंधू होते. वासुदेवराव व रामूअण्णा. रामूअण्णांच्या पाठींब्याने लक्ष्मणरावांनी पेंटींग शिकण्यासाठी मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर...

चित्रकार ते वेषभूषा संकल्पन - एक प्रवास : भानू अथैय्या

Image
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कला इतिहासकार व क्युरेटर जेहरा झुमाभॉय ह्या न्यूयॉर्क मधील एशिया सोसायटी म्युझियमसाठी भारतातील एके काळी गाजलेल्या ‘प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’च्या प्रदर्शनाची तयारी करीत असता त्याचा मागोवा घेण्यास आरंभ केला. त्यावेळी त्यांना प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या मुंबईतील शेवटच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग मिळाला. तो अभ्यासत असताना त्यांना आढळले की हा ग्रुप केवळ पुरुष कलाकारांशी संबंधीत नव्हता. त्या प्रभावाखाली आधुनीक चित्रकला आविष्कृत करणाऱ्या  एका अनोळख्या  महिलेचेही नांव त्यामध्ये होते. आणि यावर झुमाभॉय यांनी संशोधन सुरु केले. ते नांव होते, भानुमती राजोपाध्ये. आणि त्या नांवाचा शोध घेत असता त्या थेट पोचल्या त्या भानू अथैय्या या नावापाशी. आणि या भानू अथैय्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून १९८३ मध्ये रिचर्ड ॲटेनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर अवार्ड पटकावणाऱ्या भानू अथैय्या ह्याच होत्या. ऑस्कर मिळताच भानू अथैय्या या जगप्रसीध्द झाल्या. कॉश्च्युम डिझाइनर म्हणून त्यांचे नांव सर्वत्र गाजू लागले. तसे ते आधीपासूनच चित्रपट सृष्टीत गाजत होते. पण चित्रक...